Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Nisha Dange

Romance


4  

Nisha Dange

Romance


सरप्राईज

सरप्राईज

3 mins 23.2K 3 mins 23.2K

     आज तिचा या कॉलेजमध्ये पहिलाच दिवस होता आणि नेमका उशीर झाला. शिक्षक वर्गात शिकवत होते. वर्गाच्या दाराजवळ येऊन आरती म्हणाली


"आत येऊ का सर?"


शिक्षकांनी तिला हातानेच आत येण्याची खूण केली. असे मध्येच आल्याने सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. मुलांच्या रांगेत काही टारगट मुलं बसलेली होती. त्यांनी एकमेकांकडे पाहत माना डोलावल्या आणि भुवया उडवल्या. आरती मुलींच्या रांगेत तिसऱ्या बाकावर बसली. तिच्या शेजारी बसलेल्या गीता मराठेशी तिची ओळख झाली. मधल्या सुट्टीत दोघीही बाहेर गेल्या.


    मधल्या सुट्टीनंतर आरती व गीता वर्गात परत आल्या तेव्हा तिच्या बाकावर एक गिफ्ट बॉक्स ठेवलेला होता. त्यावर लिहिलेले होते


"Welcome new comer"


   आरतीने ते गिफ्ट हातात घेतले. तिने कुतूहलाने आजूबाजूला पाहिले परंतु तिला कोणीही दिसले नाही. मग तिने गीताकडे पाहून म्हटले 


"गीता काय असेल गं या बॉक्समध्ये? कुणी ठेवला असेल हा बॉक्स इथे?" 


"माहीत नाही, मी कालच आले त्यामुळे मलाही सर्व नवीन आहे. " गीताही आजूबाजूला बघत म्हणाली.


"उघडून बघुयात." असे म्हणत आरतीने बॉक्स उघडला.


"नको....... आरती" गीता असे म्हणत असतांनाच आरतीने बॉक्स उघडला. त्याबरोबर त्यातून एक अक्राळविक्राळ भुताटकी चेहरा असलेला बाहुला बाहेर आला. त्या बहुल्याला पाहून दोघीही घाबरून किंचाळल्या. आरती तर कोसळूनच बाकावर पडली. त्याचबरोबर वर्गाबाहेर लपून बसलेली मुले आत आली. सर्वजण दोघींची फजिती बघून जोरजोरात हसू लागली. एकमेकांना टाळ्या देऊ लागली. आरती आणि गीता पुरत्या गोंधळून गेल्या. 


     दुसऱ्या दिवशीही या टारगट घोळक्याने दोघींना कंटिंगमध्ये घेरले. त्यातील एकाने आरतीला विचारले," तुला काय काय आवडते?"


"भरतनाट्यम्....करायला आवडते." आरतीच्या या उत्तरावर लगेच तो म्हणाला

"करून दाखव."


"आता... इथे?"

"हो आताच इथे करून दाखव"

आरतीच्या प्रश्नावर त्याने हट्ट धरला,

 "त्याशिवाय आम्ही कसे मानणार की तुला भरनाट्यम करता येते म्हणून?'


 आरतीने क्षणभर दीर्घ श्वास घेतला. लगेचच ओढणी खांद्यावरून कमरेभोवती घट्ट बांधली. भरतनाट्यम नृत्य सुरू करण्यापूर्वी नटराजाला मनातच प्रणाम केला आणि नृत्यास सुरुवात केली. तिचे नृत्य कौशल्य पाहून सर्व मंत्रमुग्ध झाले. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रत्येकजण तिच्याशी मैत्री करण्यासाठी पुढे येऊ लागला. प्रश्न विचारणारा टारगट मुलांचा गटनायक मात्र खांबाला टेकून उभा होता. त्याची जणू समाधी लागली होती. तो तिला न्याहळत होता. आरतीच्या टपोऱ्या मृगाक्षी डोळ्यात सिद्धेश स्वतःला पार विसरून गेला. इतक्यात कुणीतरी त्याला हाक मारली.


"ए सिद्धेश इकडे येना," 


"हा सिद्धेश जोशी आणि ही आरती देशमुख." प्रसादने दोघांची ओळख करून दिली. सिद्धेशने तिला जी कसरत करायला लावली होती त्याचा आरतीला राग आला होता.


   घरी जाण्यास सिद्धेश बाईकवर बसला. बाईकवर बसताच मागचे चाक पंक्चर असल्याचे त्याच्या लक्षात आले. मागचे चाक टोकदार वस्तूने पंक्चर करण्यात आलेले होते. महाविद्यालय शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर होते. जवळपास एकही गॅरेज नव्हते. 


"बाईक ढकलून नेण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही". सिद्धेश प्रसादकडे पाहून म्हणाला 


"अरे ..अशी कशी पंक्चर झाली गाडी? कुणीतरी मुद्दाम केलेली दिसतेय."


"होय! मुद्दामच केलीय. कुणी केली ते आले माझ्या लक्षात. चल आता निघू."


    आज महाविद्यालयात येतांना आरतीला मनातून जरा धाकधूक वाटू लागली. पायऱ्या चढून वर जाताना मागून सिद्धेश आला. त्याने तिच्याजवळ येऊन म्हटले


"धन्यवाद आरती ...... काल तुझ्यामुळे मला पहिल्यांदा रस्त्याचे निसर्ग सौंदर्य दिसले" 

 

  स्मितहास्य देऊन तो पुढे निघून गेला. आरती मनातून ओशाळली. खरेतर तिने पहिल्यांदाच अशी कुणाची खोडी काढली होती. हळूहळू आरती आणि सिद्धेश यांचीही मैत्री झाली. मैत्रीतून प्रेमाचा अंकुर फुटला. हसत खेळत एकमेकांच्या सहवासात महाविद्यालयाचे शेवटचे वर्षही संपले. शेवटच्या वर्षात कॉलेज कॅम्पस मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या परीक्षा झाल्या. त्यात सिद्धेशने प्राविण्य प्राप्त केले. त्याला पुण्याच्या एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. महाविद्यालयाचा शेवटचा पेपर झाला की लगेचच सिद्धेश कामावर रुजू होणार होता. शेवटचा पेपर झाल्यावर सर्वजण कंटिंगमध्ये जमले. महाविद्यालयाचा शेवटचा दिवस होता परंतु अद्यापही सिद्धेश आणि आरतीने आपल्या अबोल प्रेमाची कबुली दिली नव्हती. निदान आजतरी त्यांनी व्यक्त व्हावे यासाठी सर्वांनी त्यांना मुद्दाम एकटे सोडले. 

   

"सिद्धेश मला तुला काही सांगायचे आहे" आरती म्हणाली


सिद्धेश तिच्याकडे उत्सुकतेने पाहू लागला.


"सिद्धेश बाबांनी माझे लग्न ठरवले आहे."


"काय? हे शक्य नाही! बाबा म्हणाले आणि तू तयार झालीस ? तू माझा जरासाही विचार केला नाहीस?"


"तुझा विचार कशासाठी?"


"कशासाठी म्हणजे? आपले प्रेम आहे ना एकमेकांवर?"


"असं कोण म्हणालं?"


"आरती प्रत्येक गोष्ट सांगायलाच हवी का?" नाही सांगितले आजपर्यंत पण माझे जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. I love you Arati."

  

"अब आई ना दिल की बात जुबाँपर।"


असे म्हणत प्रसाद तिथे प्रकटला आणि त्याने आरतीला टाळी दिली.


"प्लॅन सक्सेसफुल!"


    क्षणभर सिद्धेशला काहीच कळले नाही.


"प्रसाद कसला प्लॅन? काय चाललंय हे सर्व." सिद्धेश गोंधळून म्हणाला.


"सरप्राईज ना!" गीता हसत म्हणाली


   "अरे ! मंदबुद्धी कॉलेजची चार वर्षे संपली तरीही तू चुपच आहेस म्हणून हा प्लॅन केला. चल आता खिशातली ती वस्तू काढ बाहेर." प्रसाद सिद्धेशला म्हणाला.


सिद्धेशने खिशातील अंगठी काढली. आरतीसमोर गुडघ्यावर वाकून सिद्धेशने विचारले


"आरती माझ्याशी लग्न करशील?"


आरतीनेही लाजून होकार दिला.


Rate this content
Log in

More marathi story from Nisha Dange

Similar marathi story from Romance