सलं काळजातली "
सलं काळजातली "


"
नुकताच आक्टोबर संपुन
नोव्हेंबर ला सुरवात झाली ,
आणि हवेतला गारठा आनखीनच जाणवु लागला
तुटशीचे विवाह मोठ्या थाटामाटात पार पडले
आणि लगबग सुरू झाली उपवर युवक युवतींच्या
लग्नांची सुदामलाही त्याच्या मुलाचं लग्न
या वर्षी उरकुन घ्यायचं होत ह्याच विचारात त्यानं
खिशातला फोन काढला आणि डोळ्यावर चष्मा
चढवत मोबाईची बटन दाबली ,
" हलो हलो आवाज नाई येत रेंज
नाई काय डबळ्याले हं हं बोला येवुन रायला
आवाज आता ! राम राम ईवाई हायत काय ",
" बोला ना बा ईवाईच बोलुन रायलो ! का दिवु ईनी
जवळं , बोला काय म्हणत होते ",
" काई नाई यंदा श्याम्याचा बार उळवुन द्याव म्हणतो ,
ते पोरगी होती ना जामोदेची !
त्या बॉ चा फोन आलता , पोरगी कशी काय हायं ",
" पोरीले काय पा लागते ईवाई सोन हाय सोन
अन् शिकेल सवरेल ,आपला श्याम दहावी
होयेल हाय जोळ्याले जोळा होते ,
" तुमालेत माईतच हाय की आपल्याले एकटचं पोरग
तिन चार एक्कर वावर पोरीले सारोन सुरोन कऱ्याच काम नाही पोरगं सुपारीच खांडय खात नाही ",
" ईवाई अस करा तुमी पायटची गाळी पकळा आन या
मी पोरी वालेयले तसा निरोप देतो की हिरवळखेळचे
पावने येतात म्हणून सोनीले पाह्याले ",
" बरं बरं येतो पोराले पोराच्या मामालेबी संगच आनतो
ठेवतो मंग ",
" ठेवा ठेवा ",
खरं तर लग्न म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेन
खुप दुरवरचा विचार करून मांडलेला आयुष्याचा
नवा अध्यायच म्हणाव लागीलं , आणि लग्न
आपल्या संस्कृतिच एक आश्चर्यच नाही का
दोघही एकमेकांना ओळखत नसतात तरीही
ते दोघ ऐकमेकांना समजुन घेतात आणि
आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखात न डगमगता सामोरे जातात ,
मग ह्या गोष्टीत आपल्या कडुन कोणतीच कसर
ठेवल्या जात नाही ,
सकाळीच सुदाम न पेटीतला सदरा धोतर काढलं
आणि पोराच्या मामाले संध्याकाळीच बोलावल्या च्यान
उशीर व्हायचा प्रश्नच नव्हता ,
पाव्हण्यांचा छान प्रकारे आदर सत्कार करण्यात
आला आणि वेळ आली ती बैठकीची
बैठकीच्या मधोमध एक पिढं ठेवण्यात आलं ,
त्या पिढ्यावर लागलीच मुलगी स्वतःला सावरत मुलगी
येवुन बसली मग विचार पुस सुरू झाली
" आपल्याले सगळं माईतच हाय तरीबी ईचारा ईवाई ",
" नाई नाई तुमीचं ईचारा सुदाम बा ",
" ईचारा ईचारा ईवाई ",
" बाई तुव नाव काय ",
" सोनलं रामदास जामोदे ",
"शिक्षण कुठलोक झालं ",
" बारावी चालु हाय ",
" जन्म तारीख ",
" 8 / 11/ 1993 ",
" मामकुळ ",
" सोंळके ",
पोरगी निघुन गेली आणि मग जानराव
म्हणाले ईवाई काई द्या घ्याचं ,
" हे पा जानराव भाऊ आमी पोरीच्यावर
काईच देवु शकत नाई ",
" मी काय म्हणतो रामदास भाऊ
पोरापोरीचे कपळे द्या लगन आदर्श ,
ना येलाले दुःख ना वायकाले ",
" काय सुदाम भावु काय म्हणन हाय तुमचं ",
" आपलं काईच म्हणन नाही , दोनाचे चार होतात
ना एवळचं बसं हायं , पोरगी पसंत हाय
" मंग तारीख कदीची काढता ",
" शुक्करवाच मुहुर्त हाय ",
" चालतेना रामदास भाऊ ",
" मी तुमच्या पुळे गेलो काय जानराव दादा ,
उद्या कपळा फाळु अन् उरकुन टाकु ",
श्यामला आयुष्याचा साथिदार त्याला
पाहिजे तसा मिळाला त्यामुळे तो भविष्याची स्वप्ने
डोळ्यात घेवुनच घरी परतला मित्रांना सांगितले
खुप खुप म्हणजे त्याला नव आयुष्य, कोणतरी
आपल्याला आपलं म्हणुन हाक मारणार
जखमांनवर मायेन फुंकर घालनारं
जणु त्याच्या घरातील आणि मनातील
पोकळीच सोनलच्या रूपान भरणार होती ,
विषय होता सोनलचा तिचा तर लग्नालाच विरोध
होता तिच्या मना विरूद्ध बोहल्यावर चढनचं
तिला मान्य नव्हतं तिला तिच्या प्रियकराशीच
लग्न करून तो ठेवीलं त्या परिस्थितीत
ती रहायला तयार होती ,
कुठं तरी आई वडीलांच्या धमकावण्या मुळ ती
बोहल्यावर चढली , आता तिच्या आई वडीलांच्या
ईच्छा पुर्ण झाली पण तिच्या मनातील कलहा पुड
तिला हसत खेळत आयुष्य कृत्रिम साज चढवल्यागत
वाटत होत , आणि ती लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच
निघुन गेली तीन कोणताच विचार केला नाही
एकडे श्याम आणि त्याचे लग्न पुर्ण गावात
जिल्ह्यात चर्चेचा विनादाचा भाग झाला ,
पण श्यामच्या मनाचं काय ज्याने स्वप्नं पाहिली
आणि दुसऱ्याच क्षणी उध्वस्त झाली
त्याने कुणाच्या खांद्यावर डोक ठेवुन रडयचं
कुणाला सांगायची त्याच्या काळजातीलं सलं
जी त्याला जिवन मरणाच्या उंबरठ्यावर
घेवुन आली
आज समाजानेही काळानुसार परंपरामध्ये थोडी शिथीलता
द्यायला पाहिजे मुलगा मुलगी
तयार असेल त्यांना मान्य असेल तरच
सार योग्य आहे नाहीतर नाण्याची
एक बाजु तरी उध्वस्त होणार जसा श्याम ..