The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Ashwin Chavhan

Others

3  

Ashwin Chavhan

Others

चित्रा

चित्रा

2 mins
1.3K


चित्राने नुकताच तरून पणात पाय ठेवला होता ,

तिला शरिरात अन् विचारात होनारे बदल जानवत होते असं म्हणतात मुलांन पेक्षा

मुली लवकर मोठ्या होतात खरं आहे ते 

घरच्यांनीही चित्राला वेळेचं आणि घराच्या 

उंबरठ्याच तत्व उगाळु उगाळुन द्यायला 

सुरवात केली होती चित्रा मात्र दिलखुलास 

होती वर्तमान जग आणि तिच्यातील अंतर 

तिला पुर्ण पणे संपवुन टाकायचं होत ,

एक दिवस उजाळला तो म्हणजे दहावीचा 

निरोप संमारंभ अन् त्या समारंभात 

तिचाच वर्ग मित्र शेखर ने सादर केलेली 

कविता 

" काही मुली असतात हृदयात 

ठाव मांडणाऱ्या 

खुप असतं त्यांच्या मनात पण 

कधीच न बोलणाऱ्या "

या कळव्यावर चित्रा अन् शेखर यांची 

नजरानजर होते चित्राच्या हृदयाची 

स्पंदने जोरजोरात धळधळु लागली 

जिथे मुलं मुली जोर जोरात शिट्या

टाळ्या वाजवत होते तिथे मात्र चित्रा 

घामाने ओली चिंब झाली होती 

हाता पायात कंपने आली होती ,


ती भांबावुन गेली अस आपल्याला 

का होतय एवढ्या मुली होत्या मग शेखरं 

माझ्याच कडे का पाहत होता .मग तिला 

आठवलं की त्याने एक दोन वेळेस 

सांगण्याचा प्रयत्न केला पण मी नेहमी

त्याला मजाक वर नेत गेली ,

मग तिने कसलाही विचार न करता वेनीत 

सजवलेलं गुलाब काढलं आणि शेखरला

तिच्या प्रेमाची कबुली दिली ,

त्यांच्या भेठी गाठी वाढत गेल्या 

बागे पासुन ते बेड पर्यंतच्या  

त्या दोघात कशाचाच आळपळदा

राहला नव्हाता ना तो पुरूष असल्याचा 

ना ही स्त्री असल्याचा आता शेखर तिचं 

प्रेमचं नाही तर एक शारीरिक गरज सुद्धा ,


ना मग भिती राहीला ना कश्याची चिंता 

प्रेम आणि प्रणय ऐवढचं समीकरण त्या 

दोघात , मग या दोन समतुल्य गोष्टीत 

सरस कोन हे फक्त तेच लोक सांगू शकतात 

ज्यांनी या गोष्टीचा जवळुन अनुभव घेतला .


सृष्टीचा नियमच असा आहे की ज्या गोष्टीचा 

उदय आहे त्या गोष्टीचा अस्त सुद्धा. 

शेखर आणि चित्राच्या नात्याचा अस्त 

निश्चितच होता ,


तो झाला चित्राचे घरचांच्या ईच्छे साठी 

अब्रूसाठी पण तिला ते लग्न तो नवराचं 

मान्य नव्हता कारण ती फक्त शरीराने 

तिथे होती मन मात्र अजुनही शेखरं आणि 

फक्त शेखरं एवढचं कबुलत होते ,


नवरा राजेश मात्र अपेक्षेच्या वांझ झाडाला 

प्रेमाचे फळ येतील याचं आशेवर 

संसाराचा गाळा हाकत होता ,

त्याला कित्येकदा जानीवही झाली 

की चित्रा फक्त रात्री शरीराने माझ्या सोबत 

असते मात्र मनाने ती नसल्याचा भास होते .

त्याचां तो संशयच नव्हता तर ते 

एक विधीलीखीत सत्य होते सत्य ,


तिचा राजेश पासुन दोन

मुलं झाली पण शेखरशी 

भेटी थांबल्या नाहीत . ज्या गोष्टी

राजेश पाहु शकत नव्हता ते समाज

पाहतं होता समाजाच्या भिंगातुन ,


जे चित्राला नैतिक वाटत होत 

ते समाजाच्या चौकटीत अनैतिक होत ,

कुठं तरी चित्रा तिच्याच आभाशी जगात 

वावरत होती त्यामुळे तिला राजेशचं 

मन मारून जगनं दिसत नसाव 

दिसतही असेल पण तिला वाटत असाव

लग्न म्हणजे मुलं बाळ ते मि त्याला दिलं 

आता त्याने माझ्या कडुन कुठलीचं अपेक्षा 

न केलेली बरी पण तीला जानीव नसावी 

लग्न म्हणजे एक विश्वास एक आस्था, 

अन् जी स्त्री लग्नानंतर ही पर पुरूषा सोबत 

संबध ठेवते तो मग भुतकाळातील प्रेमी 

असो किंवा कोणी मग ते प्रेम राहतं नाही 

समाजाच्या दृष्टिकोनातून तो व्यभिचार असतो , अन् अश्या स्त्री ला समाज

कवळीची किंमत देत नाही .


मग अश्या वेळी कोणतही एक नात 

संपवाव लागते अथवा अथवा स्वतः 

संपाव लागते 

चित्रा तिचा संसार तिचं प्रेम संसार मुलं 

बाळ सार सारचं एका जिवंत ज्वालामुखीत

ढकलून गेली आणि एक आयुष्य सुध्दा 

ते म्हणजे राजेश 

जो या समाजाच्या लग्न संस्थेवर विश्वास 

करत होता त्याला आता कळालं की हे

लग्न संस्था आधुनिकीकरणाने किती ठासळली आहे ,


Rate this content
Log in