श्वास आहेस माझा तू
श्वास आहेस माझा तू
श्वास आहेस माझा तू
हर एक क्षण शेवटचा समजून
श्वास एक एक उरी साठवतो आहे...
हिशोब क्षणांचा रोज करून
दिवस एक एक घालवतो आहे...
श्वास आहेस माझा तू
दोनच घडीचा डाव असतो म्हणून
पाऊलं एक एक घट्ट रवतो आहे...
ध्येय धुसर नित्तळ पुसून
अंतर मैल मैल सपंवतो आहे.....
श्वास आहेस माझा तू
भावनांची आता होळी पेटवून
स्वप्नांची राख रांगोळी काढतो आहे...
हृदयाची झोळी आता करून
प्रेमासाठी तुझ्या फिरतो आहे...
श्वास आहेस माझा तू
चुकुनही चुकणार नाही ठोका हृदयी
श्वासासाठी माझ्या जगतो आहे....
स्पंदन एक एक जोडून
तुला सदैव उरी जिवंत ठेवतो आहे...
वैद्य सागर कड (८-०२-२०१३ | रा ८:०० वा)