सायरन
सायरन


त्या एका आवाजाने समिधाची झोप उडूनच गेली. पुन्हा तो आवाज तिच्या कानात घुमु लागला, पुन्हा तीच अस्वस्थता, तेच दडपण, आणि तीच भीती, पुन्हा ते दिवस तिला आठवले, अंगावर एक शिरशिरी आली. तिने खिडकीतुन डोकावून पाहिले, बाहेर तशी वर्दळ होती, तिने वेळ बघितली, चार वाजून गेले होते. वाचता वाचता तिला कसा डोळा लागला तिला समजलेच नाही.
जवळच असणारे पुस्तक तिने टीपॉय वर ठेवले, बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली. तिने स्वतःसाठी चहा केला, तो घेउन ती पुन्हा हॉल मध्ये आली, पुन्हा पुस्तक वाचू लागली, चहा पित होती, पण, म्हणाव तस वाचनात तीच लक्ष लागेना, तिने चहा पिला. पुन्हा एकदा तोच आवाज, तिच्या कानात येऊ लागला. “का हा आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येतोय? काय झाल आहे?” ती अशीच मनामध्ये बोलली. तो आवाज बंद झाला. “ नको वाटतो हा आवाज, का इतका त्रास देणारा, जीव घेणारा हा आवाज, काय झाल असेल, कुणाची तब्येत ख़राब आहे का? का आपल्या सोसायटी मध्ये काही?” तिच्या मनात प्रश्नांची गर्दी वाढली. आणि ती भुतकाळात रमली.
समिधा सिव्हिल इंजिनियर होती. कॉलेज मधून डिग्री घेतल्यावर, तिथेच, मुंबई मधे एका फर्मच्या डिज़ाइन डिपार्टमेंट मधे ती डिजायनर म्हणून काम करत होती, ऑफिसच्या जवळच ती एक फ्लॅट मधे शेअरिंग बेसिस वर रहात होती. जॉब मिळून जेमतेम सात आठ महिन्यांचा काळ झाला होता. सगळ्या नविन गोष्टी, नविन विश्व, रोज काहीतरी चॅलेंजिंग घडत होत, ह्या मुळे, समिधा एकदम खुश होती, हातात मिळणारा सॅलरीचा चेक, एकदम हातात येणारा पैसा, ती तिला हव्या त्या वस्तु घेत होती, घरी आई जॉब करत होती, ती एकटीच असल्याने तिला कधीच फायनांशियल क्रायसिस जाणवले नाही, याचा अर्थ असा नव्हता की, तिने कसे ही वागावे, कुठलेही कपडे घालावे, ती बेबंध होती असे नाही, ती लांब जरी रहत होती, तिला काही मर्यादा होत्या, किंबहुना तिने त्या घालून घेतल्या होत्या.
ती आज रूमवर एकटीच होती, तिची रूममेट अर्पिता, तिच्या घरी जाणार होती, पुण्याला, समिधा देखिल पुण्यामधे रहाणारी होती. भुतकाळातील तो दिवस आठवून, तिच्या अंगावर एकदम काटाच आला, कॉलेजचे शेवटचे वर्ष, शेवटची परीक्षा, त्यांचा एक छान ग्रुप होता, समिधा, समीहन, अंकित, आणि अपर्णा, हा अख्खा ग्रुप कॉलेजमधे फेमस होता, अभ्यासात हुशार, एक्स्ट्रा ॲक्टीव्हिटीज मधेही हुशार. केतन हा नुकताच त्याना जॉइंट झाला होता, हा देखिल हुशार होता, अपर्णाच्या लांबच्या नात्यातला कुणीतरी तो होता, असा हा ग्रुप जमला होता. शेवटच्या सेमेस्टरची एक्झाम होई पर्यंत फ़क्त अंकितच्या हातात जॉब लेटर होते, बाकीचे इंटरव्यूह देत होते, समिधा, समीहन हे इंटरव्यूहच्या फायनल राउंड पर्यंत पोहचले होते, लास्ट डिसीजन बाकी होता, तो परिक्षेनंतर दिला जाणार होता, पण जॉबची खात्री दोघानाही होती, अपर्णाला जॉब मधे इंटरेस्ट नव्हता, ती तिच्या वडीलांचा बिजनेस जॉइन करणार होती. पण, केतन अद्याप जॉबलेस होता, सगळे त्याला समजावत होते.
“ हॅलो, समिधा,” अपर्णा एकदम घाबरली होती. “ काय झाल, अपर्णा?” समिधाने घाबरत विचारले. “ काय”? समिधा देखिल घाबरली, तिच्या हातातला फोन खाली पडला, ती नुकतीच शेवटचा पेपर देऊन रूमवर आली होती, तोच अर्पणाच फोन, सगळ अकल्पित, अनपेक्षित; काही तासांपूर्वी आपण एक्झाम हॉल मधुन बाहेर आलो, आणि आता ॲम्ब्यूलन्स मधे, रक्तात माखलेला अंकित, आणि त्या सायरनचा आवाज.
अंकितचा अपघात झाला होता, का? कसा?, ह्या प्रश्नांची उत्तर शोधण्याच्या आतच अंकित सर्वाना सोडून गेला होता. त्या दिवसापासून कोणत्याही ॲम्ब्यूलन्सच्या सायरनच्या आवाजाने समिधा अस्वस्थ व्हायची. या घटनेनंतर सगळे वेगळे झाले, समिधा वेगळ्या फर्म मधे जॉइन झाली, समीहन सुद्धा दूर होता, केतन परिक्षेनंतर गायबच झाला; सगळ व्यस्थित चालु होत
काही दिवसांनी अपर्णाच फोन, तोच घाबरा आवाज, केतनने सुसाईड केली होती. पुन्हा सगळे जमले. अंकितचे शेवटचे शब्द ऐकून सगले घाबरले, त्याने कनफेस्ट केले, की त्यानेच अं अंकितचा ॲक्सीडेंट घडवून आला, त्याने माफ़ी सगळयांची माफ़ी मगिलती. आणि तो गेला.
बौध्दिक आसुया, तीव्र स्पर्धा, अंकितबद्दल असणारा राग, यातून अंकितचा जीव केतनने घेतला, शेवटच्या पेपरच्या दिवशी अंकितचा ॲक्सीडेंट, केतनने घडवून आणला होता. पण तो गिल्ट त्याला जगु देत नव्हता. आता पुन्हा तोच आवाज, सायरनचा, पण याने समिधा अस्वस्थ नव्हती, सगळे मळभ दूर झाले होते, समीहन अणि अपर्णा होतीच, समिधाने सुटकेच नि:श्वास सोडला, सायरन चा आवाज घुमत होता.