Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

sandeeep kajale

Others


3  

sandeeep kajale

Others


रेड वाईन

रेड वाईन

4 mins 942 4 mins 942

 

शलाका, त्याच्यापेक्षा ४ -५ वर्षांनी मोठीच होती, पण एक अनामिक नातं त्यांचं होत,एकमेकांसोबत राहणे, फिरणे, गप्पा मारणे, असा त्यांचा कार्यक्रम असायचा, शलाका एका फार्म मध्ये कंन्सल्टंट म्हणून काम करत होती, तर तो म्हणजे, शरद. शरद हा एका ऍड फर्ममध्ये एडिटर म्हणून काम करत होता, त्या दोघांची ओळख त्याच्या ऍड शूट मध्ये झाली. शलाका ज्या फार्म मध्ये काम करत होती ती एक फायनांस कंपनी होती, त्या ऍड साठी शलाकाची कंपनी फायनांस करत होती. तेथेच त्यांची ओळख झाली. शलाकाचा नवरा, शर्मन, त्याचा स्वतःचा बिसनेस होता.


मध्ये पुन्हा ४-५ वर्षांचा काळ गेला, आता शरदाचे लग्न झाले होते, शरदची बायको शमिता, शमिता आणि शरद चे कांदे पोहे टाईप लग्न झाले होते, रीतसर दाखवण्याचा कार्यक्रम, नंतर भेटीगाठी आणि मग लग्न. शरद ने शामिकाची ओळख करून दिली ती त्याची खास मैत्रीण म्हणून, हि खरंच खास मैत्री होती कि आणखीन काही वेगळं. शरद, शमिता, शलाका आणि शर्मन, यांचे नाते असेच फुलात होते, पण त्यातच शरद आणि शलाका यांचे नाते आणखीन बहरत होते, उन्हाळ्यात जसा गुलमोहोर झाडावर बहरतो........


हे असे असले तरीही, शलाका आणि शरद एकमेकांना भेटत होते, त्यांचे बंधअजून घट्ट होत होते, त्यांची वीण एक वेगळं नातं बानू पाहत होती, शरदच्या घरच्यांना शलाकाबद्दल माहित होते, आणि शर्मन ला हि त्यांच्याबद्दल ठाऊक होते, शमिताला त्यांचा काही अंदाज येत नव्हता, पण शरदच्या बोलण्यावर तिचा विश्वास होता, त्यामुळे ती निर्धास्त होती.......


शरदच्या मनात अलीकडेच बैचैनी वाढत होती, शमिताला वाटे, त्याला कामाचे टेन्शन असेल, तिने त्याला विचारले, त्यानेही हेच सांगितले, पण म्हणतात ना, समुद्राचा तळ गाठणे शक्य असते, पण मनाचा नाही..... शरदच्या मनाच्या तळाशी वेगळंच काही तरी दडलेलं होत..........शरदला शमिका आवडू लागली होती.......


पण हे त्याचे प्रेम एकतर्फीच होते, याची साधी जाणीव कोणालाच नव्हती, एकट्या शरदला सोडून........, त्याची हि अस्वस्थता शमिताच्या नजरेतून सुटली नाही, तिने शमिकाला याबद्दल सांगितले, तिनेही त्याच्याशी बोलायचे ठरवले.

शर्मनने एकदा थेट शलाकाला, तिचे शारदवर प्रेम आहे का असे विचारले, शलाका रागाने उसळलीच, तिने संताप केला, शर्मनला खूप रागावली, आपले फक्त शर्मनवरच प्रेम आहे असे स्पष्टपणे सांगितले, मग शर्मनने शलाकाला तिच्या मोबाईलवर, शरदचा आलेला मेसेज दाखवला, मेसेज होता.........


आपले इतक्या दिवसांचे ऋणानुबंध आहेत, आपण एकमेकांना चांगलेच ओळखतो, तुह्या आयुष्यात शर्मन आणि माझ्या आयुष्यात शमिता येण्यापूर्वी पासून आपली ओळख आहे, एक नातं आहे, पण आजपर्यंत ह्या नात्यालाआपण काहीच नाव दिले नाही, आपल्या नात्यावर प्रेमाची मोहोर उमटवूया....... माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी शमिताला समजावें, आणि तू शर्मनला समजावं........

शलाका रागारागाने शरदकडे गेली, जाब विचारायला, शमितासुद्धा तिथे होती, झालेला प्रकार आता शमिताला समाजाला होता, तिला खूप वाईट वाटले, शामिकाने तिची समजूत काढली, आणि शरदला खडे बोल सुनावले, आणि ह्यापुढे आपण कधीच भेटायचे नाही, आपल्यात आता काहीच नाही, असे स्पष्टपणे सांगून, आणि शमिताची माफी मागून तिथून निघून गेली.......


शलाका घरी आली, शर्मन तिची वाटच बघत होता, शलाकाने शर्मनला घट्ट मिठी मारली, आणि खूप रडली, शर्मन तिची समजूत काढत होता, शरद आणि शलाकाचे खूप जुने संबंध होते, एक अनामिक ओढ़ होती, प्रेमाची जाणीव फक्त शरदच्याच मनात होती, पण, शलाका त्यांच्या या नात्याला अनामिकच ठेवू इच्छित होती, पण हि अनामिक ओढच शरदला प्रेम वाटू लागले होते, आणि ते स्वाभाविक होते. पण शलाकाच्या मनात फक्त आणि फक्त मैत्री होती.......


अजून काही महिने गेले, शरद ला आपली चूक कळली होती...... त्याने शलाकालाची माफी मागितली, पण ती त्याला माफ करत नव्हती,शमिताने आणि शर्मनने सुद्धा शलाकाची समजूत काढली.......


आणि एक दिवस तिने अचानक शरदला फोन करून एका रेस्तरॉ मध्ये भेटायला बोलावले, आणि तो तिथे आला, तिने एव्हाना शरदला माफ केले होते, शरदने पुन्हा तिची माफी मागितली, शरदला शामिकाने आपले नाते काय आहे ते समजावून सांगितले, आणि त्याच्या पुढे एक बाटली ठेवली. ती बाटली होती रेड वाईनची......


 तिने रेड वाईन दोन ग्लास मध्ये ओतली, एक त्याला दिला, आणि एक स्वतः घेतला..... तिने पुन्हा त्याला समजावून सांगितले, त्यांच्यात फक्त मैत्री आहे आणि ती तशीच कायम राहील, त्यांच्या मैत्रीचं नातं  हे या रेड वाईन सारखंच आहे, अधिक जुनं आणि अधिक मुरलेलं, रेड वाईन जेवढी जुनी, मुरलेली तेवढीच ती आणखीन चवदार असते, तसेच जस आपलं नातं जेवढं जुनं तेवढंच अधिक मुरलेलं, पण चविष्ट.........

त्यांच्या नात्याला त्यांनी नाव देण्याचे ठरवले ते नाव होत

रेड वाईन फ्रेंडशिप..... फॉरेव्हर

असच त्यांचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं, त्यांची मैत्री अजून मुरतं गेली, आज त्यांनी वयाची साठी ओलांडली, कालांतराने, शर्मन शामिकाला सोडून गेला, आणि त्यापाठोपाठ शमिता हि निर्वतले, त्यांची मुले सुद्धा उच्चंशिक्षणासाठी परदेशी गेली होती....

आता मात्र, शरद आणि शलाका दोघेच होते, एकमेकांच्यासाठी..... त्यांची ती रेड वाईन वाली फ्रेंडशिप मात्र अजून टिकून होती, त्यांच्या मोबाईल चा स्टेट्स होता......

रेड वाईन.......................Rate this content
Log in