Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vasudev Patil

Tragedy Others


2.5  

Vasudev Patil

Tragedy Others


रसवंती भाग तिसरा

रसवंती भाग तिसरा

7 mins 989 7 mins 989

     भाग::--. तिसरा


रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चॅटिंगनं सना ही गजनची साली आहे हे कळताच आपलं काम सोप्प झालं असा मनोमन विचार करत विक्रांत सकाळी आठलाच झांजरवाडीहून बालेवाडीकडं येण्यासाठी निघाला.गजनला विक्रांतनंच दुकानासाठी बॅंकेतून लोन मंजूर केलं होतं.शिवाय आता बंगल्यासाठी देखील वीस लाखाचं लोन लगोलग मंजूर केलं होतं.त्याचे व गजनचे तीन चार वर्षापासून मित्रत्वाचे संबंध होते. त्यामागील कारण वेगळंच होतं.पण आता तर वेगळ्याच रितीनं त्याचा परतावा मिळू पाहत होता.

   साडे आठला विक्रांतची गाडी गजनच्या दुकानासमोर उभी राहताच गजन पळतच दुकानातून उतरला.

"या साहेब!बहू दिवसातनं येणं केलंत!"

"गजनशेठ भेटत नाही म्हटल्यावर आम्हीच आलो भेटायला.म्हटलं चला बंगला पुरा झाला की नाही पाहून यावं!"गाडीतनं बाहेर येत गाॅगल व्यवस्थित लावत विक्रांत बंगल्याकडं पाहू लागला.गजननं बंगल्यात नेत मध्ये चहा घालायला सांगितला.विक्रातशी तशी आधी त्याच्या आई-वडिलांशी भेट झाली होतीच पुर्वी,तरी त्यानं आई-वडिलांची विक्रातशी गाठ घातली.चहा घेऊन सना हाॅलमध्ये तोवर आलीच.विक्रातला आता आभाळ खुलून आल्यासारखं वाटलं.

"साहेब!ही सना!माझी मेव्हणी."

"गजनशेठ ,पाहुण्यांना झांजरवाडीला आणा घरी",चहा देणाऱ्या सनाकडं पाहत विक्रांत बोलला.

"साहेब आधी गृहशांती होऊ द्या मग सर्वजण येऊ.कारण आपल्या कृपेनेच तर ही घडी बसलीय!"गजन कृतज्ञतेने बोलला.

तितक्यात असलम बाहेर आल्याचं दिसताच गजन विक्रांतला गप्पा मारायला लावत बाहेर गेला.घराची दुरूस्ती करतांना घरातला किरकोळ सामान व रसवंतीचा चरखा जो अंगणात ठेवला होता,तो भंगारानं घ्यायला असलम आला होता.सरपंचानं नारू शिपायास सोबत पाठवलं होतं.गजनला त्यांच्या व्यवहाराशी काही घेणंदेणं नव्हतं,फक्त घरभरणी आधी अंगणातून तो चरखा हलणं महत्वाचं होतं.असलमनं चरखा पाहताच खूश होत सौदा केला.नारु शिपायाला विक्रांत गजनशेठच्या पाहुणीसोबत दिसताच त्याची नस तडकली.लतखोरांस लाळ गाळतांना पाहून त्याची लाही लाही झाली.विक्रांत त्याचा आत्याचा मुलगा व त्याच्याच वयाचा.पण गरिबी व याचे एकूण एक धंदे माहित असल्यानं त्याच्यापासून तो दूरच राही.विक्रांत व सनाची गाडी आता दिलखुलास रंगत धावत होती.

असलमनं चरखा उचलण्यासाठी आपल्या माणसास गाडी आणण्यास फोन केला.

"गजनशेठ,सावध रहा या साहेबापासुन!तुम्हाला पुरतं माहित नसेल पण याच्यामुळंच निष्पाप गजा शिंदेंचं पुरं कुटुंब उध्वस्त होऊन मेलं .बबन्या गेला.फड्या पन्नग आहे हा! उलटल्याशिवाय राहणार नाही"असं सांगत नारू त्वेषानं विक्रांतकडं पाहत खाकरून पचकन थुंकत निघून गेला.

विक्रांतनं सनाशी सर्वासमोर ओळख करून घेत बॅकेचा टाईम होताच रजा घेतली.सनानं त्यास स्मित हास्य दिलं पण खोलात ज्वालामुखी फुटत तप्त लाव्हा काळजातून वाहत डोळ्यात उतरत होता.

 चरखा आणि गजा व शालूची फुटकी गंजलेली भांडी पाहून नारुचा अख्खा दिवस भकास गेला.त्याला दिवस भर पाण्याच्या डब्यात तोंड खुपसलेला गिट्टू, कुबडीनं फोडलेल्या माठाच्या ठिकऱ्यात नंदाळ्यात तोंड अडकलेला सडलेल्या थोटक्या पायाचा गजा व आडाच्या पाण्यातली शालू दिसू लागली.त्या सोबत मेलेल्या बबन्याचं एवढं सोयरसुतक वाटलं नाही.पण गजाचं कुटुंब त्याला रडवू लागलं.तो जेवलाच नाही.रात्रीही कानूमानू करत दोन घास गिळले व अंथरूणात पडल्या पडल्या त्याला शालूचा जिवनपट आठवू लागला.आत्याच्या गावाला लहानाचा मोठा झालेल्या व नंतर बालेवाडीत आलेल्या नारूस शालूचं पुरतं आयुष्य झरझरू लागलं.

.

.

.

.

  झांजरवाडीतील शंकरबाबाची शालू एकुलती एक मुलगी.शालू दहावीला असतांनाच आई वारली.शंकरबाबाचं घर शालूवरच पडलं.शंकरबाबाकडं दोन एकराचा ठाव.जिवापेक्षा अनमोल.त्यावरच त्याची गुजराण चाले.पण पंधरा वर्षांपासून चुलतभावानं कोर्टात केस टाकलेली हिस्सेवाटणीवरून.गावात तर आता चर्चा सुरू झालेली की अर्जुन्या आता केस जिंकेल व शंकरकडनं शेत ताब्यात घेईल.

 या शेताला लागुनच गुणवंतराव म्हस्केचा मळा.गुणवंतराव बालेवाडीजवळील अप्पासो.माधवराव सहकारी साखर कारखान्याचे संचालक. सुखवस्तू टंच असामी.साठेक एकर बागायत क्षेत्र.विक्रांत हा त्यांचा एकुलता एक वारस.मळ्यात लिंबू पेरुच्या बागा,जोडीला ऊस, कापूस ठरलेला.मळ्याशेजारीच शंकरचं कोरडवाहू शेत असल्याने मळ्यातलं पाणी सहज देऊन देत.

  घर सांभाळत ,बारावी करत शालू बाबास शेतात ही मदत करी.म्हस्केच्या मळ्याच्या पाण्यावर कापूस मस्त फुललेला.दोन तीन बायांना घेत ती कापुस वेचत असतांना पाणी घेण्यासाठी म्हस्केच्या मळ्यात हंडा घेऊन विहीरीवर गेली.भला उंच वाढलेला ऊस ओलांडत बांधानं विहीरीकडं सरकू लागली.पेरुची बाग ओलांडतांना लगडलेले गर्द हिरवे कच्चे पेरू,गाभुळलेले पोपटी पेरु,पिवळे पिकलेले तोंडाला पाणी आणत होते.नाकात आंबट वास खाण्यास प्रेरीत करत होता.शालू हंडा ठेवत बागेत घुसली व दोन तीन पेरू तोडून परतणार तोच बागेत समोर विक्रांत! ती घाबरली. तो आतापावेतो काॅमर्स करत बाहेरच शिकायचा.म्हणून सहसा मळ्यात नसायचाच.पण काॅलेज संपलं व बॅंकींग परीक्षेची तयारीसाठी घरीच स्टडी करू म्हणून झांजरवाडीत परतला होता. व मळ्यात शांत वातावरणात स्टडी करत असावा.पण गल्लीत वा शेतात एक दोनदा शालू त्याच्या नजरेस पडली व नजरेत भरली.याची शालूस काहीच जाणीव नव्हती.

  "प प पेरू... खाण्यासाठी...दोन तीन तोडले.."घाबरत ती बोलली.

तो फक्त हसला.

ती पळाली.

मग नंतर येता जाता मळ्यात ,गल्लीत भेट होऊ लागली.तो ही हिच्या शेताकडं उगाच फेरी मारू लागला.

 पण ती घाबरून दूरच राही.कापूस निघाला. गहू पेरला.आता गुणवंतरावाऐवजी पाण्याचं विक्रांतच स्वत:हून हो म्हणाला.शेताची केस अंतिम टप्प्यात म्हणून शंकरबाबा वारंवार जिल्ह्यावर जाऊ लागला नी मग गव्हास पाणी द्यायला शालू जाऊ लागली. विक्रांतनं शालूस जाळ्यात अडकावयाला सुरूवात केली.पण घरची व बाबाच्या गरीब स्वभावाची जाणीव असल्यानं आपली इज्जत बिलोरी आब!ती आपणच सांभाळायची, या न्यायानं ती विक्रांतला ठरावीक अंतरावरच ठेवी.

"शालू बघ!"

"काय?"गव्हाच्या पाण्याचा दांड बदलत शालूनं विचारलं.

"पेरूच्या बागेत पेरूवर काकातू कसा झपटी मारतोय!,विक्रांत बोट तिकडे दाखवत पण नजर शालूवर रोखत म्हणाला.

"....…."पेरुचा आंबटपणा कितीही आवडणारा असला तरी ती निशब्द.

"तुला खायचा का पेरू?चल !" त्यानं विचारलं.

"नकोय"शालूनं त्याला झटकलं.

तोच बागेतला पेरू चोचीत न आल्यानं मिठू मिठू किलकारत काकातूनं नभात हूल भरली.तसा विक्रांत संतापात मळ्यात परतला.पण त्यानं मदत सुरुच ठेवली.शंकरलाही तो आवडत असे पण शालूसाठी तो असा विचार कधीच त्याच्या मनाला शिवला नाही व तसं होणं जन्मात शक्य नव्हतं.त्याला कारण गुणवंतरावाची परिस्थिती.

बारावीला परीक्षेला तालुक्याला जावे लागे.शेवटच्या पेपराला शालूला विक्रांतच आपल्या बुलेटवर घेऊन गेला.ती आपली बस स्टाॅपवर गाडीची वाट पाहत उभी असतांनाच यानं फटफटफट आवाज करत बुलेट गाडी आणली व शंकर बाबानंच सांगितलं अशी बतावणी करून तिला घेऊन गेला.जातांना नाही पण येतांना त्यानं तिला सरळ 'मला तुझ्याशीच लग्न करायचं'असं दणक्यात सांगून टाकलं.पोर जरी हुरळली तरी परिस्थीतीचं भान राखत "आधी घरी सांग नी मग बाबास भेट,या गोष्टी अशा बहकल्यावाणी होत नसतात" समजावत त्याची रजा घेतली. तो चाचपडत परतला.बस स्टॅंडवरून बुलेटवर बसवून घेऊन जातांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांनी साऱ्या गावात गवगवा केला.वदंता शंकरबाबास ही कळाली.

 विक्रांत परिक्षा पास होत बॅंकेत क्लर्क म्हणून लागला.पोष्टींग तालुक्यालाच झाली.तरी तो येता जाता शालूस भेटे.शंकरबाबानं त्यास धमकावत आधी घरच्यांच्या कानावर घालायला लावलं.पण आता पावेतो दूर राहणाऱ्या शालूसही कुठं तरी अंधुकस वाटत होतं की नियंताच्या मर्जीनं लग्न झालंच तर किती बरं!

 अर्जुन्याची सून पार्वतीला हे समजताच विक्रांत म्हणजे टंच असामी, शिवाय नोकरी.आपली बहिण मालविकासाठी हे स्थळ परफेक्ट राहिल.तिचं माहेर तसं खाऊन पिऊन सुखी. मालविकाही क्लर्क म्हणूनच नोकरी करत होती. तिनं सासरा व वडिलांच्या कानावर घालत त्यांना गुणवंतरावाकडं पाठवत खोडा घातला.विक्रांत वडिलांकडे सांगण्याचा प्रश्नच नव्हता.त्याला फक्त शालू पाखरास लग्नाचं गाजर दाखवत पकडायचं होतं.

 अर्जुन्यानं व त्याच्या व्याह्यानं स्थळ आणताच'आपणास फक्त मुलगी सुस्वरूप हवी बाकी काही नको सांगत,मुलास मुलगी पसंत पडायला हवी' सांगत होकार भरला.

 विक्रांतनं मालविकाला पाहताच पसंत केलं. शालूचं सारं विश्वच उध्वस्त झालं. पण तिला त्यात ही समाधान होतं की आपण लुबाडलो गेलो नाहीत.विक्रांत व मालविकाचं लग्न झालं नी शंकरबाबा शेताची केस हारले. अर्जुन्यानं शेताचा ताबा घेतला.इज्जतीशी खिलवाड झाला व शेतही गेलं यानं शालू व शंकरचं आयुष्यांचीच राखरांगोळी झाली.लग्नानंतर ही विक्रांत शालूला भेटण्याचा प्रयत्न करू लागला.शंकरबाबा घरात नाही डाव साधत त्यानं शालूला गाठलं.ती थरथर करू लागली.तिला अंगातून लाव्हा वाहतोय की काय वाटू लागलं.

"शाले, अजुनही संधी आहे.लग्न जरी झालं तरी मला तू हवी आहे."विक्रांत लाळ घोटू लागला.

शालूभोवती सारा आसमंत गरगर फिरू लागला.

शालूनं अंगातली शक्ती एकवटत पायातली चप्पल काढत हातात घेतली व चटाक चट s s s s फाडकन विक्रांतच्या गालावर सणकावली.गाल लालेलाल होत फरफर सुजत वर येऊ लागला.

"चालतो हो नाहीतर दुसरा ही फोडीन,लाज नाही वाटली का!"

"आता निघतो पण तुला नाही जिवनातून उठवलं तर याद राख!"विक्रांत सापागत फुत्कारत गाल‌ लपवत चालता झाला व शालू धाय मोकलून रडू लागली.

 शंकरबाबानं आपलं राहतं घर विकून नारूच्या ओळखीनं बालेवाडीतल्या गजा शिंदेशी शालूचं लग्न जुळवलं.

गजा शिंदेला ही आगापिछा कुणीच नव्हतं.चावडीच्या भाड्याच्या घरात राहत साखर कारखान्यात रोजंदारीनं चार सहा महिने कामाला जाई. लग्नास ना शालूनं नकार दिला ना गजानं. कारण त्याची आजीही तीन महिन्यापुर्वीच वारल्यानं खाऊ घालणारंच कुणी नव्हतं.शंकर बाबानं राहतं घर विकत लग्नाचा खर्च केला व सोनं ही चढवलं.

 शालू विक्रांतपासून बचाव व्हावा म्हणून बालेवाडीत आली पण तिच्या संकटाची मालिकाच सुरू झाली. 

 आधीच दिलेल्या परिक्षेत पास होऊन विक्रांतला मॅनेजरची पोष्ट मिळाली.बापाच्या वशिल्यानं त्यानं बालेवाडी ब्रॅन्च बसवत मालविका सहित तो बालेवाडीतच मुक्कामाला आला.

 रविवारनंतर गावाहून बुलेटवर परततांना चावडीजवळ शालूच्या घरात नारू गजासोबत बसला होता.शालू दाराआड समोरच होती.नारू दिसताच शालूकडं पाहत गाडी थांबवत त्यानं पान टपरीवर नारूला बोलवलं.ब्रिस्टाॅल घेऊन पेटवत "काय नारू !काय म्हणतेय आपल्या इंजिनची बोगी?धूर हवेत सोडत गजाव शालूला ऐकवलं.

नारूच्या तळपायाची आग मस्तकात गेली.शालू उठून घरात गेली.

"बोल नाऱ्या!"

"जी काय बोलू!ठिक आहे!"म्हणत नारूनं विषय टाळला.

विक्रांत मिश्कील हसत गजाकडं पाहत निघून गेला.

"नारू कोण हा?काय म्हणत होता?"गजानं निर्वीकारपणे विचारलं.

"गजा काही नाही.तो माझा आतेभाऊ आहे.आताच बॅकेत लागलाय आपल्या गावात!"

"आरं पण ते इंजिन, बोगी!काय म्हणत होता तो!"

"गजा, मी त्याचा मामेभाऊ म्हणून मला थट्टेनं बोगी म्हणतोय तो!"

नारू वेळ मारत निघायला लागला. मात्र घरात शालूला धडकी भरली.

   लग्नास पंधरा दिवस होताच घर खाली करायची बोली होती. घर विकल्याचं शालूस कळूच दिलं नव्हतं शंकरबाबानं. पण खाली करायचा दिवस येऊ लागला तसा त्याला घाम फुटू लागला. ह्रदय भरुन येऊ लागलं.'देवा!काय दिवस दाखवतोय रे!शेत गेलं.पोरीला मनासारखं घर मिळालं नाही.आणि आता डोक्यावरचं छप्पर ही चाललं.निदान याच छप्परात प्राण गेला असता तर....!' छप्पर गरगरायला लागलं, डोळ्यात अंधार दाटू लागला.पाठीकडनं कळ उमटू लागली.छातीकडं सरकली.

शालू ऊर बडवत झिंज्या तोडतच आली.पण शंकरबाला मरताना समाधान लाभलं की स्वत:च्या कुडीतच आपल्या कुडीतलं प्राणपखेरू उडालं.


       क्रमश:.......Rate this content
Log in

More marathi story from Vasudev Patil

Similar marathi story from Tragedy