रोल चेंज
रोल चेंज
एरवी सकाळी ७.४० लोकल पकडणारी मीरा शाळेतून सुटताना वेगळ्याच विचारात होती. गौरी गणपती येणार होते घरी तिच्या. मीराच्या मनात विचारांची जणू आरती चालू झाली होती, उद्यापासून गणपतीची सुट्टी लागणार होती शाळेला! पण सुट्टी फक्त शाळेला मिळाली होती मीराला नाही. उद्यापासून मीराचा फक्त 'रोल' चेंज होणार होता. उद्यापासून मीरा शिक्षिका नाही तर परिपूर्ण गृहिणी म्हणून जगणार होती. गणपतीच्या सणाला गणपती आणण्यापासून तर सजावट जेवणाचे विविध मेनु ठरवून ते चवदार बनवायची पूर्ण जबाबदारी मीराने घेतली होती. थोडी बावरलीच होती मनातून, आपल्याला झेपेल का सगळं! कसं होईल ?बाप्पाचे सात दिवस व्यवस्थित पार पडतील ना !येणाऱ्या जाणाऱ्यांचे करेना मी व्यवस्थित? या विचारातच होती मीरा.
पण देवाने एक वेगळीच शक्ती दिलेली असते आम्हा स्त्रियांना ती म्हणजे जो रोल समोर येईल तो व्यवस्थित निभावतात त्या मग तो शिक्षिकेचा, असो गृहिणीचा, असो आईचा असो नाहीतर पत्नीचा
, मुलीचा किंवा सुनेचा असो.
गणपतीच्या पहिल्या दिवसापासून मीरा एकदम उत्साहाने सर्व करू लागली. जणू वेगळीच शक्ती तिच्यात संचारली असावी. गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी लागणारे निराळे पदार्थ मीराने अगदी आवडीने बनवले. वेळच्यावेळी आरती, घरातल्यांच्या जेवणाच्या वेळा, येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे आगत-स्वागत सगळं अगदी छान केलं मीरान. मैत्रिणींच्या आगमनाने खुश झालेल्या मीराने गौरीपुढे छान छान खेळही खेळले. आज तर मीराला स्वतःचाच हेवा वाटत होता. मीरा मनातून खूप आनंदी व समाधानी होती. मनोमन बाप्पाचे आणि गौरीचे आभार मानत होती.
"देवा अशीच शक्ती मला आयुष्यभर दे, आयुष्यात जे जे वाढून ठेवलंय ते सहन करण्याची ताकद दे". असं म्हणत मीराने भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिला
मीरासारख्या सर्व स्त्रियांना म्हणजेच मिळेल तो रोल उत्तम रीतीने निभावणाऱ्या 'गौरींना' माझा शतशः प्रणाम!🙏🙏