Shital Moholkar

Others

2  

Shital Moholkar

Others

न्यायप्रिय गुरु

न्यायप्रिय गुरु

1 min
124


कोणत्याही शिष्याला एकलव्य होऊन ज्ञान प्राप्त करून घ्यायला कधीच आवडणार नाही. खरा शिष्य हा अर्जुनाप्रमाणे होऊन गुरूच्या सानिध्यात राहून ज्ञान प्राप्त करून घेण्यास नेहमीच उत्सुक असतो. आपण गुरूच्या सानिध्यात राहून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून अर्जुनाप्रमाणे एक उत्तम व प्रिय शिष्य व्हावे अशी प्रत्येक शिष्याची तीव्र इच्छा असते पण परिस्थिती मात्र काही शिष्यांना अर्जुन बनवते तर काहींना एकलव्य पण एकलव्य बनवून घेतलेले ज्ञान किंवा प्राप्त केलेली शिक्षा ही देखील अर्जुनाने प्राप्त केलेल्या ज्ञानाएवढीच उच्च प्रतीची असते.

 

  आता गुरुच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी त्यांचे सर्व शिष्य एक समान असतात.खरे गुरु आपल्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव करत नाहीत किंवा ज्ञानदान करताना भेदभाव करण्याची कल्पनाही गुरूंच्या मनाला शिवत नाही.पण कोणताही शिष्य आपल्या स्वच्छेने एकलव्य होत नाही. सभोवतालची परिस्थिती त्याला एकलव्य होण्यास भाग पाडत असते.


      आता येथे द्रोणाचार्य समान असलेल्यागुरूंना एक विनंती कराविशी वाटते की त्यांनी एकलव्य झालेल्या, गुरूंची मूर्ती सर्व काही म्हणून ज्ञान प्राप्त केलेल्या शिष्यांकडून गुरुदक्षिणा( उजव्या हाताचा अंगठा) मागून अन्याय करावा की त्यांच्या ज्ञानउपासनेचे कौतुक करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. गुरु नेहमीच श्रेष्ठ विचार करतात आणि न्यायही करतात. आपल्या प्रत्येक शिष्याला आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान देऊन आणि प्रोत्साहन देऊन त्याला पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास देतात.

अशा न्यायप्रिय गुरूंना माझा शतशः प्रणाम*🙏


Rate this content
Log in