Rekha Sonare

Tragedy

3  

Rekha Sonare

Tragedy

रखमा

रखमा

4 mins
224


रखमानी चूल पेटवली त्यावर अजून तिने दोन जाड काड्या लावल्या.पेटत्या काडीवर काडी टाकल्याने एकदम धगधग विस्तव झाला तसं तिने एक गंजभर पाणी चुलीवर ठेवले आणि त्यावर झाकण ठेवले. आंदण येईपर्यंत तेवढाच वेळ म्हणून तिने आपल्या लहानग्या पोराला छातीशी लावले. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होती तसा तो अजूनच तिला चावा घेत होता..त्याचं पोट भरत नव्हतं म्हणून तो अजूनच कँग कँग करून ओरडत होता..कसं भरन ? घरात खायला दाणा नव्हता कसं बसं आपलं पोट भरत होती तेवढंच काय ते तिला दूध यायचं..मूठभर तांदूळ घेतले नी टाकले त्या उकळत्या पाण्यात आणि भात शिजवला..त्याशिवाय काहीच घरात नव्हतं.. दोन महिने घरीच होती.. बाळंत झाल्यामुळे… थोडाफार साठवलेला दाणा संपला होता आता तिला कामावर जाणे जरुरी होते.. 


एका इमारतीचे काम सुरू होते. तिथले बांधकाम कदाचित संपले असेल म्हणून तिने ठेकेदार ला भेटायचे ठरविले काम मिळण्याकरिता…..

किती दिवस घरात बसणार …? नवरा दारू पिऊन तिला मारझोड करायचा..पदराशी बांधलेले पैसे पण घेऊन पळायचा… लवकर लवकर आटपून शिजवलेला भात रात्रीची भाकर एका फडक्यात बांधली ,झोळीत बांधून पोराला घेतलं अन निघाली ठिय्यावर…!! आता नव्या इमारतीचे बांधकाम सुरू होते तिथे तिला विटा उचलायचे काम मिळाले--- रोजानी काम घेऊन निघाली बाकीच्या मजुरासोबत.एका काखेत थोडंफार लागणारं सामान अन दुसऱ्या हातात लटकवलेली पोराची झोळी...चालत होती उन्हात त्या चिमुरड्याला घेवून…..! श्रीमंत घरातील असती तर अजूनपर्यंत पलंगावरून उठली नसती पण बिचारीच्या नशिबात काय होते ? आपल्या पोटच्या गोळ्याला ऊन लागू नये म्हणून त्याला झाकून घेतले..आणि झपाझप पाऊले टाकत निघाली…


मोठ्या इमारतीचे काम सुरू होते. ती तिथे पोहोचल्याबरोबर तिने एक सुरक्षित जागा बघून झोळी बांधली आणि कामावर लागायच्या आधी पोराला दूध द्यावं म्हणून छातीशी लावलं तेवढ्यात ठेकेदारांनी आवाज दिला, "चला लवकर लवकर कामाला लागा.." तसं रखमाने पोराला जबरदस्तीने बाजूला केलं. परत त्याने कँग कँग केले.. बिचारं रडत होतं पोरगं..!!  त्या बापडीने रडत्या पोराला उचलून त्या झोळीत टाकलं चांगलं बांधलं आणि पोराकडे पहात पहात गेली विटा उचलायला. रडून रडून बिचारं झोपी गेलं.ठेकेदार मागेच होता . थोडावेळ सुद्धा बसू देत नव्हता..तेवढ्यात तिला रडण्याचा आवाज आला.. कान टवकारले तर तिचच पोरगं रडत होतं.. पहिलाच दिवस होता तिचा कामावर पोराला घेऊन यायचा.तिला पान्हा सुटला होता . लवकर पोराला घ्यावे आणि छातीशी लावावे  पण ठेकेदार मागेच.. तिने विनवणी केली मी जास्तीवेळ देईल म्हणून पण ऐकायलाच तयार नाही..तो म्हणाला, "तुमको फुकटका पैसा दु क्या? काम नही होता क्यू आते हो काम करणे और बच्चे को भी साथ लाया। उपरसे तुमको टाइम भी चाहीए.. चलो काम करो । फालतू का दिमाख खराब करते रहते है ।"  डोळ्यात पाणी आलं तिच्या….


काही वेळाने जेवणाची सुटी झाली.हात धुतले .. पोराला झोळीतून काढले.. पाहते तर त्याने सर्व ओले केलेले.कशी बशी तिने दुसरी गोधडी टाकली. दुसऱ्या कपड्यात पोराला गुंडाळले त्याला दूध पाजले आणि दूध पाजता पाजता दोन घास आपल्या पोटात टाकले... टाकणे जरुरी होते नाहीतर तिला कशी शक्ती येणार होती...पोराला झोळीत टाकले नी निघाली..अंग अकडून गेल्यासारखे वाटत होते.. कुणाला सांगणार? नवरा फक्त खायला मागत होता आणि तिचे लचके तोडत होता..बाकी काही घेणं देणं नव्हतं त्याला..दिवसभर काम करून थकली होती सायंकाळी ६ वाजता कामावरून  सुटी झाली तशी ती पोराला घेवून निघाली घराकडे जाण्यासाठी..


दुसऱ्या दिवशी तिचे अंग अकडून गेले होते. तरी आपलं सर्व आटोपून निघाली कालसारखीच..म्हणतात ना पोट सर्व काही करायला शिकवितो..तसच काहीसं.. दिवसभर काम झाले नी ती निघायला लागणार तेवढ्यात ठेकेदार म्हणाला, " तुम रुको..बाकी सब चले जावो.. " ती घाबरतच हात जोडून बोलली , 'म्या काही चुकल काय? मले जावू दया म्या पाया पडते तुमची." तसाच ठेकेदारानी तिचा हात पकडला ती सावध झाली आता तिला कळले होते मला का थांबविले म्हणून..ती गयावया करीत होती. त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता त्यामुळे ती अजूनच घाबरली.. तो म्हणाला , 'तुमको पैसा चाहीए मै तुमको पैसा दुन्गा..' एक घाणेरडं हास्य चेहऱ्यावर दिसत होतं .. 'बस उसके बदलेमे मुझे खुश कर दो..' ती घाबरून गेली पण काम तर करायचेच होते. थोडा धीर दाखवून म्हणाली , " म्या गलत काम नाही करणार. मले माह्या कामाचे पैसे दया नायतर मी मालकाजवळ सांगण. आनं तुमी समजता काय आमी गरीब झालो म्हाण तुमी काय बी केलं त चालते काय? आमाला बी आमची अब्रू हाय. आमी काम करतो मरमर मरतो इथिसा तवा कुटं पैका हाती लागत्यात ,आन तुमी ..!! आमाला बी मान हाय. काम करतो मनान काय आमी रस्त्यावर नाय पडल्यान..!! ठोकर मारतो अशा ह्या कामावर.. ,नाय पायजे तुमचं काम .. पैका दया माह्या पह्यले.


अशा दोन गोष्टी सांगून ती पैसे घेऊन निघून गेली. तिचंही बरोबर होतं कारण ती काम करीत होती त्याचे ती पैसे घेत होती. आपल्या हक्काचे पैसे….!! अशा वागण्याने तिच्या सन्मानाला ठेच पोहोचली होती. काम करणारी झाली म्हणून त्यांना मान नको का..त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy