Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vasudev Patil

Tragedy


2.5  

Vasudev Patil

Tragedy


🙏रिती घागर 🙏 भाग::--

🙏रिती घागर 🙏 भाग::--

3 mins 1.3K 3 mins 1.3K

रात्रभर चंदनला झोप नव्हतीच तरी शनिवार असल्यानं त्याला सकाळी लवकरच उठावं लागलं. पावसाला खंड तो नव्हताच. मुलं एक एक करत शाळेत येऊ लागली. चंदन अंघोळ उरकत तयार झाला तोच दिनकर गुरुजी आले. गुरुजीकडं रात्री घडलेल्या प्रसंगाचा विषय काढावा की नाही? या द्विधा अवस्थेत त्याचं अध्यापनावर चित्त लागेना. अध्यापनाचा त्याला चार वर्षाचा बीडमधील विना अनुदानित संस्थेचा अनुभव होताच. पण आज त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतंच. मधल्या सुटीत पोरं खिचडी खात असतांना त्यानं रात्रीचा सारा प्रसंग दिनकर गुरुजींना कथन करत "हा चिन्मय कोण? व ती बाई कोण?" सवाल केला. "पोरा घाबरू नको ती चित्रा आहे. आपल्या मस्टरवर तुझ्या नावाच्या वर गैरहजर लावलेलं नाव जे आहे ती तीच चित्रा" दिनकर गुरुजीनं गळणाऱ्या आभाळाकडं नजर फिरवत सांगितलं. "गुरुजी सारा प्रकार काय ते बयाजवार सांगा ना?" चंदननं विनंती केली. तोच शाळेसमोरुन पडत्या पावसात एक जोडपं एका बाईला आपल्या सोबत चालण्यासाठी विनवत होतं. तर ती बाई त्यांना न जुमानता नाथबाबाच्या घाटाकडं बोट दाखवत होती. " आरती, तुझ्या घरी होती का चित्रा? तुझी ताईही ही चार दिवसापासुन दिसत नव्हती म्हणून विवंचनेत होती! "गुरुजीनं बाईला विचारलं "नाही दादा सावरपाड्याला आलीच नाही . काल ताईचाच निरोप आला म्हणून आम्ही दोघं कालपासून शोधत होतो तर पहाटे यांना नदीवर आरोळी ऐकु आल्याच समजताच तसच निघालो व दूर घळईतनं आणलं. सांगा तुम्हीच ऐकतच नाही घरी यायचं. "बाईनं सांगितलं. "आता आधी तिला घरी ने कापडं बदलून जेवण खाऊ घाल मगच जा गावाकडं" गुरुजीनं त्या बाईला सुचवलं. " चंदन पोरा, तुला रात्री दिसलेली हीच ती चित्रा मॅडम" तेवढ्यात मुलांनी बेल दिली. चल तुला दुपारी सांगतो सगळं निस्तवारीनं म्हणत दोघं आपापल्या वर्गाकडं निघाले. दुपारी शाळा सुटताच दिनकर गुरुजी चंदनला घरी बोलवू लागले " गुरुजी उद्या रविवार सुटी म्हणुन धरमपूरला जाऊन येतो अजितकडं" चंदननं सांगितलं. " आरं बाबा काल नाथबाबाच्या घाटात दरड कोसळली. वाहतूक बंद आहे रस्ताच ब्लाॅक झालाय. चल घरीच तिकडंच जेवण कर". हे ऐकून चंदनचा नाईलाज झाला व तो छत्री घेत पाड्यावर दिनकर गुरुजी सोबत निघाला. "चंदन, हा अरुण माझा पुतण्या. जवळच सावरपाड्यात आश्रमशाळेत कारकून आहे व ही आरती त्याची पत्नी. चित्रा मॅडमची धाकटी बहिण", गुरुजीनं परिचय करुन दिला. चित्राच्या अंगावर आता अंघोळीनंतर नविन साडी होती. केस विंचरलेले होते. चंदन चित्राला पाहताच थक्क झाला. अप्रतिम सौंदर्य. जगाचं, आपल्या अस्तित्वाचं भान हरवलेलं सौंदर्य पाहणाऱ्यासच भान हरवायला लावत होतं. आपण एकसारखं पाहतोय हे जाणवताच चंदननं आपली मान वळवली . आता आरती चित्राला खाऊ घालत होती. पण चित्रा तिसरीकडंच पाहत होती. तिचं लक्ष ना आरतीकडं होतं, ना जेवणाकडं. ताईनं ताट करताच जेवणं उरकून दिनकर गुरुजी नं पुन्हा सांगायला सुरुवात केली. "पोरा, ही चित्रा आपल्याच शाळेत होती. अतिशय हुशार, कामसू, व पाड्यावरील साऱ्यांना मदत करणारी म्हणून साऱ्यांची आवडती. पण मागच्या आषाढी एकादशीलाच हिचं ज्याच्याशी लग्न होणार होतं त्या चिन्मयचा नाथबाबाच्या घाटात मंदिराजवळच बुलेटवर अपघात झाला व पोरीचं संतुलन बिघडलं. "गुरुजीला हुंदका दाटून आला. बोलणं अवघड जाऊ लागलं. चित्रा आता उठुन बाहेर जात होती. आरती, ताई, अरूण सारे तिला धरत घरात ओढत होते पण ती न जुमानता बाहेरच पडत होती. " जाऊ द्या ती ऐकणार नाही. अंगावर काही पांघरायला द्या "दिनकर गुरुजीनं सांगताच आरतीनं शाल अंगावर टाकली. "अकरा महिन्यापासून ही पोर त्याच्या वियोगात दिवसभर नाथबाबाच्या घाटात फिरत राहते कधी मंदिराजवळ, तर कधी नदीकाठानं थेट घळईत, जंगलात कुठं ही भरकटत राहते. रात्री अपरात्री केव्हाही शाळेजवळ येते तर कधी स्टॅण्ड वर दिसलीच की मग आम्ही, ही आरती वा पाड्यातला कोणताही माणुस तिला बळजबरीनं खाऊ घालतो. तेही दोन तीन दिवसात दिसते. कधी कधी ती जंगलातील फळं खाऊन फिरतच राहते. अकरा महिन्यापासून शाळेत रात्री मुक्कामाला कुणीच थांबत नव्हतं काल तु थांबला व तिला शाळा उघडी दिसली म्हणुन ती आली असावी. "गुरुजी पण काही ट्रिटमेंट घ्यायला हवी होती?" चंदननं विचारलं. "भरपूर प्रयत्न केले साऱ्यांनी पण व्यर्थ. पोरा पोटच्या पोरीपेक्षा जास्त लळा लावला होता तिनं मला, गावालाहीमग आम्ही केलं नसेल असं वाटतं का तुला?" "गुरुजी नाही माझा म्हणण्याचा हेतू तसा मुळीच नव्हता". चित्रा पडत्या पावसात निघून गेली. आरती ही हुंदका दाबत तशीच गेली. चंदन सुन्न झाला. पाऊस पडतच होता. आता चंदनला रात्री जी भिती वाटत होती ती मनातून निघून गेल्यानं तो ही आराम करून संध्याकाळी शाळेत परतला. आता शाळा त्याला उदास वाटू लागली. पावसात भिजलेलं वडाचं, आंब्याचं झाड भकास व काही तरी दडपण घेऊन उभी आहेत


Rate this content
Log in

More marathi story from Vasudev Patil

Similar marathi story from Tragedy