kusum chaudhary

Inspirational

3.5  

kusum chaudhary

Inspirational

रेशीमबंध

रेशीमबंध

2 mins
325


   मोहन आता एम .बी. बी. एस .शिकून डाॅक्टर झाला . आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मोहनचे बाबा म्हणाले' आता" दोनाचे चार हात कर बाळा ," मोहन गालातल्या गालात हसला. आणि लाजला. मोहनसाठी वधूसंशोधन सुरू झाले. बऱ्याच मुली पाहिल्यानंतर मोहनला शेजारच्या गावातील लक्ष्मी एम .बी .बी.एस झालेली ,गोरीपान, घारे डोळे असलेली पसंत पडली. पहिल्या कटाक्षातच लक्ष्मी मोहनच्या नजरेत भरली .मोहनने होकार दिला. लक्ष्मीच्या आई वडिलांना मोहनच्या घरी बोलावले. मोहनचे घरदार लक्ष्मीच्या बाबांनी पाहिले. आणि त्यांना खूप आनंद झाला.मोहन आणि लक्ष्मीचा जोडा म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणच ! मोहन तर खूपच आनंदात होता . मनासारखी मुलगी मिळाली म्हणून ! लग्नाची बोलणी ठरली साखरपुडा निश्चित झाला.ठरलेल्या तारखेला साखरपुडा झाला. आणि दोन महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली. 


  रोजच मोहनचे आणि लक्ष्मीचे फोनवर बोलणे चालू होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले. आणि अचानक लक्ष्मीच्या पोटात दुखू लागले. लक्ष्मीला डाॅक्टरांकडे नेले औषध गोळ्या दिल्या . पण काही फरक पडत नव्हता. जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या डाॅक्टरांकडे नेल्यावर सोनोग्राफी केली .आणि लक्ष्मीच्या पोटात गाठ होती . गाठीचा तुकडा काढून बायोप्सीसाठी पाठवला . लक्ष्मीला कॅन्सरचे निदान झाले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सगळ्यांना एकच धक्का बसला. काय करावे आता? लक्ष्मीच्या आई बाबांनी मोहनला सांगितले, फक्त साखरपुडा झाला आहे .तुम्ही लग्न मोडून टाका.‌ आम्ही लक्ष्मीला सांभाळून घेऊ ‌. मोहनच्या आई-बाबांनीही तोच विचार केला होता.


    पण मोहनने या गोष्टीला साफ नकार दिला आणि मोहन म्हणाला. मला कॅन्सर झाला असता तर. किंवा लग्न झाल्यावर झाला असता तर.. मीकाय केले असते? ते काही नाही ! ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांनी लग्न झाले. मोहन रोज लक्ष्मीची काळजी घेत होता. असे दिवसामागून दिवस गेले. असे दहा

वर्ष गेले पण मोहनला वाईट वाटत नव्हते की माझे आयुष्य वाया गेले की काय? उलट तो आता लक्ष्मीची जास्त काळजी घेत होता. लक्ष्मी दिवसेंदिवस आजाराने खंगत चालली होती गोळ्या औषधींचा काही उपयोग होत नव्हता आणि याच कॅन्सरने लक्ष्मी मोहनला सोडून देवाघरी गेली.


मोहनने लक्ष्मीशी जुळलेले रेशीमबंध शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष्मीला साथ देऊन घट्ट केले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational