Varsha Gaikwad

Tragedy

4.5  

Varsha Gaikwad

Tragedy

पुरुषी मानसिकतेचा विद्रुप चेहरा

पुरुषी मानसिकतेचा विद्रुप चेहरा

2 mins
275


पुरुषी मानसिकतेचा विद्रुप चेहरा

जन्माला आल्यापासूनच "तिच्या" मनात "त्या" च्याबद्दल भिती निर्माण केली जाते. तो "पुरुष" तिच्या आयुष्यात बाप म्हणून येतो. कधी दरारा दाखवतो तर कधी मायेने जवळ घेतो. भावाच्या भूमिकेत असताना भांडतो, खेळतो. नवऱ्याच्या भूमिकेत असतो तेव्हा सर्वस्व देतो. आजोबा, काका, मामा, मेव्हणा, मित्र ही भूमिका बजावत तो तिच्याच पोटी मुलगा म्हणून जन्माला येतो. तिला तिच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.


पुढे जाऊन तोच मुलगा तिच्यावर अत्याचार करतो, मारहाण करतो, "तुला काहीच कळत नाही" असं म्हणतो. तेव्हा तिला तिच्याच अस्तित्वाची घृणा वाटू लागते. पुरुषी मानसिकतेची भिती वाटू लागते.


खरंच, पुरुषांची मानसिकता नेमकी काय असते? त्यामागील एक विद्रुप चेहरा म्हणजे विकृतीच ना?


छळणे, मारणे, जाळणे, बलात्कार करणे हा पुरुषार्थ वाटतो काय त्यांना? स्वतःच्या मुलीवर, बहिणीवर, आईवर देखील ही विकृत जमात अत्याचार करते तेव्हा त्यांना जराही लाज वाटत नसावी का?


लहान कोवळ्या मुलींनादेखील त्यांची वखवखली नजर न्याहाळत असते. किती निर्लज्ज मनोवृत्तीचे असतील ते.

ज्या हाताने सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी देवींची तो पूजा करतो त्याच हाताने *मदांधपणे* एखाद्या स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करताना त्याचा हात थरथरत का नाही? जोर जबरदस्ती करण्यात कसला आला आहे पुरुषार्थ?


समाजात वावरताना असे कितीतरी घाणेरडे हात आणि बेरकी, वासनांध नजर स्पर्श करून जाते देहावरून. प्रत्येक स्त्री जातीला याचा अनुभव एकदा का होईना पण येतोच येतो. आपल्या *क्षयिष्णु* शरीराचे *लंघन* करतं ती जमेल तसं स्वतःला वाचवत असते परस्पर्शापासून. तरिही ती घाणेरडी नजर तिचा पाठलाग करतच असते.


आजकाल तर ऑनलाईन मैत्रीने कळस गाठला आहे. *सचोटीने* वागणारा, बोलणारा तो पुरुष मित्र. मैत्रीचा कळस गाठत असतानाच जोरदार धक्का देतो. "तुझा फोटो दाखव" म्हणत किळसवाणे चाळे करून, हळूहळू शब्दांची गलिच्छ पातळी गाठत स्वतःच्या स्वभावाचे *यथ्यार्थ* दर्शन घडवतो.


"मी म्हणेन तेच खरं", "माझा शब्द शेवटचा शब्द", "तुला अक्कल नाहीये". "तुला काहीच कळत नाही". असं म्हणत तिच्यातल्या आत्मविश्वासाला डळमळीत बनवलं जातं. विश्वासाला तडा जाईल असं पुरुषी वागणं स्त्रीला मुळापासून उपटून काढतं.


तिच्या हातून नकळत जरी चूक झाली तरी तिलाचं दोषी मानलं जातं. आणि त्याने मोकाट वागून कितीतरी जणींना फसवले तरी तो ताठ मानेने राहतो. व तिला पायताण समजतो.


कितीही प्रगती होऊ द्या. स्त्रीला तिचे अधिकार मिळू द्या, त्याच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात तिने प्रगती करु द्या. तरिही पुरुष नावाच्या विकृत मनोवृत्तीला आवाहन करणे तिला जमेल का? की तिची निर्भया होईल. हा प्रश्न शेवटी उरतोच.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy