Varsha Gaikwad

Tragedy Others

2  

Varsha Gaikwad

Tragedy Others

जेव्हा साहित्याची चोरी होते...

जेव्हा साहित्याची चोरी होते...

2 mins
104


शांत एकांत असो वा गजबजलेला लोकलचा प्रवास, मन मात्र सतत काहीतरी शोधत असतं. बुद्धीला खुराक मिळवून देण्यासाठी. त्याचवेळी जर एखाद्या शब्दाची लय हाताला लागली की आपसूकच एकामागे एक अर्थपूर्ण शब्दांचा ओघ सुरु होतो आणि लेखणीतून शब्दांना कागदावर (हल्ली भ्रमणध्वनीच्या माध्यमातून) उतरवलं जात नि एका नव्या कल्पनेतील, सत्यातील, मनातील भावविभोर साहित्य जन्माला येते. 


आपल्या रचनेच कौतुक झालेलं कोणाला नाही आवडत बरं. पण जेव्हा आपल्याच साहित्याची चोरी होते तेव्हा मन फार दुःखी होतं आणि कळस म्हणजे आपलंच साहित्य कुणी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने छापलेलं असेल तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. का करतात ही लोक साहित्याची चोरी? कसला आनंद मिळत असेल यांना? विकृती म्हणावी का ही?  


एखाद्याच्या रचनेतील एखादा शब्द वाचनात आला तर आपसूकच आपल्या रचनेत गुंफला जातो. पण जाणीवपूर्वक काही लोक आख्खीच्या आख्खी कडवी आपल्या रचनेत घेतात. का असं करतात बरं ही मंडळी? आजकाल तर छोट्या छोट्या गोष्टीत व्यवहार ठाण मांडताना दिसतोय. खरयं ना? एका हाताने द्या दुसऱ्या हाताने घ्या. मग ते प्रेम असो, पैसा असो, वस्तू असो, नातं असो वा साहित्य. मैत्री तरी कुठं सुटलीय म्हणा यातून. निस्सीम भावना आपल्या जागी असाव्यात. व्यवहार आपल्या जागी. पण इथे भावनांचाही व्यवहार होताना दिसतोय. स्पर्धेसाठी एखाद्या विषयावर लिहायला नाही मिळालं तर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगायचं लिहून द्यायला आणि त्या दोस्तांची रचना स्वतःच्या नावाने पाठवायची. खरं तर हीपण एकाप्रकारे साहित्याची चोरीच म्हणावी लागेल पण त्या मालकाची मान्यता मिळवलेली. काय फायदा होतं असेल बरं यात त्या व्यक्तीचा. जरी सन्मान झालाच तर त्या रचनेचा होतो. रचना लिहिण्याऱ्याचा होतो. यामध्ये त्या रचनेखालील नावाचा संबंध नसतानाही संबंध येत असला तरीही. कालांतराने मूळ रचनेचा मालक जेव्हा प्रकाशात येईल तेव्हा किती नाचक्की होऊ शकते आपली? जोडलेली किती नाती दुरावू शकतात? याचा जराही विचार त्या व्यक्तीच्या मनात येतं नाही का? ज्या व्यक्तींच्या मनात आपण स्थान निर्माण केलंय त्याला कळालं तर कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील ते आपल्याकडे? याचा सारासार विचार देखील त्या व्यक्तीच्या मनात येतं नसेल का?  


आजकाल समाजमाध्यमातून चोरांचा सुळसुळाट झालाय हे ही तितकंच खरं आहे. यावर उपाययोजना काय करता येईल? तर एकच करू शकतो आपण आपलं साहित्य कमीत कमी या समाजमाध्यमांवर टाकावं. इतकंच मला तरी वाटतं. या माध्यमातून साहित्याची चोरीदेखील होते अन चोरही पकडला जातो. ओळख पटते. पण चोराला थांगपत्ता नसतो की, आपल्या चुकीमुळे आपण आपल्याच माणसाच्या नजरेतून उतरलो आहोत अगदी कायमचंच. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy