पर्यावरणविषयी निसर्ग
पर्यावरणविषयी निसर्ग
हिरवे हिरवे गार गालिचे हरीत त्रृणाच्या मखमालिचे.
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.
किती सुंदर कल्पना आहे ना ही कवीची.आपण नुसती कल्पना केली तरी आपणच त्या फुलराणी जागी हिरव्यागार गवताच्या गालीच्यावरती खेळत आहोत असच वाटते. पण आताच्या 21 व्या शतकात हे हिरवे गालिचे फक्त मोठ्या बंगल्या भोवतीच दिसतात.त्यावर फुलराणीच काय पण साध फुलपाखरू सुध्दा खेळु शकत नाही.म्हणजे त्यालाही परवानगी नाही तेथे यायची.कारण ते फक्त शोभेचे आणी खर्चिक गालिचे आहेत. कारण ऐकच निसर्गाचा होत चाललेल खच्चीकरण.
हा निसर्गच फक्त वाढत चाललेल प्रदूषण थांबवु शकत. मोठ मोठाल्या ऊंच ईमारती आणी विविध कारखाने,वाढती वहान संख्या. या सर्व गोष्टींमुळे पर्यावरणाच संतुलन ढासळत चाललय.परीणाम म्हणुन हवेतील ओझेनचा थर कमी होऊ लागलाय.त्यामुळे असंख्य आजार जन्म घेऊ लागलेत.श्वास घ्यायला त्रास होऊ लागलाय.याला जबाबदार आपणच म्हणजे सुजाण नागरीकच आहोत.
आख्खी जंगलाच्या जंगलं उध्वस्त होऊ लागलेत.परीणाम म्हणुन पाऊस हवा तसा पडेना.पडला तरी हा पाऊस जगण मुश्कील करू लागला आहे.निसर्गाचा पुर्ण समतोल ढासळत चाललाय.महामारी,महागाई,गरीबी,चोऱ्या,लुटालुट वाढत चालली आहे.याला जबाबदार पुन्हा आपणच सुजाण नागरीक.
तुम्हाला आठवतय पुर्वी टी.व्ही वरती ऐक गाण लागायच "दरी,खोर्यात खुलते
:तु ग राणजाई
भोळा शंकर भुलोबा....
त्याची तु भुलाबाई.
कस ऐकुनसुध्दा भारी वाटायच.आता कुठे दरी आणी खोरे जास्त राहीलेत.निसर्गाने आपल्याला भरभरून सौंदर्य दिलय.पण आता नकली सौंदर्य पहायला कितीतरी कि.मी.दुर जाऊन पैसे मोजावे लागतात.तरी डोळ्याच पारण फिटत नाही. वेळीच स्वतः सावधान व्हा आणी पुढच्या पिढीला सावध करा.'झाडे लावा झाडे जगवा' या फक्त घोषणा न देता सत्यात ऊतरले पाहीजेत.आजच्या पिढीला निसर्गाचे फक्त फोटो स्टेटसला टाकायला आवडतात.पण ते निसर्न सौंदर्य ऊभ करता आल पाहीजे हे पठवुन द्या.
शेतकरी सुखी तर पुर्ण जग सुखी हे लक्षात ठेवा.आणी तो बळीराजा सुखी होण्यासाठी पाऊस गरजेचा आहे.तो वेळेवर बरसण गरजेच आहे.हे फक्त निसर्ग जपला आणी वाढवला तरच शक्य आहे. प्रदूषण टाळा.सायकल चा वापर जास्त करा.जागा दिसेल मोकळी तिथ ऐक तरी झाड लावा. चला तर मज आजच शपथ घेऊ माणसी ऐक तरी झाड लाऊ. आणी हिरवे हिरवे गार गालिचे खरे खुरे उभे करू. डोंगर, दर्या ऊंच वाहणारे धबधबे रंगीबेरंगी डौलदार फुले फक्त सिनेमा मधेच न पहाता सत्यात ऊभे करू आणी पुढच्या पिढीच आरोग्य सुरक्षीत करू.
आता आपण सर्वजण कोरोना संकटात आहोत.पुर्ण जगच या संकटाशी दोन हात करतय.हा आजार घालवायला सरकारही शर्तीचे प्रयत्न करतय.पण तुम्हाला माहीत आहे का.मुळशी तालुक्यात ऐकही कोरोणा पेशंट नाही एखादा अपवाद वगळता.याच कारण ऐकच तिथल्या जनतेन खबरदारी तर घेतलीच पण निसर्गाची जपणूक जास्त प्रमाणात केली.
चला तर मग हा मुळशी पॅटर्न सगळीकडेच राबविण्यात हातभार लावूयात.
एक तरी झाड लावू या हो
एक तरी झाड जगवू या
