VINAYAK PATIL

Inspirational Others

3.5  

VINAYAK PATIL

Inspirational Others

पर्यावरणाचे महत्त्व

पर्यावरणाचे महत्त्व

1 min
156


पर्यावरणाचे महत्व आपण सर्वजण जाणतोच. मात्र सध्या दिवसेंदिवस निसर्गाचा आणि पर्यायाने पर्यावरणाचा तोल ढासळत चालला आहे. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू पर्यावरणाचं रक्षण करणं, पर्यावरणाचे संवर्धन करणं आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणं हा आहे. निसर्ग डोळ्यांना दिसतो मात्र त्याच्या आतमध्ये असणारी नैसर्गिक व्यवस्था जी आपल्याला डोळ्यांना पाहता येत नाही तिला पर्यावरण असं म्हणतात. माणूस हा देखील या पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे त्याचे जीवन निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट माणसाच्या जीवनावरदेखील होत असतो. वास्तविक माणसाने निसर्गात केलेल्या हस्तक्षेपामुळेच आज पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. म्हणूनच प्रत्येकाने आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं झालं आहे

पर्यावरण वाचवा जीवन वाचवा


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational