STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy Others

2  

VINAYAK PATIL

Tragedy Others

कोरोना - आयुष्याची व्यथा

कोरोना - आयुष्याची व्यथा

1 min
119

आयुष्यात कधी वाटलंही नव्हतं असा ही एक आजार येईल ज्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन जाईल. वाटलही नव्हतं कधी की असं ही लॉकडाऊन येईल ज्या मध्ये माणूस माणसापासून दूर जाईल. माणसा - माणसातल अंतर इतकं वाढत जाईल की ज्याने माणसातील माणुसकी पूर्णपणे संपून जाईल. वाटलंही नव्हतं कधी की माणूस आपल्याच घरात असा बंदिस्त होईल आणि सर्व पक्षी प्राणि मात्र खुल्या निसर्गात मुक्त विहार करतील.

वाटलंही नव्हतं कधी की आयुष्यात आपल्या जवळचे परके होतील भेटीच्या ओढीचे अंतर आपोआपच मिटले जाईल. या काळात परमेश्वराच्या रूपाने देव माणसे भेटली. ज्यांनी सर्वांना त्यांच्या वाईट काळात मदत केली पण काही लोकांनी आधाराचा धीरसुद्धा दिला नाही. दिवस लोटत गेले कुणी लोकांचे हाल विचारीना ना लोकांचे सांत्वन करेना या भल्यामोठ्या जगात कुणीच कोणाचे नाते पाळेना. असे कसे हे जीवन जगणे आले जिथे एकमेकांवरील रुसवे-फुगवे ही थांबले असे कसे हे मन बेचैन झाले आता सर्व काही थांबेल की काय हेच मनात रुजले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy