प्रवासवर्णन
प्रवासवर्णन
यस्तु संचरते देशान् यस्तु सेवेत पण्डितान्।
तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलबिन्दुरिवाम्भसि।।
आपल्या संस्कृतीमध्ये ही पर्यटनाला महत्वाचे मानले आहे. वरील श्लोकानुसार जो व्यक्ती वेगळ्या देशात , पर्यटन स्थळांना भेटी देतो त्या त्यक्तीची ब बुद्धीही तशीच सुंदर होते . जशी तेलाचा एक थेंब पूर्ण समुद्रावर पसरतो . तसाच पर्यटन आपल्याला अनेक प्रकारे ज्ञान देतो.
सफर में है एक नई जिंदगी
घुमते रहो! घुमते रहो !
फिरायला कोणाला नाही आवडत . गावकडचा असो वा शहराकडचा प्रत्येक व्यक्तीला भटकंती करने मनापासुन आवडते . अशाच एका आठवड्याच्या शेवटी आम्हां बंधु -बहिनीची सहल निघाली समुद्राच्या ओढीने .
दक्षिण काशी म्हणुन समजले जाणारे "हरिहरेश्वर " आपल्या सर्वांच्याच आवडीचे ठिकाण आहे . जेथे सागरा सावित्री मिळते , त्रिदेवांचे वास्तव तेथे नांदते . पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या पर्यटन स्थळाच्या अगदी जवळ आहे . कोकणात जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्व:ताकडे बोलावणारे हे ठिकाण अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेले आहे . तसेच पुणे व मुंबई इथल्या लोकांना हे अतिशय जवळचे पर्यटन स्थळ .
प्रवित्र तीर्थस्थान त्याच बरोबर निळा समुद्र , फेसाळणाऱ्या लाटा , गर्द वनश्रीने बहरलेले डोंगर , समुद्रात घुसलेले खडक व त्यावर आपल्या पुर्ण ताकतीने प्रहार करणाऱ्या लाटा , ज्या काळ्या कुट्ट खंडाच्या तळहातावर मेंहदी काढतात जणुकाही . असे नक्षीकाम त्या खडकांवर झालेले दृष्टीस पडते .
डोळ्यांचे पारणे फिटेल इतका सुंदर समृद्ध व संपन्न असा समुद्र किनारा .मनाला जाणीव करून देतो की जर हा खोल समुद्र या पृथ्वी वर नसता तर पृथ्वी कशी बेरंग दिसली असती .
कामात घाम निघालाच पाहीजे आणि घामाला थोडा आराम असलाच पाहिजे असे म्हणतात . मनाला व शरीराला आरामदायी करणारे आपले कोकण व त्यातील हरिहरेश्वर . शनिवारी रात्री दिवेआगर चा बीच करून आम्ही हरिहरेश्वर ला पोहचलो . रात्रभर एमटीडीसीच्या हॉटेल वर आराम केला . अतिशय उत्तम सोय व शांत असे हॉटेल फार छान झोप झाली.
सकाळी सुर्योदय होण्याच्या आधी आम्ही सर्व पंधरा जण समोरच्या उंच डोंगरातल्या गर्द झाडीमध्ये गुप्त झालो . पक्ष्यांचा किलबिलाट तसेच मंजुळ वाऱ्याची झुळूक अंगाला थंडावा देत होती .
जंगल सफारी झाल्यावर आम्ही गावात आलो . सकाळचे आठ वाजले होते परंतु तरीही भयाण शांतता पसरली होती . जसे हया गावात आमच्या शिवाय कोणीच नाहीये . चहा मिळाला व चहा घेऊन आम्ही सर्व समुद्राच्या भेटीला गेलो .
पांढऱ्या रंगाची वाळु आणि त्यावर वसलेली छोटी - छोटी चहाची दुकाने , तसेच नाश्त्याला ही तेथे छान सोय होती. सागराच्या किनारी बसुन गरम चहाचा व पोह्यांचा आंनद काही वेगळाच असतो .
छोट्या मुलांना घेऊन आम्ही किनाऱ्यावर गेलो.
वाळुमध्ये घर करुन बसलेले लहान लहान खेकडे जसे काही पाठीमागून येवून आम्हाला चावण्याची भिती घालत होते. त्याच खेकड्या सोबत मैत्री करत आम्ही पाण्यामध्ये मनसोक्त खेळलो . उगवत्या सुर्याच्या कोवळ्या उन्हात स्वःताला वाळवुन आम्ही होडीच्या सफारीला गेलो . शिवाजी महाराजांच्या नावाचा जय -जयकार करत खोल समुद्राला भेटुन परत खोली वर आलो.
प्रंचड दमलो होतो पण आता ओढ होती .
त्रिदेवांच्या भेटीची . सर्वांनी आंघोळी आटपून घाईघाईने निघालो मंदिराकडे . अल्हादायक हवा व त्यात थोडे चावणारे ऊन हा निसर्गाचा संगम मनाला भुरळ पाडतो . आणि त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतो. थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या परिसरात पोहचलो . जसे कौलारू घर असल्या सारखे ते मंदिर आहे . बाजार पेढा ओलांडून देवाच्या दारातील उंच पिंपळ दिसतो. तो पिंपळ इतिहासाच्या घटनांचा साक्षीदार आहे .
"वाटते मनी प्रश्न विचारावे त्याला
सांग कोण -कोण दिसले रे तुला
पाहिलेस का तु आमच्या पूर्वजांना
कोण -कोण भेट देऊन गेले हरिदेश्वरला "
मनातील अनेक प्रश्न घेऊन आम्ही त्या तीन पिडिंचे दर्शन घेतले . मदिरांच्या परिसरात थोडा वेळ मन शांत करून परिक्रमा पूर्ण केली.
हरिहेश्वरची परिक्रमा म्हणजे एक अद्वितीय अनुभव दोन डोंगराच्या कुशीतून एक छोटासा रस्ता त्याच्या त्या बारीक , घसरट अश्या पायर्या .
पायऱ्या उतरून गेल्यावर समोर फेसाळलेला समुद्र किनारा आणि काळ्या रंगाच्या खडावर काळी खेकडे . थोडे भितीदायक पण सुखद अनुभव देणारे वातावरण . परिक्रमा पूर्ण करून आम्ही सर्व फोटोच्या आंनदात किनारी भागात असलेल्या अनेक प्रकारच्या सोड्याचा आंनद घेत माघारी फिरलो . ( वाळा , जांभुळ , करवंद अश्या अनेक प्रकाराच्या जंगली मेवा चे ते सोडा प्रकार होते तसेच त्या सोबत तोडांला गोडवा व गारवा देणारे नारळ पाणी. )
परतीचा प्रवास सुरू झाला . शंकराला व मंद वाहणाऱ्या वाऱ्याला आणि अथांग अश्या समुद्राला
निरोप देत माघारी फिरलो . परतण्याची थोडी ही इच्छा नव्हती . परंतु परत संसाराचा गाडा बोलवत होता .
ताम्हीनी घाटात " शिवसागर " या पूर्ण पणे व्हेज अश्या हॉटेल मध्ये जेवण करून सर्वजन सुखरूप घरी परतलो.
जाताना गप्पांचा धुमाकुळ होता आणि येताना आनंदाचा समुद्र सोबत आणला होता.
ह्या सागराने आम्हां सर्व बंधु - बहिणांना अनेक वर्षांनंतर एकत्र येण्याची संधी दिली होती . आणि आम्ही ती जिंकली ही . आमचे पूर्ण प्रक्षिशित वाहनचालक तसेच मला सर्व ठिकाणांची माहिती देणाऱ्या सौ .निलम ताई. त्यांच्या मदतीमुळे ही थोडीसी सहल सफल झाली . आणि आनंदाची भरती आमच्या सर्वाच्या मनी नांदली.
