प्रवासवाटेतील जीवनशिक्षण
प्रवासवाटेतील जीवनशिक्षण


प्रत्येकाला आपली आठवडा सुट्टी कशी घालवावी हा प्रश्न असतो.आपल्या आठवडा सुट्टीत काही जण आपले छंद जोपसतात तर काही जण आपल्या परिवारासाठी वेळ देतात. मुंबईला असणारे माझे काही मित्र तर नेहमी सांगतात,"अरे ,आमची तर सुट्टी आराम करण्यातच जाते. आठवडाभर नेहमीची दैनंदिन दगदग,रेल्वेचा गर्दीतील प्रवास,ऑफिसचे कांम यामुळे आठवडा सुट्टीला निवांत आराम करावासा वाटतो. कुठे फिरणे झालेच तर मुलांसाठी काही शॉपिंग किंवा जवळच्याच बागेतून फेरफटका मारणे."
माझे काही शिक्षक मित्र सुट्टीत वाचन, टि.व्ही.पाहणे, एखादे जवळचे पर्यटन करताना दिसतात. चांगले वातावरण असल्यास जवळच असणा-या एखाद्या उंच टेकडीवर,किल्ल्यावर ट्रेकिंगला जाणे काहीजण पसंद करतात. काहीही असो जेंव्हा आपण आपला रिकामा वेळ घालवतो तेंव्हा प्रवास करत असतो. आज प्रवास करताना आपण या धकाधकीच्या जीवनात आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा विचार केलाच पाहिजे.रोज सकाळचे वर्तमानपत्र उघडल्यास आपणास अपघाताच्या बातम्या वाचावयास मिळतात.मन सुन्न होते आणि खरच जीवन हे क्षणभंगूर असल्याची प्रचिती येते.
गेल्या आठवडा सुट्टीत असेच कराड मार्गे कास पठारकडे फिरायलाआम्ही जात होतो.
सोबत अन्तू आण्णांही होते. मोटरसायकलने प्रवास सुरु केला. प्रवासात आम्ही थोडया थोड्या वेळाने थांबे घेतच होतो.
एके ठिकाणी मी अण्णाला म्हटल, "अण्णा,थोडे चहापान करु आणि निघू."
एका छोट्या हॉटेलपाशी आमची मोटरसायकल थांबली. आम्ही चहा घेत होतो. इतक्यात माझी नजर तिथे असलेल्या एका फलकावर गेली.मी अण्णाला म्हटल ,"अण्णा, जरा तो फलक वाचा."
फलकावर जीवनाचा सार होता. प्रवास करता करता जीवनवाट चालताना कशी चालावी हे तो सांगत होता. त्या हॉटेल मालकाना त्याबद्दल आम्ही धन्यवाद दिले.आम्ही त्या फलकाचा फोटो घेतला आणि तेथून पुढच्या प्रवासाला निघालो.पण त्या फलकावरचे विचार सोबत घेऊनच....तुम्ही ही घ्या बरं का हे विचार.