Shivani Hanegaonkar

Inspirational Others

4.3  

Shivani Hanegaonkar

Inspirational Others

प्रतिभाताई पाटिल

प्रतिभाताई पाटिल

1 min
622



इतिहासाचे जनक हिरोडोटस म्हणतो," भूूूतकाळातील

मंनोरंजक आणि संस्ममरणीय घटनाचा शोध

घेणे म्हणजे इतिहास होय." त्याचप्रमाणे थोर व्यक्तीचे चरित्र आणि त्यानी बजावलेली कामगिरी म्हणजे इतिहास अशी कार्लाईलने इतिहासाची 

व्याख्या केली आहे.हि व्याख्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना तंतोतंत लागू पडते.


प्राचीन काळामध्ये विदुषी, गार्गी, मैैत्रेयी,लोपामुद्रा ,भारती अशा विद्वान स्रीयांचा उल्लेख प्राचीन ग्रंथामध्ये सापडतो.मध्ययुगीन काळामध्येे रझिया सुलतान हि भारतातली पहिली मुस्लिम स्री राज्यकर्ती होवून गेली आहे.जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रजासत्ताक म्हणून भारताची गणना केली जाते.भारताने एवढी मोठी लोकसंख्या असूनही लो

कशाही टिकवून ठेवली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भारतीयांचा संंविधानावर असलेला विश्वास!


प्राचीन काळापासून आजतागायत भारतीय राजकारणामध्ये अनेक स्रियांनी आपलाअमीट ठसा उमटवला आहे.स्वातंत्र्यप्राप्तीनंंतर जया बच्चन, मायावती, वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी,उमा भारती, विजयालक्ष्मी पंडित या सर्व स्रियांनी राजकारणामध्ये आपला ठसा उमटवीलाा आहे.भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा मान खान्देश कन्या , विदर्भाची सून आणि तमाम महिलांच्या प्रेरणास्थान असणार्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ( शेखावत) यांना मिळाला.


या सर्वोच्च पदापर्यंत पोहचणार्या त्या भारतातील एकमेव व पहिल्या महिला ठरल्या आहेत.प्रतिभाताई भारताच्या पहिल्या व जागतिक क्रमवारीत ४१ व्या राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरानी कोरल्या गेले व अजरामर झाले.त्यांचेे बालपण पाहिले तर 'शूून्य अस्तित्व 'असाच उल्लेख त्यांच्या पूर्वआयुष्याचा करता येईल.पण यातून भरारी घेवून आपल्या 

कर्तृत्वाचा अमीट ठसा महाराष्ट्राच्या राजकीय,

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उमटविला.


राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना स्वकर्तुत्वाने श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी राजकारणात घेतलेली भरारी ऐतिहासिकच म्हणावी लागेल. २००७ मध्ये भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या हा भारतीय स्री शक्तीचा विजयच म्हणावा लागेल..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational