" प्रेमातलं जग "
" प्रेमातलं जग "
7तसं पहायला गेलं तर मंजिरी ही वयाने पार बत्तीशी गाठलेली मुलगी. कित्येक वेळा तिचं लग्नही जमलं आणि मोडलं सुद्धा. कारण आहे तिचा तर्कट स्वभाव.आणि अशाच स्वभावाचा गावठी रांगडा अगदी पैलवानासारखा दिसणारा अथर्व नुकताच कुणीही न विचारणारी बी.ए. ची डिग्री घेऊन बाहेर पडलेला एक भोळा भावडा गावठी कुच्चा. रोजचा दिवस नुसता झोपण्यात घालवायचा. तो इतका रिकामटेकडा होता की आजचा दिवस कसा जाईल या विचारात तो असायचा.
अथर्वच्या घराच्या जवळ...मंजिरीचही घर होतं पण अथर्व आणि मंजिरी यांचं कधीच बोलणं नाही व्हायचं. कारण मंजिरीचा स्वभाव गलीतल्या बारक्या लेकराला पण माहित होता. नुसतं कुणी तोंडाकड जरी बघितलं तरी मंजिरी शिव्या द्यायची...मनुन कुणाचीच नजर तिच्यावर जायची नाही...
पावसाळ्याचे दिवस होते. पावसाचा काय नेम नसायचा.
एके दिवशी असाच अचानक पाऊस सुरू झाला. ते दृष्य म्हणजे अगदी लक्ष वेधणारं होतं. आभाळ म्हणजे जणू छतासारखं भासत होतं. पावसाच्या धारा आभाळाच्या छताच्या छिद्रांतून...टपटप...करत पानावर वाजत होत्या.
इंद्रधनुष्याचे सप्तरंग जणू खळखळणा-या पावसाच्या पाण्यावरुन नागमोडी वळणे घेत अथर्वच्या दारासमोरच्या अंगणात जणू स्पर्धेत उतरल्यासारखे धावत होते. पावसात वरुन पडणा-या गारा आणि बेडकांची डराव डराव...अथर्व अगदी उत्साहाने दरवाज्यात उभारून त्या दृष्याची छायाचित्रं नजरेच्या कॅमे-यात साठवत होता.आणि अगदी मंजिरीही.....
या नयनरम्य नजा-यात अंगावरच्या " घामोळ्या " जाव्या म्हणुन अथर्व त्या पावसात भिजायला...घराबाहेर पडला...
अंगावरची कपडे काढून बाहेर निघताच...त्याच्या तोंडून आवाज आला....अहा....लयभारी....पावसाच्या धारा जणू त्याच्या शरीरावर गुदगुल्या करत होत्या.
तसंच मंजिरीची नजर उघडा भिजणा-या अथर्ववर पडली. या पावसाचा आनंद घेण्या मनसोक्त उघडा भिजणारा अथर्वला बघून...मंजिरी..पार वेडीच झाली...
नजरेला नजर भिडली
अन्
ति भेटली त्याला
नजरेला नजरेचा स्पर्श झाला..
तो ही.....अगदी....ओला....
मग ते दोघेही एकमेकांकडे हळूहळू..चोरुन चोरुन बघू लागले...हळूहळू दोघांच्या नजरेला नजर भिडू लागली...
आणि मग....
मग....काय व्हायचंय ते....झालंच....अचानक अथर्वच्या जीवनात बदल घडू लागल
ा...
नेमका नाही पण...अथर्वच्या घरच्यांच्या लक्षात तो अथर्वचा बदल येत होता...
शांत...निवांत...झोपणारा अथर्व तिच्या विचारांत रात्र रात्र जागून...भविष्यातली स्वप्ने रंगवू लागला...
हा...पण मंजिरीने अथर्वपेक्षा चार-पाच पावसाळे जास्त खाल्ले होते...काय हो प्रेमात लोकं खरच अंधळी होतात...दोघांनाही एकमेकांचं आकर्षण,भेटीची ओढ सगळं काही...दोघांच्याही अगदी मनासारखं व्हायचं.
मग काय....
एक दिवशी मंजिरीने हिम्मत केली मोठी .
चिठ्ठी लिहून मनातल्या भावना...कागदावर कोरल्या. सुरुवात झाली चिठ्ठीने...मंजिरीचं माहित नाही पण...अथर्वचं हे पहिलंच प्रेम..अथर्व चिठ्ठी पाहून जणू बावरून गेले.त्याचा आनंद गगनात मावेना. तो त्या दिवशी खुप खुश होता. मग काय...त्या चिठ्ठीचं उत्तर लिहायला अथर्वला आठ दिवस गेले.आठ दिवसांनी मग अथर्वला त्याच उत्तर चिठ्ठीनेच कळवलं...मग हळूहळू त्याच्या प्रेमाची बैलगाडी हळूहळू ...मोबाईल पर्यंत पोहोचली...अथर्व जरी तब्बेतने जरी भरगच्च असला तरी तो खुप घाबरायचा...कारण त्याच पहिलंच प्रेम होतं...या दोघांच्या प्रेमात सर्व काही मंजिरीपासुनच सुरुवात झाली. मग मंजिरीने अथर्वचा मोबाईल नंबर मागितला...
मग हा मामला मोबाईलवर मेसेजने फक्त चालतच नव्हता..तुरुतुरु पळायचा...
एकमेकांना मेसेज पाठवल्याशिवाय सकाळ व्हायची नाही आणि रात्रही व्हायची नाही...तासंन तास बोलनं चालायचं...
सगळी दुनिया झोपलेली असायची तवा या दोघांची...भेट नित्य नेमानं चुकायची नाही...
ते दोघे रोज रात्री भेटायचे...
एकमेकांच्या अंगालाही खेटायचे...
एकमेकांच्या सुख दुःखाला
जणू.....
कानात सांगत सुटायचे
एकमेकांच्या स्पर्शाने
ते दोघेही नटायचे....
लपून छपून...सांगा आता किती दिवस भेट चालणार ही...
प्रेम करणारांचं एक वेगळंच जग ...एक वेगळीच दुनिया असते...त्यांना कुणाचंच भान नसतं...ते आपल्याच विश्वात असतात. सगळं जग एका बाजुला आणि हे प्रेमवेडे एका बाजुला...
TO BE CONTINUE......
पुढची कथा.....प्रेक्षकांच्या प्रेमावर अवलंबून आहे
...जसं जसं प्रेक्षकांच प्रेम प्रतिसाद मिळेल. तसं मी पुढची कथा लिहतो...धन्यवाद...
please...like , Share & Follow