पहिलं प्रेम...
पहिलं प्रेम...
शाळेत असतानापासून ती त्याला ओळखत होती. तिला तो आवडत होता तेव्हापासून. कधीच दोघ बोलले नव्हते. मग दहावी ची परीक्षा आली. आणि योगायोगाने तो आणि ती दोघांचे नंबर एका माग एक आले. ती फार खुश झाली होती. तेव्हा ती त्याच्याशी पहिल्यांदा बोलली होती. दोघंही एकमेकांशी बोलते होते. त्याच्या मनात तस काहीच नव्हत. पण तिला तो आवडायचा. दहावी ची परीक्षा झाली. दोघांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली होती. पण नाही म्हणलं तरी थोडा जुनाच काळ होता तो. तेव्हा मोबाईल नव्हते जास्त कोणाकडे. आणि लगेचच ती त्याचा नंबर कुठे मागणार. परीक्षा संपली आता सगळे परत कधी भेटणार माहीत नव्हत. पण तिला मात्र त्याला भेटायचं होत. आणि आपली भेट परत होईल असं तिला वाटतं होत आणि ते खर झाल. एका वर्षांनंतर तिची आणि त्याची भेट झाली. भेट तशी ५ मिनिटांचीच होती. पण तिच्या मनाला जे वाटलं होत ते खर झाल याचा तिला जास्त आनंद झाला होता. तो तिच्याशी बोलला आणि निघून गेला. पण तिने मात्र ठरवलं. हा आता मला परत भेटला की मी याला माझ्या मनातलं सांगितल्याशिवाय राहणार नाही. वेडी होती ती तिला वाट बघण आवडायचं. ती वाट बघत होती. आणि चार वर्षांनंतर पुन्हा तिला त्याची चाहूल लागली. तिच्या वर्गातल्या एका मैत्रिणीने एक व्हॉटसअप ग्रुप तयार केला. दहावीच्या वर्गातील सर्वजण होते त्यात. ती पण होती. त्यात सगळे एकमेकांशी बोलत होते. खूप दिवसांनी सगळे अचानक कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर सगळे खूप खुश होते. पण ती मात्र त्याचा नंबर शोधण्यात व्यस्त होती. आणि तिला त्याचा नंबर भेटला. तिचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने त्याला मेसेज केला. तो तर तिला विसरला पण होता. पण तिने पुन्हा तिची ओळख करून दिली. तो तिच्याशी बोलायला लागला. मग तिने त्याला तिच्या मनातल सांगितलं. तो तिच्याशी बोलायला लागला नेहमीपेक्षा थोड जास्त. तो खूप प्रामाणिक होता. ५ वर्षांनंतर ते बोलत होते. तोपर्यंत त्याचा भूतकाळ तयार झाला होता. त्याने तो सगळा तिला सांगितला. तिलाही तो मान्य होता.त्यांचं बोलणं चालूच होत. मग थोड्या दिवसानंतर त्याचं भांडण झाल. ती रुसली होती त्याच्यावर. रागरागात तिने त्याला ब्लॉक केलं. एक दिवस नाही दोन दिवस नाही पूर्ण ८ महिने तिने त्याला ब्लॉक केलं. एक दिवस असा जात नव्हता की तिला त्याची आठवण यायची नाही. तिला खूप राग आला होता त्याचा. त्यानेही खूप प्रयत्न केला केला तिच्याशी बोलण्याचा पण
काही मार्गच सापडत नव्हता. तो ही तिची वाट बघत बसला. ८ महिन्यानंतर तिने त्याला मेसेज केला. त्याचा birthday होता त्या दिवशी, त्याला विश्वासच बसत नव्हता की ती त्याच्याशी परत बोलायला लागली. तो खूप रडला. दोघेजण परत बोलायला लागले. त्यांच्यातली misunderstanding दूर झाली. सगळ पुन्हा छान चालू होत त्यांची मैत्री पुन्हा प्रेमात बदलायला लागली. आणि या वेळेस त्याने तिला मागणी घातली. माझ्याशी लग्न करशील. ती हो म्हणाली पण तो त्याच्या life मध्ये सेटल्ड होता. ती त्याला म्हणाली मलाही माझ्या लाइफ मध्ये settle होईच आहे. चांगला जॉब करायचं आहे. हे सगळ करायला मला थोडा वेळ लागेल. ती म्हणाली थांबशील माझ्यासाठी 5 year's. तो म्हणाला मी तुझ्यासाठी आता 5 years काय आता 10 years सुद्धा थांबायला तयार आहे. आणि अश्या पद्धतीने त्या दोघांची love story सुरू झाली...
पहिलं प्रेम ते नसतं
जे आपल्याला शोधावं लागतं...
पहिलं प्रेम तर ते असतं
जे स्वतः आपल्याला सापडत येत असतं...
प्रेम फक्त प्रेम असतं
त्यात जर का ते पहिलं असेल तर खूपच जास्त special असतं.....
प्रेमात वाट बघावीच लागते
आणि
वाट नाही पाहिली तर त्या प्रेमात काही मज्जाच नसते
प्रेम हे कमी किंवा जास्त नसते
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे फक्त प्रेम असते...

