STORYMIRROR

Pallavi Dhavale

Romance

3  

Pallavi Dhavale

Romance

पहिले प्रेम अपूर्ण

पहिले प्रेम अपूर्ण

3 mins
235

प्रिया नेहमी सुट्टीला मामाकडे येत होती अगदी लहानपणापासून ते तिचं लग्न होईपर्यंत. तिच्या मामाचा खूप छान स्वभाव होता तिला रेल्वेने प्रवास करायला आवडायचे तर तिला नेहमी रेल्वेने आणायला जायचा. प्रियाची आता दहावीची परीक्षा झाली होती तर ती तीन महिने मामाकडे सुट्टीला आली होती.

      

प्रियाच्या मामाच्या एक ताई राहत होती तसं तर लांबचं असून पण अगदी जवळचे संबंध असल्यासारख्या दोघी राहत होत्या. बहिणी होत्या दोघी पण बहिणीपेक्षा जास्त मैत्रीण होत्या. तिच्या ताईला सगळे सांगायची प्रिया एकदा तिच्या घरी असताना तो आला अन त्या दोघांची नजरानजर झाली. तो कायम यायचा पण प्रिया असताना पहिल्यांदाच आला होता मग तिने ताईला विचारले की ताई हा कोण गं? याला कधी पाहिलं नाही ना म्हणून विचारलं. तर ताई म्हणाली की तो पलीकडल्या गल्लीतील प्रकाश आहे. तो रोज येत असे मग ते दोघे भेटत असत मग त्यांची नजरानजर होत असे रोज. आणि त्यांच्यात बोलणे चालू झाले.

        

आता त्यांच्यात हळू हळू मैत्री होत होती. थोड्या दिवसातच खूप मैत्री झाली त्या दोघांमध्ये आणि त्या मैत्रीचे रूपांतर कधी प्रेमात झाले त्यांच त्यांनाच नाही कळले. मग प्रकाश ताईकडे येत होता तर प्रिया त्याची आतुरतेने वाट बघत बसायची. प्रकाश दिसायला एकदम रूबाबदार होता एकदम हॅन्डसम होता. त्याच्या प्रेमात कोणीही लगेच पडेल प्रिया तर एका नजरेत त्याच्या प्रेमातच पडली होती. दोघे पण एकमेकांच्या प्रेमात होते पण सांगणार कोण हा मोठा प्रश्न होता. असे करत करत शेवटी प्रियाच्या निकालाची तारीख जवळ आली. त्या आधी प्रिया जाणार होती तिच्या आईकडे, प्रकाशला हे माहीत नव्हतं. मग ती त्याला काही न सांगताच निघून गेली कारण जर प्रियाने प्रकाशला सांगितले असते की मी जाणार आहे तर तिचा पाय निघाला नसता. प्रिया आता 80 टक्क्यांनी पास झाली होती.

       

आता प्रियाला एका मोठ्या कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यायचे असते. तिला पाहिजे त्या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाले होते. आता कॉलेज चालू झाले मग तिने अभ्यास चालू केला. चाचणी परीक्षा घेण्यात आली होती त्यात तिला 70 % मार्क मिळाले. आता दिवाळी जवळ येत होती तर तिला मामाच्या गावी जाण्याची ओढ लागली होती. दिवाळीत आली तेव्हा तिने प्रकाशला सांगायचे ठरवले पण तिची हिम्मतच होत नव्हती की तू मला आवडतो आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते आहे. प्रकाशला पण तिच्याशी ही गोष्ट बोलायची हिम्मत होत नव्हती. तिने ताईला सांगितले तर ही गोष्ट ताईला प्रकाशने आधीच सांगितलं होतं. त्याला प्रिया आवडते व तो तिच्यावर खूप प्रेम करतो आहे अगदी मनापासून आणि तो तिच्याशी लग्न करणार आहे. पण अजूनही प्रकाश प्रियाला काही बोलला नव्हता. तो बोलणार इतक्यात तिचे कॉलेज चालू झाले व ती गेली. आता मे महिन्यात तिला नक्की सांगायचं अस त्याने ठरवलेले होते.


असेच दिवस जात होते प्रियाही आता वार्षिक परीक्षा चालू झाली होती मग परत सुट्टी चालू झाली आणि ती आली मामाकडे. आता प्रकाश तिला कॉफी डेटवर घेऊन जाणार होता आणि तिला सांगणार होता की मी तुझ्यावर खूप प्रेम करत आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. त्याने पूर्ण तयारी केली होती तर त्याच्या मित्रानी अचानक गोव्याला जायचा प्लॅन केला तिकडे त्याचे दोन चार दिवस गेले तोपर्यंतच प्रिया गावी गेली तिच्या घरच्यांनी तिचे लग्न जमवून ठेवले होते. प्रकाश गोव्यातून आल्यावर कळते की ती गावी गेली व तिचे लग्न ठरलंय ती जेव्हा परत येते तेव्हा तिच्या हाती लग्नाची पत्रिका असते. प्रिया प्रकाशला लग्नाची पत्रिका देऊन जाते व जाताना सांगून जाते की लग्नाला नक्की यायचं. प्रकाश तिच्या लग्नाला गेला खरं पण तिला न भेटताच गेला निघून.

     

प्रियाचे सासर त्याच गावात असूनही ते परत सात वर्षांनी एकमेकांना भेटले. आता ते मित्र म्हणून राहतात. प्रकाशचे पण लग्न झाले आहे त्याला दोन मुले आहेत व प्रियाला पण एक मुलगी आहे. आता ते दोघे छान आनंदी संसार करत आहेत. प्रकाशच्या घरी प्रिया गेली होती परत जेव्हा तो प्रियाला भेटतो तेव्हा तिचे उडणारे केस पाहून तो परत तिच्या प्रेमात पडतो पण तेवढ्यात त्याने स्वतःला सावरून घेतले.

      आठवणीत सखे तुझ्या 

      रोज मनात मरतो मी 

      का गेलीस सोडून मला

      तुझ्या आठवणीत झुरतो मी 

      

त्यांचे पहिल प्रेम तर अपूर्ण राहिलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance