पहिला पाऊस….
पहिला पाऊस….
मी खिडकीत बसून बाहेर धो धो कोसळणारा पाऊस पाहत होतो.मृगातला पहिलाच पाऊस तो हि धो धो !! १० -१५ मिनिटातच सगळीकडे पाणी पाणी, सार कस स्वच्छ आणि ताजतवानं झालं.इतक्यात दूरध्वनी दोनदा खणखणला मी लगबगीने जाऊन,उचलून कानाला लावला " मला तुझ्या सोबत पावसात चिंब चिंब भिजायचंय "मी स्तब्ध ! हॅलो ऐकतोयस ना.
मी भानावर. हा ऐकतोय बोल तुला कस कळलं कि दूरध्वनी मी च उचलला ते.अरे तुझ्या नुसत्या श्वासांच्या आवाजाने मी तुला ओळखू शकते.ते सोड, चल आधी बाहेर ये,बघ बाहेर किती मस्त पाऊस पडतोय.
अग तो पडत नाहीये सारखा कोसतोय,सगलीकडे पाणीच पाणी झालय.हो ना किती मज्जा येईल भिजायला.तुझ्या हातात हात घालून कोसळणाऱ्या सहत्र सरींना अंगावर घेत ओलंचिंब व्हायला.पण आई ला काय सांगू,आई ओरडेल एवढ्या पावसात कुढे कडमडायला चाल्लास....तुझं बर आहे ,अभ्यासाचं काही तरी कारण सांगशील आईला,सांभाळून घ्यायला तुझी बहीण आहेच.
स्वयंपाकघरातून आई चा आवाज कोण आहे रे दूरध्वनीवर ,अंग आई राहूल आहे त्याला माझी प्रात्येक्षिक ची वही हवीय आत्ताच.उद्या प्रात्यक्षिक आहे त्याच,अरे पण बाहेर खूप जोरात पाऊस आहे थोडं थांबून जा. ऐकतेस ना आई काय सांगतेय.हो ऐकलं, १० मिनिटात आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट .चल ठेवते.अंग पण ...............समोरून दूरध्वनी ठेवल्याचा आवाज!

