फेसबुकचं प्रेम
फेसबुकचं प्रेम


एक मुलगी एका मुलावर खूप प्रेम करत होती. अगदी जीवापाड बरं का! मुलगा पण तसंच काही प्रेम करत होता. रोज रोज प्रेमाला बहर येत होता. नातं अगदी घट्ट झालं होतं. ते फेसबुकचं प्रेम होतं. त्याला आधुनिक प्रेमाचं स्वरूप असं म्हणता येईल. बोलता बोलता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कशी होत होती त्यांना पत्ता लागतच नव्हता. असे काही ते प्रेमात गुंतले होते. जसे जसे दिवस जात होते प्रेम तेवढीच उंची घेत होतं. एका बाजूला ती आणि दुसऱ्या बाजूला तो आणि त्यांना जोडणारा मोबाईल असं नात्याचं समीकरणच झालं होतं.
फेसबुकमध्ये जसं नवीन फीचर्स येत होते तसेच यांच्यासुद्धा प्रेमात नवीन नवीन फिचर्स अपलोड होत होते. यात विश्वास हा जमेची बाजू होता. एकमेकांना गुड मॉर्निंग ते गुड नाईट या प्रवास जेवण, अंघोळ, नाश्ता, चहा, मित्र, कुटुंब, भांडण, वाद सर्व बाबतीत एकमेकांना सांगण्याचा जणू एक नित्य नियमच त्यांनी घालून घेतलेला होता. या सर्व गोष्टी करताना नातं एक एक पाऊल पुढे टाकत होतं. गोष्ट व्हिडिओ कॉल आणि गिफ्ट पाठवण्यापर्यंत गेली होती. एकमेकांना वचन देणे. फोटो पाठवणे. त्यांना एकमेकात जगणं दिसत होतं. दोघांमधील एक जण जरी जेवला नाही तर दुसरा पण जेवत नव्हता. अस त्यांचं चालायचं.
अगदी एकाचं जरी नेट पॅक संपलं तर दुसरा लगेच नेट पॅक मारून देत होता. बोलणं म्हणजे ऑक्सीजन झालं होतं. दिवस बोलण्यात जात होते. दोघांना भेटीची चाहूल लागली होती. एकमेकांच्या भेटी होऊ लागल्या आणि जीवनाचं सारं सुख-दुःख वाटू लागले. आज पण ते भेटतात वर्षातून अधून मधून कॉलवर फक्त ५ मिनिटे जणू जगण्याचं ऑक्सीजन घेण्यासाठी.
काही नाते असेच असतात. वाऱ्यबरोबर निघून जाणारे स्पेशल...