STORYMIRROR

Pooja Sarang

Romance

3  

Pooja Sarang

Romance

पाऊस प्रेमाचा....

पाऊस प्रेमाचा....

1 min
175


पाऊस प्रेमाचा सगळ्यांचाच...

कितीतरी आठवणी आहेत पावसाच्या. पहिल्या पावसाच्या जरा जास्तच तीव्र. लहानपणी पहिल्या पावसात भिजण्याचे कारण, कॉलेजमध्ये पहिल्या पावसात भिजण्याचे कारण, आणि नंतर पहिल्या पावसात भिजण्याचे कारण वेगळेच..


आता तुम्ही म्हणाल लहानपणाचा पाऊस प्रेमाचा असं कसं होईल. तो तर सगळ्यात आवडीचा माझ्या आणि कदाचित तुमच्याही. लहानपणी पावसात ती भिजते ते लहानपण, निरागसता जपण्यासाठी आनंद घेण्यासाठी. तो भिजतो पावसाच्या साठलेल्या पाण्यात कागदी होड्या करून सोडण्यासाठी आणि त्याच साठलेल्या पाण्यात ऊड्या मारण्यासाठी. मज्जा करण्यासाठी. लहानपणीचे दिवस परत परत आठवायचे आणि जगायचे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि ते जगणं म्हणजे पाऊस प्रेमाचा. 


कॉलेजमधील वेळेचा पाऊस खूप प्रिय. कारण तो पाऊस घेऊन येतो पहिल्या वहिल्या प्रेमाच्या सरी. पावसात भिजणाऱ्या तिला तो बघतो आणि बघताच क्षणी प्रेमात पडतो. किंवा मग तिने पाऊस आल्यामुळे न भिजण्यासाठी कुठेतरी घेतलेला आसरा आणि तिथेच असलेला तिच्या प्रेमात एकटाच भिजत असलेला तो. एकाच छत्रीत एकमेकांना स्पर्श न होता चालण्याची धडपड आणि मनातली धडधड एकमेकांपासून लपवणारे ती आणि तो... सगळंच पाऊस प्रेमाचा..


पण नंतर पहिल्या पावसात जुन्या आठवणीत भिजत आणि त्या आठवणी जगत भिजणारा तो आणि ती... सुखदुःखात एकमेकांना साथ देत प्रेम जगत भिजणारा तो आणि ती. आयुष्यभर साथ देण्याचे दिलेले वचन आठवून मनोमन मला ह्या जगात तिच्या शिवाय/ त्याच्याशिवाय एकट ठेवू नकोस सोबतच ने अशी देवाला एकच प्रार्थना करणारे तो आणि ती आणि पाऊस प्रेमाचा.....


कुठला प्रेमाचा पाऊस जास्त आवडला..मला तर सगळेच पण लहानपणीचा पाऊस प्रेमाचा...त्यात न्हाऊन निघायचं आहे मला परत परत ... आयुष्यभर.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance