"ओढ तुझ्या भेटीची"
"ओढ तुझ्या भेटीची"
स्मिता आज खुपच आनंदात होती. कारणही तसेच होते. आज तिचा KHADUS तिला भेटणार होता. आता KHADUS म्हणजे कोण हे तर तुम्हाला समजले असेलच. तर तिच्या KHADUS चे नाव होते अर्पित. अर्पित आणि स्मिताचे एकमेकांवर खुप प्रेम होते. त्यांच्या या प्रेमाच्या नात्याला काहिच महिने झाले होते. परंतु दोघांची ओळख होऊन मात्र तीन वर्ष झाली होती. या कालावधीमध्ये ते एकमेकांचे खुप चांगले आणि जवळचे मित्र बनले होते. या तीन वर्षांमध्ये ते एकमेकांना फक्त चार वेळाच भेटले होते. त्यातले तीन वेळा तर मैत्री असतानाच आणि प्रेमाची कबुली दिल्यानंतर एकदाच भेटले होते. दोघेही एकमेकांपासून खूप लांब राहत होते. अर्पित कामासाठी दुसऱ्या शहरात राहत असतो. त्यामुळे त्यांची भेट होत नव्हती.
स्मिताच्या मोबाईलची रिंग वाजते. ती जाऊन बघते तर त्यावर KHADUS चा कॉल आला असतो. ती कॉल उचलते आणि बोलते. अर्पित तिला सांगतो की तो दोन दिवसांनी काही कामासाठी तिकडे येणार आहे जमलेच तर आपण भेटू, पण नक्की नाही. स्मिता हे ऐकून खूप खुश होते पण नक्की नसल्यामुळे तिला थोडेसे वाईट वाटते. ती कॉल ठेवते आणि धावत जाऊन गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि सांगते की "बाप्पा माझा KHADUS कामासाठी येणार आहे, प्लीज तो मला भेटू दे प्लीज बाप्पा".
दुसऱ्या दिवशी अर्पित स्मिता ला कॉल करून सांगतो की माझे येण्याचे नक्की झाले आहे मी तुला संध्याकाळी भेटेन. स्मिता खुप आनंदात असते. तिला त्याच्या सोबतचे सर्व क्षण नजरे समोरून जात असतात.
रात्री सर्व कामे आवरून स्मिता अर्पित ला sms करते "Hi". बराच वेळ झाला तरी अर्पितकडून काहीच रिप्लाय येत नाही. ती त्याचाच विचार करत बसलेली असते तेवढ्यात अर्पित चा रिप्लाय येतो "मी कामात आहे उद्या बोलूया, बाय गुड नाईट." स्मिता ला थोडं वाईट वाटते. स्मिता झोपायला जाते पण काही केल्या तिला झोपच येत नसते. तिला सारखी अर्पितची आठवण येत असते आणि ती गालातल्या गालात हसत असते.
आज अर्पित येणार असतो. स्मिता सर्व आवरून घेते आणि ऑफिस ला जायला निघते. ती निघताना अर्पित ला कॉल करते. अर्पित तिला सांगतो कि "मी काम झाले कि कॉल करतो". स्मिता ला कधी त्याला भेटतेय असे झाले होते. ती सतत अर्पितचाच विचार करत होती. ऑफिस मध्ये पोहोचली आणि कामाला सुरवात केली. आता कामात लक्ष देऊया मग त्याचे विचार पण येणार नाहीत आणि कामात वेळ पण लवकर निघून जाईल. पण नेमके आज जास्त काही कामच नव्हते मग काय पुन्हा अर्पित आणि अर्पित.
स्मिताला काय करावे ते समजत नव्हते. तिला कधी अर्पित ला भेटते आहे असेच झालेले. तरीही तिने कामात लक्ष दिले. तिच्या मोबाईलवर धडाधड मेसेज येतात. तिला वाटले अर्पित फ्री झाला म्हणून त्याने केले आहे. पण बघते तर ते मेसेज एका ग्रुप वरती आलेले. ती न बघताच मोबाईल ठेवत होती, पण तिने तसं न करता मोबाईल मधील फोटो ओपन केले. त्यात अर्पित च्या फोटोचा एक फोल्डर होता.
अर्पितचेही तसेच काहीसे होते, पण त्याच्याकडे काम होते. त्यामुळे तो काम पुर्ण करत होता, त्याला ही स्मिता ला भेटायची खुप ओढ लागली होती.
जादू अशी केलीस काय,
नाही भान मला राहिले.
गुंतले मन तुझ्यात,
भास मज होऊ लागले.
ओढ तुझ्या भेटीची,
मज अशी लागली.
वेळ ही आता,
सरता सरेनाशी झाली.
लवकर ये ना सख्या,
भेटण्यास तुजला आतुर मी झाली....
कसा बसा एकदाचा ऑफिसचा वेळ संपत आला. तरीही स्मिताने मुद्दाम निघण्यास उशीर केला, कारण अर्पितचा अजून कॉल आला नव्हता. ती निघाली आणि तिने अर्पितला कॉल केला. अर्पितला अजुन काही वेळ लागणार होता. आता काय करावे हा प्रश्न तिला पडला. दिवस कसा बसा घालवला पण अजुन किती वेळ वाट पाहणार. तिला घरीही जायचे होते. तिने परत त्याला कॉल लावला. "मला अजुन थोडा वेळ लागेल तर तुला उशीर होत असेल तर तु जा घरी." हे ऐकून स्मिता च्या डोळ्यात पाणी आले. ज्याची इतकी वाट बघितली आणि आता तो नाही बोलतोय. पण काही झाले तरी तिथुन निघायचं मनच करत नव्हते तिचे. ती तिकडेच उभी राहिली.
ती तिकडेच रेंगाळत होती. जेवढा वेळ तिला थांबणं शक्य होते तितका वेळ ती त्याची वाट बघत होती. घरी तिने आधीच सांगितले होते कि काम आहे तर मला यायला उशीर होईल. तिला अर्पित ला भेटायचे होते. अर्पित ला कॉल लावला, तर तो अजूनही कामातच होता, आणि तो निघणार होता. तरीही त्याला यायला वेळ लागला असता, म्हणून तो तिला बोलला कि तु जा घरी, आपण पुढच्या वेळेस भेटू.
स्मिता चा काही केल्या त्याला न भेटता जाण्याचे मन करत नव्हतं. ती तितेच बसली. आता बराच उशीर झालेला घरुनही फोन आला. तिने सांगितलं मी निघालेय येते घरी. उदास मनाने ती निघाली.
तिच्या मोबाईल ची रिंग वाजली. तिने पहिले तर KHADUS चा कॉल होता. नाराजीनेच तिने कॉल उचला, अर्पित तिला बोलतो कि "ए वेडाबाई कुठे लक्ष आहे तुझे इकडे बघ आलोय मी". अर्पित तिच्या समोर येतो, स्मिता त्याला पाहते आणि धावत जाऊन त्याला मिठी मारते......
उशीर झाला असल्यामुळे ते दोघेही लगेच निघतात.
या भेटीची आठवण मनात साठवून........
वाट पाहत त्या पुढच्या भेटीच्या गोड क्षणांची.......