नको पणती विझवू आई !
नको पणती विझवू आई !
नऊ महिने नऊ दिवसांनी झाली
जग बघण्याची आई
वंशाच्या दिव्यापायी नको पणती
विझवू आई उद्या तुझ्या गर्भाची
चाचणी होणार ग आई !
मुलगा आहे म्हणुनी सारे
नाक मुरडतील ग आई
माझ्या कुजबुज ऐकु येई
वंशाच्या दिव्यापायी नको
पणती विझवू आई !
नऊ महिने नऊ दिवसांनी
झाली जग बघण्याची घाई
वंशाच्या दिव्यापायी नको
पणती विझवू आई !
अविचार पणे माझा करू
नको घात ग आई
तूच माझी नशीब
आणि तूच माझी पुण्याई
वंशाच्या दिव्यापायी नको
पणती विझवू आई !
पाहू दे ही दुनिया मजला
डोळे भरून ठेव अंगावरती
माझा तुझ पांघरूण
तुझ्या मंजुळ वणी मधूनी
मला ऐकू दे अंगाई
वंशाच्या दिव्यापायी नको
पणती विझवू आई.....!