Akshay Bhargav

Tragedy

3  

Akshay Bhargav

Tragedy

विश्वासघात

विश्वासघात

5 mins
894


अनुष्काला लहानपणापसूनच  अभिनय करण्याचं वेड होते. आजीची हुबेहूब नक्कल ती अशी करायची की जणू खरंच...

"अनुष्का मोठी झाल्यावर पुढे काय बनायचं आहे ?" असा प्रश्न अनुष्काच्या बाबांनी तिला विचारला.

अनुष्काने पटकन उत्तर दिलं "बाबा मला मोठं होऊन अभिनेत्री व्हायचं आहे".

अनुष्काची आजी म्हणाली " नाही ग बाई अभिनेत्री वैगरे काही नाही. १२ वी पर्यंत शिका नंतर लग्न करा आणि घर सांभाळ"

अनुष्का रागाने लालबुंद डोळे होऊन आजी कडे पाहत होती. अनुष्काच्या बाबांनी लगेच म्हटले "अग आई करू दे ना तिला जे करायचं. लग्न, घर सांभाळन हे होईल नंतर....

"म्हातारी झाल्यावर करणार आहेस का तु हिच लग्न ?" मोठ्या आवाजात आजीने अनुष्काचा बाबांनी म्हटलं.

अनुष्काची आई एवढ्यात किचनमधून आली आणि म्हणाली " काय आतापासून लावलाय हे आता तर अजून माझी अनुष्का १२ वर्षाची तर आहे."


बघता बघता अनुष्का १८ वर्षाची झाली १२वी ही झाली. 

अनुष्काने बाबांनी म्हटलं " बाबा मला अभिनेत्री व्हायचं, मॉडेल व्ह्यायच आहे" 

"हो बेटा, पण आपल्याकडे एवढे पैसे नाही की तुला मी अभिनेत्री बनवू शकेल." अनुष्काचे बाबा म्हटले.

अनुष्का लगेच म्हणाली, "बाबा मी मुंबईला जाते तिथे मला छोटा- मोठा अभिनय करायला तर मिळेल आणि पैसे देखील."

अनुष्काच्या आई व बाबांनी तिला मुंबईला पाठवण्यासाठी होकारार्थी मान हलवली. पण आजीची कुरकुर चालूच होती " मुलीच्या जातीला या काळात एकट पाठवण नाही बरे, तिथले लोक कशे, काय ? अनोळखी शहरात कशी राहील ती"

अनुष्काची आई आजीला म्हटली "करुद्या तिला तीच स्वप्न पूर्ण शहरात जाईल होताहोता होईल तिला सवय... "

अनुष्काने मुंबईला जाण्यासाठी तयारी केली. तिचा बालपणीचा मित्र राजीव मुंबईला आहे अस तिला शेजारच्या माधुरी काकूंनी सांगितलं.

"अरे वा ! छान तो माझी मदत करू शकेल" अनुष्का म्हणाली.

अनुष्काला आई बाबांनी मुंबईला जाण्यासाठी रेल्वेत बसवून दिलं.

अनुष्काचे डोळे पाणावले होते. "अनुष्का निट जा बेटा" अस म्हणत अनुष्काची आई रडायला लागली.

"चल चल सिग्नल झालं जाईल गाडी आता" अनुष्काचे बाबा म्हटले.

"मला घेऊन चल न मग तिथे" अनुष्का आनंदाने म्हटली.

राजीव म्हणाला " उद्या सकाळी ये तू या पत्त्यावर जाऊ मी घेऊन जाईल तुला तिथे"

अनुष्का खूप खुश होती तिला उद्या तिच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मिळणार होता. पण राजीवच्या मनात काही वेगळाच होत.....

अनुष्का सकाळी नऊ वाजता राजीव ने दिलेल्या पत्त्यावर पोहचली. अनुष्काने राजीव ला फोन लावला..

"कुठे आहेस राजीव ?"

" मी येतोय तू अस कर ग्रीन हॉटेल आहे तिथे तिथं पोहाच मी ही येतो तिथे" राजीव म्हणाला 

"ओके पोहचते मी" अनुष्का म्हणाली.

अनुष्का ग्रीन हॉटेलला पोहचली तिने राजीव ल फोन लावला 

"कुठे आहे राजीव ?"

"हो ग येतोय मी, रस्त्यातच आहे.. तू अस कर रूम नं. १०४ मध्ये जाऊन बस मी येतोच आहे." राजीव म्हणाला.

अनुष्काने ग्रीन हॉटेलच्या रिसेप्शन वरून रुमची चाबी घेतली आणि ती रुम नं.१०४ जायला निघाली. 

अर्धा तास झाला राजीव अजून आला नव्हता. अनुष्का रुम मध्येच बसली होती. इतक्यात दरवाजा कोणीतरी वाजवला..

अनुष्काला वाटलं की राजीव आला असेल. ती दरवाजा उघडण्यासाठी गेली. आणि तिने दरवाजा उघडला आणि बघते तर काय राजीव नसून ते...पोलीस.

"मी इन्स्पेक्टर राहुल सक्सेना. ... या हॉटेल मध्ये देहव्यापार चालू आहे अशी बातमी होती.

चला तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल" इन्स्पेक्टर म्हणाला.

" पण मी काय केलं मी तर माझा मित्र राजीव येणार आहे म्हणून मी या हॉटेलला आली होती" अनुष्का म्हणाली.

"अहो मॅडम, काहीही कारणे देऊ नका" इन्स्पेक्टर म्हणाला.

" सर मी कारणे देत नाही आहे मी खरं बोलतेय. आणि मी इथे काही देहव्यापार करत नाही आहे" अनुष्का म्हणाली.

"मॅडम मागे वळून पहा, कोण आहे तो ?" इन्स्पेक्टर म्हणाला.

अनुष्काने मागे वळून पाहिलं बघते तर काय एक अनोळखी व्यक्ती निर्वस्त्र अवस्थेत....

"मला माहित नाही कोण आहे तो मी खरच सांगतेय" अनुष्का म्हणाली.

"कॉन्स्टेबल घ्या ताब्यात हिला" इन्स्पेक्टर कॉन्स्टेबला म्हणाला.

अनुष्का खूप रडत होती सर मला खरंच माहीत नाही हे सगळ काय चाललंय. मी तर माझा मित्र राजीव ला भेटायला आली होती." अनुष्का केविलवाना चेहऱ्याने म्हटली.

"ओके, मग कुठे आहे राजीव ?"

"सर येतच असेल तो मी फोन लावते त्याला परत"

अनुष्काने थरथर कंपन करणाऱ्या हाताने राजीव ला फोन लावला. राजीव चा फोन बंद होता.

"मॅडम खूप झालं तुमचं नाटक चला आता आमच्या सोबत" इन्स्पेक्टर म्हणाला.

राजीव नंतर अनुष्काला भेटायला पोलीस स्टेशनला भेटण्यासाठी गेला.

"सर मी राजीव, अनुष्काच्या मित्र मला तिला भेटायचं आहे."

"ओके पाच मिनिटांत भेटा" रागीट पणे इन्स्पेक्टर बोलला.

अनुष्का खाली मान करून बसली होती, रडून तिचे डोळे लाल झाले होते.

"अनुष्का" हळुवारपणे राजीव म्हणाला.

"अनुष्का वर मान करून पाहिलं. ती चटकन उठली "राजीव तू बर झाल तू आलास सांग यांना की मी अस काही केलल नाही मी तर तुला भेटण्यासाठी आली होती"

राजीव काहीच बोलत नव्हतं. 

" अरे बोल ना राजीव" निरागसपणे अनुष्का म्हटली.

" अनुष्का तू असं काही करशील मला वाटलं नव्हतं" राजीव म्हणाला

"राजीव काय बोलतोय तू हे मी काहीच केलेलं नाही मी तर तुला भेटण्यासाठी आली होती तूच मला म्हटलं होत न की ग्रीन हॉटेलला जा रुम नं १०४ ल जा मी येतोय अस" अनुष्का म्हटली.

" मी केव्हा म्हटला तुला अस" राजीव म्हणाला.

" म्हणजे तू मला मुद्दाम फसवल" अनुष्का रडत रडत म्हणाली.

मुंबई राजीव शिवाय कोणीही परिचित नव्हतं. आता तर तो ही नाही. या विचाराने अनुष्काने धीर सोडत रडत होती.

पण राजीव ने का फसवल ती याच विचारात होती. 

"मी तुझ काय वाईट केलं होत म्हणून तू मल फसवल ?" निरागसपणे अनुष्का ने विचारलं.

"अनुष्का तुला माहित आहे जेव्हा तू दहावीत होती, मला तू खूप आवडायची म्हणून मी तुला प्रपोज केलं होत. पण तू मला काय म्हटलं होत आठवतेय का ?

तू म्हटली होतीस की तुझ्यात काय आहे ? मी तर तुझ्यापेक्षा दहापट सुंदर आहे. तेव्हाच मी ठरवलं होत की ज्या सुंदरतेवर तुला गर्व आहे त्याच सुंदरतेवर तुला बदनाम करेन."

"हा हा हा, आणि आज ते मी केलं" 

" देहव्यापार करतेस तू , या तुझ्या सुंदरतेे कडे कोणीच नाही पाहणार आता. आता फक्त तू एक वेश्या आहे याचं नजरेने सगळे तुझाकडे पहीतील".

"तू माझा असा बदला घेशील अस वाटल ही नव्हतं रे मला" रडत रडत अनुष्का म्हणाली.

"बाय अनुष्का, बाय बाय !" राजीव म्हणाला..

" राजीव प्लीज अस करू नकोस वाचावं मला माझ्या आई बाबांना हे कळलं तर ते जीव सोडतील. प्लीज ...." अनुष्का हुदके देत म्हटली.

आणि राजीव तिथून निघून गेला...

राजीव ला अनुष्काने दिलेला नकाराचा बदला घ्यायचा होता. म्हणून त्यानेच माधुरी काकूंनी सांगितलं होत अनुष्काला भेटण्यासाठी. माधुरी काकू राजीव ची आई होती.

 लोक बदला घेण्यासाठी कोणासोबत काय करतील याचा नेम नाही... मुलाला समजत नाही पण त्याची आई "माधुरी काकू" यांनीही त्याला समजावण्या ऐवजी त्याची या सर्व गोष्टी त त्याची मदत केली. ....

म्हणून कोणावरही विश्वास ठेवताना विचार करा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy