STORYMIRROR

Vrushali Gambhir

Inspirational

3.4  

Vrushali Gambhir

Inspirational

निर्णय

निर्णय

1 min
2.1K


निर्णय

हा प्रवास जिथून सुरु झाला ते माझं घरही चांगलच प्रशस्त आणि हवेशीर होत. त्या घराच्या बऱ्याचश्या खिडक्या एका बागेत उघडायच्या . ही बग तरी कशी, एखाद्या स्वप्नासारखी ! सुखद शीतल आणि मनमोकळी वाढलेली. सळसळत्या पानांना पाखर गाण्याची साथ असणारी !

माझी नजर तिथेच त्या हिरव्या स्वप्नात अडकून पडलेली होती

घराची दुसरी बाजू रस्त्याकडे उघडणारी होती. हा रस्ता थेट व्यवहारी जगाकडे जाणारा होता. आम्ही मात्र घराची ती बाजू फारशी वापरत नव्हतो

त्याच व्यवहारी रस्त्यावरून कोणी एक शर्वरी आपल्याच मस्तीत झुलत माझ्या दाराशी आली. माझ्याच उंबऱ्यावर उभ राहून तू कोण? म्हणून मलाच विचारायला लागली. तिला समजेल असं उत्तर माझ्याजवळ नव्हत आणि अपमानाचे कढावर कढ यावेत इतकं माझ मन विकाराधीन झाल होत.

ण तरीही तो क्षण माझा होता. सर्वस्वी माझा . माझी सुस्तावलेली जिद्द झडझडून जागी करणारा होता. क्षण मनात उतरला आणि प्रियकर भेटावा तस माझ 'असण' झपाटून गेला.

या जिद्दीची नशा माझ्या चांगल्याच परिचयाची होती. तिचंच बोट धरून मी अपार वाळवंट तुडवलं होत. कोवळ्या अननुभवी पायांनी तापली वाळू ओलांडली होती. तेंव्हा बसलेल्या चटक्यांच्या खुणा आजही माझ्या वागण्या बोलण्यात डोकवतात. चार चौघांपासून मला वेगळ काढतात. त्याच त्या जिद्दीला पुन्हा एकदा वाहून घेतल

पुढे याच वाटेवर मला एक ओलावा सापडला होता, माझा जोडीदार ! आज पुन्हा त्याचाच हात धरून एक वेगळी वाट निवडली. आमच्या स्वप्नांपर्यन्त जाणारी. या वाटेवर काय भेटेल हे तेंव्हा माहित नव्हत. पण तेंव्हा मनाला सोनेरी पंख होते ना !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational