pooja balkrushna sangale

Crime Inspirational Others

4.0  

pooja balkrushna sangale

Crime Inspirational Others

नेमकं चुकतय तरी कुणाचं..?

नेमकं चुकतय तरी कुणाचं..?

6 mins
205


आजीबाई म्हंटल की आपल्यासमोर आकृती उभी  राहते ती एका सत्तर-पंचाहत्तर वर्षाच्या वृद्ध स्त्री ची.

अशीच एक आज्जीबाई माझ्याही आयुष्यात आली आणि मला नेहमीच विचार करायला भाग पाडणारा एक प्रश्न देणगी म्हणून देऊन गेली तो म्हणजे ,

  नेमकं चुकतय तरी कुणाच..?

      

      आम्ही चार-पाच मैत्रिणी कॉलेज सुटल्यानंतर बस स्टँड वरती जाऊन बस ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुलींपैकीच ऐक. त्या दिवशी देखील आम्ही तेथील बाकड्यां वर बसून बसची वाट बघत मनसोक्त गप्पा मारण्यात मग्न होतो.तेवढ्यात एक म्हातारी आजीबाई आमच्या जवळ येऊन उभी राहिली.

  

        कंबरेत वाकलेली, हिरवट कलरच लुगडं ,त्यावर कित्तेक सारे थिगळ, फाटलेली चोळी, विस्कटलेले केस, सावळा रंग, कपाळावर चेहऱ्यावर आडव्या तिडव्या आढ्या पडलेल्या, हातापायांवर ओरखडल्याच्या रेघा, एका हातात वायरची पिशवी तीही फाटलेली सोबत त्याचा हातात एक ओबडधोबड चेमटलेली वाटी तर दुसर्‍या हातात एक लाकडी काठी असली ती म्हातारी तिला बघून अक्षरशः कुणालाही तिच्यावर दया येईल. लगेच मी लगबगीने माझा एक हात बॅग मध्ये घातला हाताला इन मीन दोन रुपये लागले ते मी बॅग मधून बाहेर काढणार तेच "आहो आज्जी मी कालच तर तुम्हाला पैसे दिले होते ना, दररोज कुठून आणायचे बरं..! जा पुढे आमच्याकडे काही ही देखील नाही आता" असं म्हणत शेजारीच बसलेल्या एका मैत्रिणीने ( मोनाने) त्या म्हातारीला तेथून हाकलून दिलं. हळूहळू काठी टेकवत ती म्हातारी आज्जीबाई देखील तेथून ठावकान निघून गेली. मीही हातात असलेले ते दोन रुपये पुन्हा बॅग मध्ये ठेवून दिले. मनाचं त्या म्हाताऱ्या आज्जीबाई सोबत असल्या शब्दांत बोलून तिला तेथून हाकलून लावन मला जरा खटकलंच होतं . त्यावरून आम्हा दोघींमध्ये जरावेळ वाद देखील झाला. थोड्याच वेळात आमची एक क्लासमेंट 'श्रद्धा 'आमच्या शेजारी येऊन बसली.मोनात आणि माझ्यात झालेल्या वादाचा नेमकं कारण तिने मला विचारलं. मी तिला घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. तेवढ्यात तिने त्या म्हाताऱ्या आजीबाई कडे एक नजर फिरवली.' अग ही तर तीच म्हातारी आहे '. ती आश्चर्याने ओरडली .

ती म्हणजे...?

आम्ही मैत्रिनिंने तिला विचारलं. त्यावर तिने आम्हाला सांगायला सुरुवात केली.

       अग् चार-पाच दिवसांपूर्वी माझं प्रॅक्टिकल असल्या कारणास्तव मी साडेपाच च्या बसने घरी जाण्यासाठी बसची वाट बघत तिथेच बसलेले होते. तेव्हा माझ्यासमोरच चाळीस-बेचाळीस वर्षाची एक स्री बस मधून खाली उतरली. तिने त्या म्हातारीचे विस्कटलेले केस व लुगड नीट व्यवस्थित केले. त्या म्हातारीच्या वाटीतील पैसे तिने तिच्या स्वतः च्या पाकिटात टाकले. एवढंच नाही तर ती त्या म्हातारीला उनधून बोलत देखील होती .

    ''सार्‍या सकाळचे तू एवढेच पैसे जमा केले का फक्त म्हातारे"         

     असल्या शब्दांत ती स्री (बाई) त्या म्हातारी सोबत बोलत होती. 

     आम्ही सर्व मैत्रिणी मात्र श्रद्धाच ते बोलन कान टवकारून ऐकत होतो. 

     तसेच श्रद्धा पुढे सांगू लागली.....

कि ती जी स्री होती ती दुसरी तिसरी कोणी नसून त्या म्हातारीची सूनच होती.एवढेच नाही तर ती स्री (बाई) त्या म्हातारीला दररोज सकाळी आठ किंवा नऊ च्या सुमारास येथे घेऊन येते. तिचे केस व कपडे जरासे विस्कटून तिच्या हातात एक पिशवी आणि वाटी देऊन त्या म्हातारीला भीक मागण्यासाठी येथे सोडून ती स्री (बाई )पुन्हा ईथून निघून जाते. आणि संध्याकाळी परत पाच किंवा साडे पाच च्या बस ने पुन्हा तिला घ्यायला येते. श्रद्धा सांगत असलेल एक एक वाक्य मात्र काळजाला खोलवर भिडत होतं. तिचं बोलणं संपल्यानंतर मी तिला एक प्रश्न विचारला.

      अग पण तुला त्या म्हातारी विषयी एवढं सर्व कसं काय समजलं? अन् ति जी स्री (बाई ) त्या म्हातारीला येथे आणून सोडते ती त्या म्हातारीची सूनच आहे हे कशावरून?.

     त्यावर तिने सांगितलं की तिची एक मैत्रीण (श्रद्धाची दहावी बारावीपर्यंत सोबत असलेली एक फ्रेंड) दररोज त्याच बसने प्रवास करते, ज्या बसमधून ती स्री तिच्या सासूला येथे आणून सोडते. एवढं सांगून 'चला मी निघते आता' असे म्हणून श्रद्धा तेथून निघून गेली.

     श्रद्धा च्या सांगण्यावरून एक गोष्ट तर आम्हाला नक्कीच उमगली होती की ती म्हातारी आणि ती स्री तेथेच आसपास राहणाऱ्या असाव्यात. कारण दररोजच त्या म्हातारीला बसणे आणून सोडण व संध्याकाळी परत घेऊन जाणं हे त्या स्त्रीला नक्कीच परवडणार असाव. श्रद्धाने सांगितलेली त्या म्हातारीची हकीकत मात्र आम्हा चार-पाच मैत्रिणीच्या मनात खोल घर करून गेली होती.

    पाच दहा मिनिटांनंतर परत ती म्हातारी काठी टेकवत टेकवत आम्ही बसलेल्या असलेल्या बाकड्याला टेकूणच खाली बसली. कदाचित ती चालून चालून दमली असावी. तेवढ्यातच माझं लक्ष तिच्या हातात असलेल्या त्या ओबडधोबड वाटी कडे गेले. त्यात एक दोन रुपयांचे दहा ते पंधरा नाने दिसत होते.पंधरा मिनिटांपूर्वी मी जे दोन रुपये बॅग मध्ये ठेवले होते तेच पुन्हा एकदा बँक मधून बाहेर काढले. "आज्जी धरा हे पैसे " म्हणत मी ते दोन रुपये त्या वाटी टाकले. त्यानंतर माझ्या इतर मैत्रिनिंने देखील प्रत्येकी दोन चार रुपये त्या वाटीत टाकले. अगदी मनाने देखील. कारण काही वेळापूर्वी त्या म्हातारीला भडाभडा बोलून गेलेली मोना सुद्धा आता श्रद्धाच बोलणं ऐकल्या नंतर अबोल अन् हतबल झाली होती.

    त्या म्हाताऱ्या आजीचा पडलेला चेहरा आता मात्र थोडा खुलला होता. ते बघून आम्हालाही जरा बरं वाटलं. तेवढ्यातच ती म्हातारी तेथून उठली अन बस स्टँडच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन बसली. कारण तेथे देखील खेड्या-पाड्यांतील खूप सारे प्रवासी बसलेले होते. खरं तर ती आज्जीबाई इतकी म्हातारी होती की तिला लवकर उठता बसता येणं तर दूरच तिला  व्यवस्थित चालता देखील येत नव्हतं . तिचा तो अवतार बघून तेथे बसून बसची अतुरतेने वाट बघत असलेले प्रवासी तेथून उठले व त्या म्हातारी पासून जरा दूर अंतरावर जाऊन बसले . एका हातात काठी अन एका हातात ती वायरची पिशवी व वाटी घेऊन ती म्हातारी अजूनही त्याच जागेवर बसून होती. मी मात्र एक हात स्वतःच्या गालावर ठेवून लाचारागत त्या म्हातारीकडे बघत होते . त्या म्हातारीला नेमकं काय म्हणावं ? "आज्जीबाई की म्हातारी भिकारीन " , हे मलाच नाही तर माझ्या इतर चार पाच मैत्रिणींना देखील उमगत नव्हतं. आता मात्र एकामागून एक असे तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न डोक्यात रेंगाळायला लागले होते . या म्हातारीच्या जागेवर आपलं कुणी असतं तर ? याचा तर विचार करूनच मन हादरत होतं . तेवढ्यातच एक टॅक्सी भरधाव वेगाने बस स्टॅन्ड कडे येताना आम्हाला दिसली . जशी ती टॅक्सी त्या म्हाताऱ्या आजीबाई जवळ यावी अन त्या टॅक्सी चा चालक असणाऱ्या त्या काळ्याकुट्ट , लाल डोळे, हातात गळ्यात दोन - चार साखळ्या, कानात बाळ्या असलेल्या त्या मुलाने गाडीची स्टेरिंग कचकाटून फिरवून गाडी जागेवरच गोल फिरवावी . तस गाडीच एक चाक त्या बसलेल्या म्हाताऱ्या भिकारीन आज्जीबाईच्या पायावरून जावं. तशा आम्ही मैत्रिणी जोरात ओरडून उभ्या राहिलो . व धावतच त्या म्हातारी जवळ गेलो . त्यावेळेसच ते दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तस उभ राहत. त्या आज्जीबाईच्या पायाचा गुडघ्या पासून खाली अक्षरशा चुराडा झाला होता. स्टाईल मारत, अंदाधुंदी आलेला तो टॅक्सी ड्रायव्हर देखील लगेच तेथून फरार झाला. बघता-बघता बस स्टॅण्ड वरील सर्व प्रवासी त्या घटनास्थळी जमा झाले . आज्जीबाई वेदनेने व्याकुळ झाल्या होत्या. कुणा प्रवाशांची त्यांची मदत करायला देखील हिंम्मत होत नव्हती . आज्जीबाईचा तो चुरडलेला पाय बघून अक्षरशः माझी जी अवस्था झाली होती तीच अवस्था तिथे उभ्या असणाऱ्या इतर मुलींची देखील झाली असावी . आता मात्र हात पाय थरथरायला लागले होते . डोकं सुन्न झालं होतं. तोंडातून शब्द फुटत नव्हते . आम्ही मात्र अजुनही त्या म्हातारीला जवळ , त्या घटनास्थळी पाय घट्ट रोवून उभ्या होतो . पाच - सहा मिनिटांचा कालावधी गेल्यानंतर , दोन माणसे धावतच तेथे आली. कदाचित ते तेथील स्थानिक रहिवासी असावेत . त्यांनी त्या आज्जीबाईला उचलून एका रिक्षा टाकलं . नी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले . थोड्याच वेळात बघता - बघता ती अपघात झालेली जागा पूर्णपणे मोकळी झाली . आम्ही अजूनही तिथेच उभ्या होतो . काही वेळेपूर्वी आज्जीने हातात घट्ट पकडलेली ती ओबडधोबड वाटी मात्र आता लावारसपणे पडली होती . तिच्यात असलेले ते पैसे जे काही वेळेपूर्वी आम्ही त्या वाटित टाकले होते. तेही सर्व इतरत्र अस्तव्यस्त पसरले होते. म्हातारीच्या त्या वायरच्या पिशवी वरून व तिच्या वृद्धापकाळाचा आधार असणाऱ्या त्या लाकडी काठी वरून माणसे पाय देऊन जात होते. थोड्याच वेळात माझ्याही रुट ची बस आली . अन् मीही बस मधून घराच्या दिशेने निघाले तर खरं पण मन मात्र अजूनही तिथेच होतं . त्यानंतर आम्हाला ती म्हातारी पुन्हा कधीच बस स्टॅण्ड वर दिसली नाही. परंतु तेथील दोनशे-अडीचशे लोकांच्या गर्दीतील त्या आज्जीबाई ची ती एक किंचाळी आजही माझ्या कानी पडते.  

      या घटनेला  आज तीन वर्ष उलटलीत . पण आजही मी जेव्हा एखाद्या म्हाताऱ्या आज्जीबाईला बस स्टँड वर , रोडच्या कडेला किंवा इतरत्र भीक मागतांनी बघते तेव्हा तो घडलेला प्रसंग अगदी जश्याचा तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. अन त्या दिवसापासून तर आजवर मी एकाच प्रश्नाचे उत्तर शोधतेय या सर्वात " नेमकं चुकतय तरी कुणाचं?"  

     सून करीत असलेला मानसिक आणि शारीरिक छळ, अत्याचार गुपचुप सहन करणाऱ्या त्या सासूच ? की ज्याला नऊ महिने पोटात घेऊन रात्रंदिवस कष्ट करून स्वतःच्या घासातला घास भरवून लहानाचं मोठं केलं, तरीही बायको च्या होत हो मिळवणाऱ्या त्या मुलाचं ? की जिला लेक समजून घरी आणलं त्या सूनेच ? की माझ्यासारख्या तिथे उभे राहून घडत असलेला प्रसंग बघत असणाऱ्या हजारो प्रवाशांच ......यासर्वांत " नेमक चुकतंय तरी कुणाचं ?" 

   धन्यवाद


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime