pooja sangale

Others Children

3  

pooja sangale

Others Children

बैलपोळा

बैलपोळा

2 mins
216


      सर्जा राजा बाई माझा 

      वर्षभर राबतो 

      एक दिवस का होईना 

      पण राजा सारखा जगतो .

       

      दगडा ढेकळात बाई 

     औत ओढीत चालतो 

     सण माझ्या राजाचा बाई 

     किती दिमाखात सजतो .

     

     डोलदार शिंग त्यावर 

     फुग्या ,गोंड्याचा बाई तुरा 

     गळा मोत्याची माळ बाई 

     कपाळी गंधाचा टिळा .


     पाठी - पोटी त्याच्या बाई 

     गेरू, रंगाचं ग गोंधण

     पायी घुंगराचा चाळ बाई 

     अंगी तेज त्याच्या प्रखर...

  

पूर्वी बैलपोळा म्हणलं की शेतकऱ्याची लगबग सुरू व्हायची . ती त्याच्या राजाच्या सजावटी साठी ..

बायका अंगणात सडा टाकून रांगोळ्या मांडायच्या .पुरणपोळीचा खमंग वास घरभर दरवळायचा .गावभर उत्साहाच वातावरण असायचं .मुल बैलांच्या सजावटीच सामन गोळा करत , गावाची प्रत्येक गल्ली हिंडायचे . मी ही त्यातील ऐक ...😊 पण माझ्या पेक्षाही भावंडे मोठी ...! तुला यातल काय कळतंय , जा तू तुज घरातलं काम बघ 😏 . म्हणून आम्हा बहिणींना ते हकलून द्यायचे 😔.. 

पण आम्ही जरा अगाऊच 🤪.. घरात न जाता आम्ही धोत्र्याची झाडे शोधायला जायचो , आणि सोबत आणलेला धोतरा मदोमद कापायचो मग तो रंगात बुडवून, भावांची नजर चुकवून बैलांवर ठशे उमटायचो ....! इतकचं काय तर आम्ही वांगे देखील सोडले नाही ...😁 

बैलांवर वांग्या - धोत्र्याचे ठशे उमटवत असताना भाऊ ओरडायचा . " मुर्खांनों हे काय करून ठेवलय , काही कळत की नाही तुम्हाला , बैल असा सजवतात का 😡?" आम्ही मनातल्या मनातच त्याला म्हणायचो - तुला लयी कळतय जसं . मग भांडणे व्हायची रागाच्या भरात आम्ही बैलांसाठी आणलेला रंग , गेरू ऐकमेकांच्या अंगावर फेकायचो ,त्यात आमची रंगपंचमी ही साजरी होऊन जायची ..😃 मग मात्र आई - बाबांचा ओरडा पडायचा ते वेगळच . मग बाबा आम्हाला फुगे फुगवायला सांगायचे . त्यातही निम्मे फुटायचे तर निम्मे राहायचे ...😝 ऐकदा की बैलांची सजावट झाली म्हणजे लगेचच ढोल - ताशांच्या गजरात त्यांची स्वारी गावाच्या दिशेने निघायची . प्रत्येक शेतकरी आप - आपले बैल घेऊन गावच्या मंदिरात यायचे .... 

अन् नवलच... 😳 वर्षभर कधी न झुकलेला बैल मात्र तिथे देवापुढे झुकून पाया पडायचा . आख्ख गाव गुलालाने माखलेल असायचं .

बैलांना पाहण्यासाठी गावच्या पारावर मुलांची ऐकच धांडळ उडायची . 

   पण आता कुठे हे चित्र बदलत चाललंय . तेव्हा बैलांना पाहण्यासाठी तुडुंब भरलेले पार आता मात्र ओसाड झाले आहे. गावभर पसरलेला गुलाल आता मात्र फक्त मंदिरा पुरताच मर्यादित राहिला आहे . हजारो बैलांची जागा आता तंत्रज्ञानाने घेतली आहे 😔 ..म्हणूनच कदाचित पूर्वी घोळक्यात येणारे बैल मात्र आता एकटे येत आहे .


Rate this content
Log in