न विसरणारे प्रेम
न विसरणारे प्रेम


मी आठवीत शिकत होतो. मित्रांसोबत राहायचं, अभ्यास करायचा, आनंदी राहायचं एवढंच मी शिकलो होतो. पण त्या दिवशी वेगळंच घडलं. माझ्या बाकाजवळ बसणाऱ्या मुलीनं तिचा पडलेला पेन मागितला. मी तो देताना तिला प्रथमच बघितले. मी पहिल्यांदा त्या मुलीला बघितले. मला काहीतरी जाणवले पण मग मी म्हणालो, "जाऊ दे."
मग मला त्या मुलीला बघितल्याशिवाय बरं वाटत नव्हते. रोज तिच्याशी काही कारणाने बोलू लागलो. मग ते रोजचे झाले, तास सुटला की बोलायचे. वर्ग मंत्री होतो म्हणून तिच्याशी बोलत बसायचो. मग माझी ती खास मैत्रिण झाली. दहावीत असताना शेवटच्या दिवशी सांगू म्हणालो पण ती त्या दिवशी आली नाही. मग मी दहावी झाल्यावर शहरात गेलो.
नंतर खूप दिवसांनी आलो. मी तिला बघितले पण तिच्याकडून काही प्रतिक्रिया नाही आली. मला वाटले ती मला विसरली, पण मी तिच्यावर अजूनपण मनापासून प्रेम करतो. तिचा चेहरा माझ्या मनात जसाच्या तसा छापलाय. मी तिची वाट बघत आहे...