मृत्यु !
मृत्यु !


मृत्यु ! मृत्यु ! मृत्यु ! अरे बापरे किती महाभंयकर शब्द आहे हा !
नुसता जरी कानी पडला तरी हृदयाचे ठोके जोराने वाजायला सुरू होतात.
मृत्यु हा शब्द बोलतांना सुद्धा आपली जीभ कातरते असा हा महाभंयकर अंगावर शहारे आणणारा शब्द आहे पण हे प्रत्येकाच्या जीवनातील हे कडू सत्य आहे.
प्रत्येक जीव-जंतूला ह्याला सामोरे जावे लागते फक्त प्रत्येकाचा मार्ग हा मात्र वेगवेगळा असतो.
आयुष्याचा प्रवाह हा जीवन आणि मृत्यु अशा दोन तरंगावर आधारलेला असतो. त्यातील मृत्यूचा तरंग जर अधिक वेगाने आला तर तो प्रलय आणतो आणि तेथेच आयुष्याला तो विरामचिन्ह देतो.
ज्याप्रमाणे नदीचा अंत हा शेवटी अथांग अशा सागरात होतो, त्याचप्रमाणे जीवनाचा अंत हा मृत्युच्या सागरात मावळतो. जीवनाच्या ह्या कडू सत्याशी हसत मुखाने सामोरे जा देवाने दिलेल्या ह्या सुदंर जीवनाचा आस्वाद घ्या.
झुळझुळ वाऱ्यासारखे आहे जीवन।
किलबिल किलबिल आहे जीवन ।
रटाळ वटाळ आहे जीवन।
प्रवास प्रवास आहे जीवन ।
नको मानवा वैतागू ह्या जीवना ।
होईल कधी तरी जीवन हे मृत्यु सिमित ।