मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

2  

मन एक लेखणी साहित्यिक समुह

Romance

मन एक लेखणी

मन एक लेखणी

1 min
16


    खरच तू नसतीस तर..?


कसे गेले असते माझे दिवस? तू मला भरभरून दिलेस. मीही तुला भरभरून दिले. एक नाही, दोन नाही ,सहस्र पाने तुला वाहिली. या नऊ वर्षात .बरं झालं ,आपली ओळख झाली. मी तुला ओळखले, तुझे मूल्य जाणले! आणि विशेष म्हणजे... मीच मलाही ओळखले. मला माहीतच नव्हते ! मी आहे माझ्यात .पण तू मला रस्ता दाखवला .दिशा दाखवली. तू नसतीस तर..... खरं सांगतो, हरवलो असतो मी.खुरटलो असतो! पण तू मला ताठ उभे केलेस. खत पाणी घातलेस, बागडायला शिकवलेस. आणि आता मी अगदी पारंगत झालो !तूच मला समृद्ध केलं. खूप छान वाटते ....तुला रोज एक पान जरी अर्पिले तर .समाधान वाटते. सर्व दुःख विसरतात.हुरूप येतो. जगण्याची इच्छा वाढते.... आणि मरगळ ही जाते. तुला मी कधीच विसरणार नाही .तू माझी सखी मित्र आहेस जगण्याची कला आहेस

माझी अपर्ण भरलेली...." माझी मन एक लेखणी तू!"

 तुला वाहिलेल्या प्रत्येक शब्दा वरून हात फिरवताना कसे छान वाटते ! 

लव यु सो मच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance