मीही प्रेम केलं होतं.....
मीही प्रेम केलं होतं.....
मीही प्रेम केलं होतं एका सुंदर तरुणीवर
कधीतरी मिही घायाल झालों होतो
भर उन्हात सुध्दा प्रेमाच्या पावसात मीही चिंब न्हालो होतो
स्वप्ना मध्ये माझ्या कायमचं ती यायची
वाटा दिसायच्या फक्त दिशाच हरवुन जायची
तिला पाहण्यासाठी काय काय करायचो
ती दिसल्याशिवाय घरीच नाही जायचो
एक एक दिवस करत
काही वर्षे लोटून गेलीत
जबाबदारीची ओझी आत्ता
माझ्या सुद्धा खांद्यावर आलीत
परिस्थिती बदलण्यासाठी गाव सोडुन शहरात आलो
हजारो च्या गर्दीत सुद्धा मी मात्र एकटा झालो
कधीतरी न राहून तिची आठवण यायची
स्वतः लाच समजवायचो आपल्याला परिस्थिती बदलीची
कामाच्या ओघात दिवस निघून जायचा
झोपताना मात्र डोळ्यासमोर गावं उभं राहायचा
वाटलंच कधी वाईट तर
एकटा थोडं बसायचो
स्वतःच्याच हातांन डोळे पुसायचो
एक दिवस मित्राचा फोन आला
भाव तीच लग्न ठरलं
क्षणभर थांबलो अन डोळयांत पाणी दाटल
ओशाळलेल मन थोडं बिथरून गेलं
वाटलं आत्ता संपलच सार काही कळेनासं झालं
मन आता कुठे वळेनासं झालं
नंतर वाटलं तिची तरी काय चूक
तीही माझ्यासारकीच बेहाल
माझ्यासारखाच तिचा ही गेला
पडद्याआड भूतकाळ...
आत्ता मात्र मी नव्यानं सुरवात करतो आहे
भुतकाळ विसरून सारा भविष्यासाठी जगतो आहे
आठवणीच्या साऱ्या रात्रीं सारून बाजूला
उज्वल भविष्यची नवी पहाट शोधतो आहे......

