मैत्रीण
मैत्रीण
बारावीनंतर बी एस सी संगणक शास्त्रच्या पहिल्या वर्षात प्रवेश झाला. नवीन काँलेज...नवीन मित्र मैत्रिणी ...नवीन अभ्यासक्रम.....नवीन जगात पाऊल टाकले होते. प्रँक्टिकलसाठी ग्रुप करायचे होते. मी आणि अस्मिता मिळुन प्रँक्टिकल करायचे ठरवले.
मी अभ्यासात चांगली असल्यामुळे घरात मला कुणीही कसल्याही गोष्टीसाठी विरोध करीत नव्हते.बोलका स्वभाव असल्यामुळे मैत्रीही पटकन व्हायची.
अस्मिता ही बाजुच्या तालुक्याच्या गावातील मुलगी होती. इथे ती महाविद्यालयालयीन होस्टेल ला राहत होती.तिला वडील नव्हते. मोठा भाऊ नोकरीवर होता. बाकी लहान भाऊ,अस्मिता हे शिकत होते.लहाणपणातच जबाबदा-या सांभाळणारी हि मुलं होती.
सहाजिकच मला तिच्याबद्दल आदर वाटु लागला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशापद्धतीची व्यक्ती आली होती.मी फार भावनिक होऊन तिला ऐकायचे. तिच्या घरातील परीस्थिती ऐकून मी फार हळवी व्हायची. तीन वर्षे पार पडली. एम एस सी संगणक शास्त्र दोन वर्षासाठी प्रवेश केला.अस्मीता सुद्धा सोबत होती .परत प्रोजेक्ट, प्रँक्टिकलसाठी एकत्र काम करू लागलो.
पहिल्या वर्षाला तिचे काही विषय राहिले.माझे संपूर्ण विषय निघाले.महाविद्यालयातिल शेवटचे वर्ष सुरू झाले. अभ्यास वाढला अस्मिता च्या रुमवर अभ्यास करायला जाऊ लागले. घराबाहेर राहण्याचे फायदे जास्त असतात असे वाटु लागले,किंबहुना ते जाणिवपूर्वक तसे भासवण्यात आले. ह्या दरम्यानच्या काळात अनुभव म्हणून कम्प्युटर इनस्टिटुटला पार्ट टाइम नोकरी केली .ति ही अस्मिता करीत होती म्हणून. अस्मिताला पैशाची गरज होती. मी हौस म्हणून केली शिवाय अनुभव मिळणार होता.
आमच्या आधी पाच..पाच वर्षापासून तिथे काम करीत असलेले सुशिक्षित भेटले.
हळूहळू सर्व जणांशी ओळख झाली. सगळं चांगल चालू होतं. बहुतेक सर्वांना नोकरी फार आवश्यक होती त्यामुळे तिथल्या (मुली) टिचर जे जे काम पडेल ते करीत होत्या. मला नोकरी असली तरी ठिक नसली तरी ठिक असे होते. मी ठरलेल्या वेळी यायचे आणि वेळ संपल्यावर निघायचे.
असे पंधरा दिवस चालले. एक दिवस मँडम नी मला अर्धा तास जास्त थांबून काही प्रिन्ट आउट काढायला सांगितले. मी सरळ नकार दिला. मँडम मला शक्यच नाही असे म्हणाले.कारण एका दुसऱ्या इनस्टिटुटला सुद्धा मला दोन महिण्यासाठी शिकवायला बोलाविले होते. मँडमला मी सरळ सांगितले तुमच्याकडे अर्धा तास मी उशिरा येत नाही तसेच दुसरीकडेही उशीरा जाणार नाही. त्या म्हणाल्या सगळे बसले आहेत तु ही थांब नाही. मी नाही म्हटले. त्यावर त्या म्हणाल्या इतका अहंकार बरा नाही. तुझी मैत्रीण बरोबर बोलली होती तु अहंकारी आहेस,माझा अपमान करण्याची तु संधी शोधतेस,तुला मी नोकरीवरून काढुन टाका.
मँडमला मी शांतपणे सांगितले हा अहंकार नाही, मी तुमचा आदरच करते आणि असे तुम्हाला अस्मिताने का म्हटले. त्यावर त्या म्हणाल्या तुझ्याबाबत अस्मिताने मला सांगितले तसेच इतर टीचर लोकांनासुद्धा हेच मला सांगण्याबाबत सांगितले.
त्या दिवशी अस्मिताचे खरे रूप माझ्या समोर आले. परंतु हे तिने का केले, असे करुन तिला काय मिळाले मला आज पर्यंत कळले नाही.
आजही हे सर्व आठवले की मला स्वतः चाच राग येतो की जीला मी मैत्रीण समजले ती माझी मैत्रीण नव्हतीच. आनंद ह्याच गोष्टीचा आहे की वेळेतच तीचे खरे रुप उघडे पडले अन्यथा मैत्रीच्या नावाखाली ति मला काय काय अनुभव देणार होती हे तिलाच ठाऊक.
माझी मैत्री खरी होती ह्याचे मला कायम समाधान राहील.