Pranjali Kalbende

Tragedy Others

3  

Pranjali Kalbende

Tragedy Others

चुकीचे पाऊल

चुकीचे पाऊल

6 mins
993


 औरंगाबादच्या मराठी विभागातील सेमिनार हाँल मराठी माणसांनी गच्च भरला होता. स्वरा राजवाडे ....असे नाव संचालिकेने अभिमानाने पुकारले. मनात असंख्य चांगल्या वाईट विचारांना चुरगाळीत खंबीरपणे जागेवरून उठले. व्यासपीठाकडे सरसावतांना अधुनमधून मित्र मैत्रीणींशी हस्तादोलन करीत करीत व्यासपिठाच्या मधोमध उभे राहिले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हसतमुखाने अभिनंदन करीत मराठी भाषेतील डाँक्टरेट पदाचा अवार्ड मला बहाल केला.

सर्व हाँल कडे एक नजर टाकून सर्व उपस्थितांना डोळ्यात सामावुन सर्वांचे आभार मानले.

             आजचा दिवस माझ्यासाठी सोनियाचा होता खरे परंतु हा दिवस माझ्या एका चुकीच्या पावलामुळे मला पहावयास मिळाला असेच मी म्हणेन. ही गोष्ट माझी ...स्वरा राजवाडेची. नुकतीच बारावी पास होऊन बी ए ला अँडमीशन घेतली होती.घरात लहान भाऊ आई वडील आणि मी स्वतः. असे चौकोनी कुटुंब होते. मुळचे आम्ही कोकणचे परंतु वडीलांच्या नोकरीमुळे ब-याच वर्षांपासून औरंगाबाद येथे स्थायिक झालो. संपूर्ण कुटुंबात मी एकुलती एक मुलगी त्यामुळे काका,आजोबा, बाबा.. सर्वांच्याच लाडाची होते. रुपाने,गुणानेही उजवी होते त्यामुळे घरात मला मान जास्त होता.

                अभ्यासाबरोबर नाटकांचा,अभिनयाचा छंद कधी जडला कळलेच नाही. घराच्या बाजुलाच कलागुणांना वाव देणारी ,जाणती, अनुभवी लोकं राहत होती. त्यांच्या नाटकाच्या तालमी बघण्यात मजा येऊ लागली. अधुनमधून तिथे दारावर कुलुप असायचे .शेजारच्या बाईंना विचारल्यावर कळाले की नाटकाच्या प्रयोगासाठी बाहेर गावी गेले आहेत.मी आणि माझ्या काही मैत्रीणी सतत त्या लोकांच्या संपर्कात येऊ लागलो.त्यांच्या कधी कधी लहान भाऊ सोहम सुद्धा आमच्यासोबत यायचा.

                स्वरा....स्वरा......आईने हाक मारली.तशीच भावाला घेतले आणि घराच्या दिशेने पळाले.धाप टाकतच दाराजवळ धबकले तोच आई म्हणाली.

हे बघ स्वरा...आता तु लहान नाहिस.इतका इतका वेळ त्या माणसांच्या गराड्यात राहतेस..बेटा हे मुलीच्या जातीला बरे नव्हे...

तशीच सोहमला पुढ्यात करीत मी म्हणाले ..

हा होता की अंगरक्षक माझ्याबरोबर...

हो की नाही रे...

होय तर...सोहम म्हणाला.

सोहमलाही उगाचच शुरविर असल्यागत वाटलं.

ताई ..तुझ्यासोबत तुझा हा भाऊ नेहमीच असणार आहे...

आई आणि ताई कडे बघत सोहम म्हणाला.

स्वतःशीच पुटपुटत आई स्वयंपाकघरात शिरली .

मला आता रान मोकळे झाले होते. नाटकात काम करण्याची इच्छा दिवसेंदिवस बळावत चालली होती.

               थोडं नाटकाच्या तालमी बघुन बघून, थोडं सराव करुन जरा अभिनयाशी ऋणानुबंध जुळत चालला होता. महाविद्यालयीन नाटकाच्या स्पर्धेत सहभागी होऊ लागले होते. नाटक म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे नाटक हे कधी झालं हे कळलचं नाही.

               असेच दिवस आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत चालले होते. त्यापैकीच एक आनंदाचा दिवस. महाविद्यालयात झालेल्या एका नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस मला मिळाले. आनंदाच्या भरात उड्या मारू लागले. सर्वप्रथम ही वार्ता कुणाला सांगावी असा विचार मनात आला.

आईला....बाबांना....काकाला....स्वतःशीच बोलत होते.

काय यांना माझ्या इतकाच आनंद होईल.....?कदाचित नाही.

अचानकपणे नाटकाचा सराव करणारी मंडळी आठवली. ह्यांना भेटायलाच हवे असा विचार करताच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचले.

                आज त्यांच्यापैकी फक्त एकजणच तेथे बसले होते खादीचा झब्बा, जिन्सची पँन्ट आणि हातात नाटकाच्या सरावाचा कागद....पाठमोऱ्या त्या मुर्तिला बघत दारातच माझी समाधी लागली.

स्वरा...ना तु ...बरोबर..आवाज कानावर पडताच भानावर आले.

अ...हो...बरोबर..मी म्हणाले.

तुम्हाला माझे नाव माहिती आहे?

हो...तुझी आई हाक मारते तेव्हा तुझ्याबरोबर आम्हिही ऐकतो तुझे नाव.मग उगाचच शोले मधल्यासाररखं स्वरा तुम्हारा नाम क्या है।।। असं कशाला विचारायचं.

खो..खो..करत दोघेही। हसत बाजुलाच असलेल्या बाकड्यावर बसलो.

तुमचे नाव मात्र मला। माहित नाही हं।

माझ नाव ...विजय बरं का..मला नेहमी जिंकायला आवडतं म्हणून कदाचित माझं नाव विजय असेल .

जरा स्मित करीत हातातले बक्षीस पुढे करीत मी सुद्धा आज जिंकलेय बर....हे बघा..बक्षीस दाखवु लागले.

अरे वाह....खुप खुप अभिनंदन... यशस्वी लोकं मला आवडतात. तु आमच्यासोबत नाटकात काम कर .नवनवीन लोकांना संधी देण्यासाठी आमची टिम धडपडत असते.रोज तालमीला येत जा.एखादी भुमिका तुझ्यासाठी निर्माण करु..काय म्हणतेस...

स्वराला विजयचे बोलणे,वागणे प्रभावी वाटले.ती मन लाऊन सर्व ऐकत होती .

अभ्यास सांभाळून सर्व मला कितपत जमतं बघु ..पण धन्यवाद सर.येते मी

परंतु वेळेचे भान ठेवुन स्वरा घरी आली.

काय ग ...हातात काय तुझ्या.... आईने विचारले

अगं..आई...अभिनयासाठी बक्षीस आहे..आहेस कुठे....भानावर येत मी म्हणाले.

आईने कौतकाने जवळ घेतले.छान छान.. अभ्यास सांभाळून सर्व करतेस ...गुणाची बाय...माझी..

सांयकाळी बाबा घरी आल्याआल्या बाबांच्या गळ्यात पडुन मी बक्षीस समोर केले.बाबांना बक्षीस पाहुन आकाश ठेंगणे झाले. माझी लेक ...माझा गर्व आहे .अभिमानाने बाबाचे डोळे पाणावले.

       दुसऱ्या दिवशीपासून काँलेजला जाणे नाटकाची तालिम,बिएचा अभ्यास,...असा दिनक्रम सुरू झाला.

औरंगाबाद मध्येच एक नाटकाचा प्रयोग होणार होता त्यात मला भुमिका मिळाली होती. आईबाबांनी परवानगी दिली होती.

       विजयशी जवळीकता हळूहळू वाढु लागली. भेटिदरभेटीनंतर अधिकच विजय हवाहवासा वाटु लागला.विजयनेही बरेचदा लग्नाच्या विषयी विचारले होते.

परंतु आमच्या वयातील अंतर चिंतेचे कारण होते. तो विस वर्षाने माझ्यापेक्षा मोठा होता. शिक्षण पुर्ण करायचं होतं सगळं अर्ध्यावर टाकून लग्नबंधनात अडकणे मनाला पटत नव्हते.

विजयला सर्व गोष्टींची जाण होती.त्यामुळे योग्य वेळेची वाट बघत आम्ही दिवसं ढकलत होतो.

           एके दिवशी मैत्रिणीने आईचे कान भरले. विजय आणि माझ्या नात्याला ओरबाडून ओरबाडून सांगितले. आईला स्वतःच्या कानावर विश्वासस बसेना झाला. माझ्याकडून शहानिशा केल्यानंतर मात्र तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला तिने जनावरांना बदडावे तसे मला बदडले. तीच प्रतिक्रिया बाबांचीही होती.

         अचानक सर्व बाहेरच जग माझ्यासाठी बंद झाले. काळोख्या खोलीत दिवसरात्र घालवत विजयच्या आठवणीने जिव अधिकच गुदमरुन गेला.

      संधी साधुन अंधाऱ्या रात्री ते चुकीचे पाऊल घराबाहेर टाकले. विजयच्या मित्राच्या मदतीने एक खोली बघीतली होती. विजय आणि मी एकत्र राहु लागलो. सर्व मनासारखे झाले होते. नाटकाला सोबत,घरात सोबत,सर्व छान चाललं होतं.

            नाटकामागुन नाटके करीत गेले. सोबत शिक्षण, घरातील जबाबदारी ...सर्व परिचीत,मित्रमंडळी कौतुक करु लागली. लहान वयातही सर्व कामगिरी चोख बजावते हं स्वरा...असे शब्द सतत विजयच्या कानात घुमु लागले.

स्वराला इतरांच्या कौतकाचे फारसे काही वाटत नव्हते. तिच्यासाठी फक्त विजयने दिलेली दाद मोलाची होती.

विजय तोंडभरून स्वराचे कौतुक करतही होता.

           कालांतराने ,स्वरा ऐवजी एखादे नाटक करणे सर्वांना जमतच नव्हते. तिच्या काँलेजच्या वेळा सांभाळून ते प्रयोग ठेवु लागले. विजयचा प्रभाव त्याच्या मित्रमंडळीतुन कमी होतोय असा काहिसा समज करून तो त्यांना टाळु लागला.

मात्र स्वराला तालिमला जाणे भागच पडत होते. स्वराचे असे जिंकणे विजयला त्याचे अपयश वाटु लागले

विजयाचा पुरुषी अहंकार दुखावला होता.अहंकारामुळे एका क्रुर विजयचा जन्म झाला होता.

            विजय....विजय.....बघ माझा निकाल... मी ओरडतच घरात आले.

विजयच्या मनस्थितीचा मला किंचितही अंदाज नव्हता.

किती चांगल्या मार्काने पास झालीय तुझी बायको..! लाडात येत मी म्हणाले.

अगं...किती पुढं जाशील... किती जिंकशील....आणि किती मला हरवशील.....विजय म्हणाला

विजय माझे नाव आहे तुझे नाही. ......बेभानपणे विजय बरळत होता.

आज मनातील सर्व अहंकाराची आग त्याला माझ्या पुढे ओतायचीच होती.

त्याच्या डोळ्यात द्वेष अग्नी जळत होता .

विजय...विजय....हे काय बोलतोय...मी म्हणाले.

शब्दाला शब्द... वाढत गेला.

संवादाची जुगलबंदी कधी सुरु झाली कळलेच नाही. ह्या सर्व प्रकारात त्याने मला भिंतीवर आदळले.जितक्या जखमा शरीरावर झाल्या त्याहुन शंभर पटिने हदयावर झाल्या होत्या

     दुसऱ्या दिवशी हाँस्पिटलमध्ये डोळे उघडले बाजूला आई बाबा चिंततुर नजरेने मला बघत होते.

विजय कुठेही दिसत नव्हता. त्याच्याबद्दल विचारायचे धाडसही झाले नाही.

थोडक्यात काय ते समजले.प्रेमापेक्षा अहंकार विजयी। झाला होता.

विजयला विसरणे शक्य नव्हते. अंधाऱ्या खोलीतील पुर्वीची मानसिक अवस्था आणि आताची भावना अतिशय वेगळी होती

ये बाळा...घरात ये...आईबाबांच्या उंबरठ्यावर आल्यावर आईने धिराने म्हटले.

तेव्हा आईला बिलगुन घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबाबत कबुली। द्याविशी वाटली..पण धिर झाला नाही.

तेच घर..तिच माणसं ...पण चुकल्याचुकल्या सारखं वाटतं होतं.

त्या एका रात्रीत काय झालं ...विजय काय बोलला ...मला हाँस्पिटलमध्ये कोणी आणले...तुम्हाला कुणी सांगितले... कित्ती प्रश्न अनुत्तरित होती....

आई.....ऐ...आई.।।।  हाक मारताच आई जवळ आली.

‌बोल बाळा..काही हवयं का? काही खातेस का..?़़

काय झाले होते...त्या रात्री....मी विचारले.

विजयनेच आम्हाला फोनवरून सर्व काही सांगितले. हाँस्पिटलमध्ये घेऊन जा तुमच्या मुलीला.माझा तिचा काही संबंध नाही ...असा म्हणाला.

बाळा....। आमच्या तर पायाखालची जमीनच सरकली बघ...

आई हुंदके देऊन रडु लागली.

आमच्या सोन्यासारख्या मुलीच्या जीवनाची माती करतांना त्याला काहिस कसे वाटले नाही... आई बोटे मोडु लागली.

काय बोलावे...काय करावे...काहीच कळेनासे झाले.

विचारांच्या दाट गर्दीत रात्र हरवुन गेली.

अशा कित्येक रात्री गेल्या.

सगेसोयरे भेटिला येऊ लागले. विचारपूस करुन,सांत्वन करून आपापल्या घरी परतु लागले.

एकदा सोहम जवळ आला. माझ्या डोळयातील अश्रुंना पुसत गहिवरल्या स्वरातच म्हणाला,

ताई,...मी आहे न तुझा अंगरक्षक... तु मला सोबत का घेऊन गेली नव्हती.आणि ओक्साबोक्शी रडु लागला.

छोट्या भावाच्या त्या एका वाक्याने अंगात नवे बळ संचारले.ज्या लोकांना आपली पर्वा नाही त्यांच्यासाठी रडत बसणे व्यर्थ आहे.

उठ स्वरा..।सज्ज हो...चुकलेल्या पावलांना परत सरळमार्गी आणण्यासाठी कंबर कस.....निर्धाराने स्वतःशीच पुटपटले.

   कोमल है कमजोर नही

   शक्ती का नामही नारी है

   सबको जीवन देणेवाली

   मौतभी तुझसे हारी है ।

              बिए भाग२...३...एम१...२...करत करत आज नावापुढे डॉक्टर असे लागणार आहे.

एका चुकीच्या पाऊलाने जीवनाचा घात केला होता.परंतु धन्य माझे मातापिता,छोटा भाऊ सोहम त्यांनी चुकलेल्या पावलांना नवी वाट दाखविली.

आई वडील नसते तर शिक्षणाशी पुन्हा कास धरु शकले नसते.माझा आज जो सत्कार होतोय जी प्रतिष्ठा मी मीळवली आहे ती मिळवता आली नसती.

आज कळतयं की जीवनात प्रत्येक निर्णय घेतांना किती चाणाक्ष असायला हवे. चाणाक्षपणा जर वापरला नाही तर जीवन मातीमोल व्हायला वेळ लागत नाही. माझ्या सारख्या कितीतरी मुली अल्पवयात असे चुकीचे निर्णय घेतात आणि एका उज्ज्वल भविष्याला मुकतात.

शिक्षण आहे सर्वकाही

शिक्षणाविन बुद्धी नाही

शिक्षणाविन प्रगती नाही

शिक्षणाविन कुठेच थारा नाही

शिक्षणामुळे कुणाचीच गुलामी नाही



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy