मातृदिन विशेष २०२३
मातृदिन विशेष २०२३
आई शब्द कानावर पडताच समोर उभी राहते एक स्त्री . आई जी 9 महिने पोटात बाळाला वाढवते, मग बाळ जन्माला आल की त्याचं संगोपन करते अशी कल्पना आपल्या डोळ्यासमोर लगेच उभी राहते.
पण आज मी अश्या एका आईची गोष्ट सांगणार आहे की जी स्त्री नसूनही आई आहे.
जस विठ्ठलाला म्हटल जात ना, "जगी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकराची विठू माऊली " असच काहीस व्यक्तिमत्त्व माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं आहे नव्हे तर मी रोजच अनुभवते आहे.
बरोबर ओळखलं तुम्ही ,ते व्यक्तिमत्त्व दुसर कोणी नसून माझे पती अर्थात माझ्या मुलीचे अन्वीचे बाबा अभिषेक आहेत .
जेव्हापासून अन्वीला घेऊन मी सासरी आलेय तेव्हापासून आजतागायत अभिषेक सतत अन्वीच्या सोबत असतात .तिला काय हव काय नको इथपासून तर तिला भुल लागली की खाऊ घाल, झोप आली की गाणं म्हणून झोपवून दे, संध्याकाळी मालिश कर ,अंघोळ कर , फिरायला घेऊन जा इथपर्यंत सगळे काम ते स्वतः करतात .त्यातही स्वतचं ऑफिस , घरचे काम तेही असतातच तरी देखील ते अन्वीला सांभाळण्यात काहीच कसर ठेवत नाहीत .त्यांचा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळा वेळ तीलाच समर्पित आहे म्हटल तरी चालेल.
जेवढी काळजी ,जेवढं प्रेम तिला एका आईकडून मिळायला हवं त्याही पेक्षा जास्त प्रेम आणि सहवास अन्वीला तिच्या बाबांकडून मिळत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात एका बाळाला तिच्या वडिलांचा इतका सहवास आणि प्रेम लाभाव यापेक्षा दुसर काय हवं एका आईला.
आजच्या मातृदिनाच्या निमित्याने मी हेच म्हणेल की आई तीच व्यक्ती असू शकते जीला भावना ,प्रेम ,वात्सल्य , माया,ममता या शब्दांचा अर्थ माहिती आहे नव्हे तर त्याची किंमत आहे.
शेवटी एवढच म्हणेल फक्त स्त्री आहे म्हणून कोणी आई बनू शकत नाही तर आई घडवावी लागते.
