Renuka D. Deshpande

Tragedy Inspirational

4.5  

Renuka D. Deshpande

Tragedy Inspirational

"स्वातंत्र्य की मनमानी"

"स्वातंत्र्य की मनमानी"

1 min
250


स्वातंत्र्य ! अर्थातच कोणतीही गोष्ट करत असतांना

आपले विचार, आपला दृष्टीकोण मनमोकळे पणाने

एका विशिष्ट मर्यादित राहून मांडण्याचा हक्क. 


पण आजकाल स्वातंत्र्याचा अर्थ बेधुंद बेपरवाई,

भ्रष्टाचार, मनमानी, मनास वाटेल तस वागणं असाच

झालाय मग त्याचा त्रास इतरांनाही का होऊ नये!


आजकाल तर लोक वाटेल तसं वागतात. आता

काय लोकशाहीच आहे, आपण स्वतंत्र आहोत,

काय कोणाची भीती आपण आपल्या मनाचे राजे झालो

आहोत.


पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल ना

तर जा परत इतिहासात, पलटा भारताच्या स्वातंत्र्य

लढ्याची पाने, आठवा ते शुरविरांचे बलिदान, त्यांनी

सोसलेले कष्ट-दु:ख त्यांनी केलेला त्याग , प्रसंगी त्यांनी

फितुरीही केली असेल पण फक्त स्वातंत्र्यासाठी.


आणि आज आपण काय करत आहोत त्या

स्वातंत्र्याचे तुकडे-तुकडे?


आपल्याला कळतं की स्वातंत्र मिळालय ते फार कष्टातून,

बलिदानातून,पण ते अंगी वळत नाही.


कारण आपल्याला अंगी बाणून घ्यायचे नाही.

आज- स्वातंत्र तर मिळालय खरं, पण आता या स्वातंत्र्याला

कुठेतरी मर्यादा यायला हवी. कुठेतरी त्याचं स्थान

सुराज्यात प्रस्थापित करायला हवं. त्यासाठी आपणच

पुरेपुर प्रयत्न करायला हवेत.


स्वातंत्र्य म्हणजे मनमानी असा त्याचा अर्थ न

लावता जे स्वातंत्र आपल्याला मिळाले आहे ते

अबाधित कसं राखता येई त्यातून देश हित कसं राखता

येईल, त्याचं सुराज्यात रूपातर कसं करता येईल यांचा

प्रयत्न करायला हवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy