Aarti Mishra

Inspirational

3.6  

Aarti Mishra

Inspirational

माझं घर माझंच आहे... मोलकरीण कशाला हवी?

माझं घर माझंच आहे... मोलकरीण कशाला हवी?

2 mins
337


माहेरी आम्ही तीन बहिणी व दोन भाऊ होतो. त्यात मी बहिणींमध्ये सर्वांत लहान. त्यातल्या त्यात एकत्र कुटुंबात असल्यामुळे मी कधी किचनमध्ये जास्त जायचे नाही. पण आईने मात्र तिन्ही बहिणींना कामाची सवय लावली होती. आमचं घर खूप मोठं. म्हणून साफसफाई रोज म्हणजे रोज करायची. स्वयंपाकातपण मदत रोज करायची तेही अभ्यास करून असे माझ्या आईचे नियम होते. मी मात्र सर्वांत लहान असल्यामुळे कामाला कंटाळा करत असे. त्यासाठी आई अणि बहिणीचा मारही खात असे. मला काम करायला आवडत होतं पण असं वाटायचं... आहे ना इतक्या जणी काम करायला मग मी कश्याला मध्येमध्ये करू, म्हणून बसून राहायची.


   मग माझे लग्न झाले आणि सासरी आले. घरी फक्त सासरे, माझा नवरा आणि मी होतो. मग काय... घरच्या कामाची जबाबदारी माझ्यावर. सुरुवातीला खूप कठीण वाटले. पण नवीनच लग्न झाले होते. संसार मांडण्याचा अंगात खूप उत्साह होता. मग काय शिकायला सुरुवात केली. हळूहळू सगळं करायला शिकले. तेव्हा इंटरनेट नाही की गुगल नाही. शिकणार तरी कसे. पण कधी आईला विचारायचं तर कधी शेजारीपाजाऱ्यांना. माझी थोडी धावपळ व्हायची. मला माझ्या नवऱ्याने विचारले. तुला होत नसेल तर सांग, बाई ठेऊ या? पण मला काही बाईचं काम आवडत नव्हतं. आईकडे बाई होती. त्यांची कामे बघून होती मी. किती ते घाणेरडं काम करायच्या आणि काही बोललं की राग धरायचा. मला मुलं झाल्यानंतर त्रास व्हायचा कामाचा. पण सांभाळून घेतल कारण शेवटी माझाच संसार ना? मीच उभा केला होता. मी जॉब पण करायचे. ट्यूशनपण घ्यायची. पण थकवा कधी जाणवला नाही.


    माझं घर मीच सजवणार आणि सांभाळणार हेच एक स्वप्न. २४ वर्षांपासून एकही बाई न ठेवता मी माझे घर सांभाळत आहे. आनंद म्हणजे माझा नवरा आणि माझी दोन्ही मुलं मला घर सांभाळायला मदत करतात. घर ही दोन अक्षरे, पण आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. आपलं हसणं, खेळणं, बागडणं, रुसवे, फुगवे, एकमेकांना माफ करणं, काळजी घेणं या लाडक्या घरातच होतं. घर एकमेकांना धरून ठेवतं. मग आता तुम्हीच सांगा... बाई कश्याला हवी... माझं घर माझंच आहे... हो ना!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational