माझे गाव
माझे गाव


माझ्या गावाचे नाव आहे शिरपूर. हे तालुक्याचे गाव आहे. शिरपूर हे गाव महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेले आहे. माझे गाव सौंदर्याने नटलेले आहे. माझ्या गावात शुद्धता, स्वच्छता आणि शांतता यांचा मिलाप पाहावयास मिळतो.
सगळीकडे हिरवीगार शेती, झाडी, पशुपक्षी, प्राणी आणि उद्याने पाहायला मिळते. शिवाय दोन एकर क्षेत्रात हजार लिंबाची झाडे आहेत. साधारणतः पंच्याहत्तर हजार लोकवस्तीचे गाव आहे.
माझ्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे माझ्या गावात पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रकल्प राबविला गेला आणि त्याचे अनुकरण करण्याकरता बऱ्याच जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून लोक आलेत. हा प्रकल्प फक्त तालुका आणि जिल्ह्यासाठी मर्यादित नसून तो दुसऱ्या देशातसुद्धा राबवित आहे, त्या प्रकल्पामुळे आम्हाला पूर्ण शिरपूर तालुक्याला पाण्याची कमतरता कधी भासत नाही.
माझ्या गावात दोन बालाजी मंदिरे आहेत, तसेच आमचे येथे खंडेरावची यात्रा भरते. ही यात्रा पंधरा दिवस चालते. माझ्या गावात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते. पुण्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून शिरपूर या गावाकडे पाहिले जाते. माझ्या गावात सर्व प्रकारची कॉलेजेस आहेत.
माझ्या गावात अरुणावती नदी वाहते. त्याचा मूळस्रोत तापी नदीचा आहे. तापी नदी माझ्या गावाच्या बाहेरून वाहते. त्यामुळे माझ्या गावाचा परिसरच नाही तर पूर्ण आमचा शिरपूर तालुका हिरवळीने प्रसन्न दिसत आहे.
आमच्या येथे तीन मोठी मोठी उद्याने आहेत. त्या उद्यानात खेळण्यासाठी अनेक प्रकारचे पाळणे आहेत आणि अनेक प्रकारचे फुलझाडे आहेत. एवढेच नसून तर तेथे महिलांसाठी ओपन जिमसुद्धा आहे. त्याला लागून वाॅटर पार्कसुद्धा आहे. एक उद्यान तर फक्त महिलांसाठीच आहे. नुसते उद्यान नसून कसरत करण्यासाठी ओपन जिमसुद्धा आहे. त्या उद्यानात खूप सारी तुळशीची रोप आहेत. खूप प्रसन्न असे वातावरण तिथे निर्माण केले आहे.
आमच्या नगराध्यक्षा जयश्री बेन पटेल स्त्रियांसाठी आणि जनतेसाठी त्यांच्या आरोग्यासाठी शारीरिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात.
जगभरात स्वच्छता ही मोहीम राबवली गेली त्यात माझ्या गावाचा 12 वा क्रमांक आहे.
मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे.
माझे गाव शिरपूर नव्हे तर भविष्य काळाचे सिंगापूर आहे.