देवास पत्र
देवास पत्र
वि. विशेष. पत्र लिहिण्यास कारण की,
मी आजपर्यंत देवा तुमची वाट पाहत आहे. तुमची खूप आठवण येते. कसे चालू आहे तुमचे अगदी मजेत ना. माझे तुमच्याकडे एक काम होते .म्हणूनच मुद्दाम फोन न करता विचार केला की आपण एक पत्रच लिहावे. आजकाल नेट पण खूप स्लो झाले. सगळे घरी बसूनच कामे चालू आहे. आपण आता मुद्दे चे बोलू
तुला माहित आहे का मी एका मुक्या मुलाचीआई तो बघ खूप सुंदर आहे. अगदी हुबेहूब तुझ्या सारखा दिसतो आठवले ना तुला तो अनुदादा त्याच्या सारखे खूप आहेत रे
पाहा जरा खूप सारे आई वडील तुला आठवण करतात. विनवणी करतात. माझ्यासारख्या बऱ्याच आया तुला मनातून पत्र लिहीत असतील आणि ते तुला कदाचित कळतही असेल पण उत्तर मात्र तू एकालाही देत नाही. म्हणूनच मी विचार केला कि तुला पत्र लिहावे. तशी मला तुझी आठवण रोज खूप येते. तुझ्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही खास करून जेव्हा माझं बाळ तापाने फणफणत सर्दीने वाहत कधीकधी अगदीच हिरमुसले
ले असते तेव्हा मला तुझी खुप आठवण येते की तुझ्या मनात कुठला डाव तर नाही सुरू... खूप मन घाबरते रे देवा. मग तुला मनापासून आळवून विनवून मी तुला म्हणते नको रे देवा अजून माझ्यात बळ आहे. असं काही करू नको रे देवा...
दिवसांमागून दिवस चाललेत कधी तरी आमची पण आठवण राहू दे. अरे असे किती दिवस चालणार. आज बरोबर ६९१६ दिवस झालेत. तू तर सगळ्या जगाला चालवतोस रेड्याकडून वेद बोलून घेतोस आणि मग माझ्या बाळासारखे... अनेक अशी मुल आहेत त्यांना का देतो ही सजा? आणि हो आज त्या अनु चा वाढदिवस आहे वेळ मिळेल तर नक्की ये पण त्याला जास्त काही नको .येताना त्याचा मुखी बोल आणि त्याच्या पायात बळ घेऊन ये.
सर्वांना माझा साष्टांग नमस्कार सांग. वेळ मिळाला तर पत्राचे उत्तर दे.
तुझीच,
कृपाभिलाषी