माझा भारत सुद्धा.....
माझा भारत सुद्धा.....


थंडगार हवेच्या झोतामुळे डोळ्याच्या पापण्या उघडण्याची राजेंद्र कडून मोठ्या प्रयत्नाने धडपड सुरू होती, अंधुक चित्र समोर दिसत होते,चित्र कसले सर्वत्र पांढरे शुभ्र, थोड्या वेळासाठी वाटले आपल्या डोळ्यांची काहीतरी समस्या निर्माण झाली काय? पण थोडे बरे वाटल्यास समजले सर्वत्र बर्फ आहे जो आयुष्यात खूप कमी वेळा माझ्या भारत देशात मी पाहायचो आणि पायाची हालचाल करतो तर खूप वेदना होताना जाणवत होतं, एकदम डोक्यात प्रश्न आला मी इथे कसा? कुठे गेले ते संशोधन केंद्र ज्यामध्ये जगभरातील सर्वोत्तम माणसे जग आपल्या मुठीत ठेवण्याचे संशोधन दिवसरात्र करण्यात गुंग होते आणि आता एकदम बर्फाळ प्रदेशात मी इथे कुठं, कसं या प्रश्नाने राजेंद्र विचारात गुंगून जात होता आणि मागील ५ वर्ष त्याला आठवू लागले....
भारतात येणाऱ्या हजरो परदेशी लोकांना मदत करणारा मी राजेंद्र मग भारत भरतील कोणतेही ठिकाण चांगला गाईड म्हणून परदेशी पर्यटकांना उत्तम सेवा देणारा अशी माझी चॅन ओळख आणि माझ्या माहितीचा संग्रह आणि त्याचा तल्लखपणाचा एका परदेशी पर्यटकांने अंदाज घेतला आणि विचारले की तुझी परिस्थिती इतकी गरीब माझ्या देशात चल तुला खूप सारे पैसे मिळतील. मात्र राजेंद्र भारतीय स्वाभिमानी माणूस म्हणाला मला माझ्या देशातील हे सर्व वैभव जगभराला दाखवायचं आहे पैसे नको मला, तो पर्यटक म्हणाला आज जर लाखो लोक तुझा भारत पाहायला येत असतील तर मी तुला अस काही शिकवेन की ज्यामुळे कोट्यावधी लोक तुझा वैभवशाली भारत पाहायला येतील आणि राजेंद्र लगेच तयार झाला व जगातील एक गुप्त ठिकाणी जगभरातील असे सर्वोत्तम तल्लख माणसे एकत्रित संशिधन करत असतात त्यात राजेंद्र विचार करू लागला. आपण नक्की कोठे अडकलो मात्र इथून सुटका नाही हे त्याने ओळखले व कामाला सुरुवात केली की, आपण असे काहीतरी करू जेणेकरून माझा भारत जगात नुसता सर शक्तिमान नाही, तर त्याचं वैभव सर्व जग आपुलकीने पाहिलं, राजेंद्र कमळ लागला प्रत्येक व्यक्ती उद्या,पुढील महिना ,वर्ष कसे ताब्यात येईल व उद्या माझा देश कसा असेल यावर काम करू लागले, राजेंद्र विचार करू लागला आणि कित्येक महिने प्रयत्न करून राजेंद्र ने एक असे मशीन बनवले की ज्यामध्ये बसून मनात ज्याचे चित्र समरण करू तो भाग पुढील 50 वर्षे लस असेल याची कल्पना करायची व त्याप्रमाणे त्यात बदल करणे सहज शक्य होणार होते, राजेंद्र ने विचार केला मी स्वतः तर प्रात्यक्षिक केले जिथे संशोधन सुरू होते त्याबद्दल मशीन मध्ये बसून कल्पना केली. तर पुढील 20 वर्षात भारतातील सर्वोत्तम शास्त्रज्ञा व इतर लोक या ठिकाणी जबरदस्तीने डांबून ठेवल्याचे दिसताच. राजेंद्र घाबरला त्याने सर्व सामग्री आपल्या पिशवीत घातली व लवकरच आपण हे ठिकाण सोडायचे असे ठरवले, मात्र एवढ्या वेळेत त्याने मशीनवर बसून कल्पना केल्याने ते ठिकाण बदलले होते 20 वर्षांनि पुढे गेले होते त्यातही बॉस ने सर्वांना बंदी बनवण्याचा आदेश दिला. मात्र तोपर्यंत राजेंद्र बाहेर पडला होता, दाट आरण्य ,कुठे जायचे माहीत नाही, तरीही धावत होता , अचानक एक गुरांचा मोठा कळप येताना दिसला राजेंद्र घाबरला. त्याला हे सर्व संशोधन घेऊन कसेही भारतात यायचं होतं, माझा वैभवशाली भारत हा नुसता आहे असा ठेवून त्याचं गुणगान आहे असं उत्तम होतच मात्र सर्वोत्तम करण्यासाठी त्याची धडपड सुरू होती.
त्याला या संशोधनाच्या जोरावर माझा भारत सर्व बाबतीत सर्वोत्तम होऊन जगाला शांती चा सर्वोत्तम मार्ग दाखवायचा होता. माझी असलेली संस्कृती, परंपरा टिकवून प्रगती साधायची होती. हे दुसऱ्या च्या हातात पडल्यास त्याचा वापर नक्कीच वर्चस्वासाठी झाला असता याची राजेंद्र ला जाणीव होती म्हणून त्याने सावध झाला व त्या कळपातील एक प्राण्यावर झडप मारून त्यावर स्वार झाला. थोड्याच अंतरावर सैन्य दिसले तसा छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याची व प्रसंगावधनाची आठवन येऊन तो त्या प्राण्यांच्या पोटाखाली चिकटला व त्यांना चुकवून पुढे झाला, वरून हेलिकॉप्टर भिरभिरत होते व अचानक एक गोळीने त्या प्राण्याचा नेम साधला व आम्ही दोघे दोन बाजूला पकडले गेले. काहो क्षणात ते लोक माझ्यावर झडप घालणार इतक्यात ती पिशवी मी एक प्राण्यांच्या शिंगाला अडकलवली व मला डोक्यात जोराचा फटका जाणवला आणि आता पाहतो तर मी निर्मनुष्य असलेल्या बर्फाळ प्रदेशात एकटाच दिसतोय.
राजेंद्र विचार करू लागला ते संशोधन आज माझ्या कडे असते तर मी आबालवृद्ध यांना मदत केली असती, माझ्या देशातील उद्योग सर्वोत्तम केले असते, तरुणांना योग्य मार्ग दाखवता आला असता, सर्व जगाला माझा भारत देह शांततामय मार्ग दाखवून जग आहे असं किंवा यापेक्षा सुंदर असतं, शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण होऊ शकलं असतं, आज माझा भारत सुद्धा.....