#lovelanguage #प्रेम असेही
#lovelanguage #प्रेम असेही


व्यक्त न झालेलेही प्रेम असू शकते
डोळ्यात दाटणारेही प्रेम असू शकते
तू त्या पल्याड असला तरिही
मनात माझ्या प्रेम असू शकते
तू व्यक्त करावे असे मी म्हणतच नाही
पण माझे व्यक्त होणे तरी तुला आवडावे
माझ्या मनातील भावना तू समजून घ्याव्या ही अपेक्षाच नाही
पण तुझ्या अंतरी मात्र मला डोकावू दे.
प्रेमाची व्याख्या तुझी माझी प्रत्येकाची वेगळी...
बघ अपेक्षा नाही म्हणता म्हणता शेवटी अपेक्षा आहेच नं.... या प्रेमात