Sudha Patil

Tragedy

3  

Sudha Patil

Tragedy

कथा खऱ्या प्रेमाची

कथा खऱ्या प्रेमाची

3 mins
238


 पंकज एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता.कठीण परिश्रम घेऊन पार्ट टाईम जॉब करुन तो इंजिनिअर झाला.आईबाबांनी त्याच्यावर खूप छान संस्कार केले होते.तो मुंबईत एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत त्याला नोकरी मिळाली. तो अत्यंत हुशार असल्यामुळे त्याच कॅंपस सिलेक्शन झालं होतं.कष्टाची चीज झालं म्हणून त्याचे आई-बाबा खूपच आनंदी होते.बघता बघता बघता त्याच्या नोकरीला एक वर्ष पूर्ण झालं.एके दिवशी आईचा त्याला फोन आला.अरे प़कज बाळा, "आता तुला चांगली नोकरी मिळाली आहे.आता लवकर लग्नाचा विचार कर.आम्हाला सून हवी आहे.अग आई,"सून अशी काय लगेच मिळते का?पण काळजी करू नकोस.मी विचार करेन.


 सुट्टीचा दिवस होता.रविचा पंकजला फोन आला.ए पंकज,"लवकर फ्रेश होवून माझ्या घरी ये.आज आपण फोरव्हिलर बुक करायला जातोय.अरे पण!..."ते काही नाही.आज आपण दोन गाड्या बुक करतोय.तु पैशाची काळजी अजिबात करू नकोस.चल मी फोन ठेवतो." दोघेही शोरुममध्ये आले.मेघा तिथेच नोकरीला होती.तिने दोघांना गाडीची सर्व माहिती सांगितली.ती इतकी गोड आणि नम्र होती की,पंकज तिच्या प्रेमातंच पडला.गाडी घेण्याच्या निमित्ताने त्यांची दोन तीनदा भेट झाली.तुम्ही कविता करता का?हो!चंद्रीका नावाने ज्या कविता प्रसिद्ध आहेत त्या माझ्याच आहेत." काय सांगता! ," आहो,मी तर चंद्रीका मॅडमचा फॅन आहे.चला म्हणजे आजपासून मी तुमचा फॅन आहे."मेघा सुंदर लाजली.हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढल्या.प्रेमांकुर दोघांच्या मनात रुजला.बघता बघता सहा महिने होऊन गेले.एका सायंकाळी समुद्र किनारी फिरताना दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली. मेघा,माझ्याशी लग्न करशील? मेघाच्या डोळ्यांनी होकार दिला.

  

एक दिवस अचानक मेघाला फणफणून ताप आला.आणि रक्ताची उलटी झाली.तिचे आई-बाबा खूपच घाबरले.तीला दवाखान्यात अॅडमीट केलं.आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं.मेघाला रक्ताचा कर्करोग झाला.आईच्या खांद्यावर डोकं ठेवून मेघा खूप रडली.आई,"सारं संपलं ग! काही दिवसांपूर्वीच मी पंकजला लग्नासाठी होकार दिला होता.मला त्यासोबत आनंदाने प्रेमाचा संसार करायचा होता.पण ...! "शांत हो बाळा! तुला काही होणार नाही.आपण चांगल्या डॉक्टरांकडे तुला दाखवू."आई," नियती इतकी वाईट का असते ग?"आईनं मेघाला कुशीत घेतलं.इतका वेळ आवरलेल्या अश्रुंना आईने वाट दिली.

  

हॅलो आई!,मेघाचा फोन लागत नाही.तिला जरा फोन द्या ना! अहो, तुम्ही रडताय का? काय झालं? प्लीज! तुम्ही आधी शांत व्हा.आणि काय झालं ते मला सांगा पटकन!" पंकज...!"मेघा दवाखान्यात अॅडमीट आहे.तिला...!" "काय झालं तिला?" अरे तिला.....,कन्सर झालाय!" काय!

    

पंकज! "काय झालं रे हे सारं!" " होईल सारं नीट.तु काळजी करू नकोस." आई!,"दोनच दिवसात मी मेघा सोबत लग्न करतोय.अरे पण!... पंकज,"तु कसलीही घाई करू नकोस.अरे मला माहिती आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते! अरे पण मी एक ते दोन वर्षाचीच सोबती आहे.तु माझ्यासाठी तुझं आयुष्य उगाचंच वाया घालवू नकोस."मेघा,विसरलीस का! समुद्राच्या काठी एकमेकांना लग्न करण्याचं वचन दिलं होतं आपण!" " पण ते आता शक्य नाही!" का? "तु आजारी आहेस म्हणून?" "मग तर हा माझा स्वार्थ ठरेल.ज्या दिवशी मी तुला वचन दिलं त्याच दिवशी तु माझी झालीस! यापुढे तुझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी!" 

 

सर्वांनी पंकजला समजावलं.पण त्याने आपलं प्रेम खरं आहे हेच सिद्ध केलं.त्याने त्याच्या कंपनीत मेघाचा आरोग्य विमा उतरवला.तीचा दवाखान्याचा जवळपास आठ ते दहा लाख खर्च त्याने केला.बघता बघता दोन वर्षं झाली.या दोन वर्षात मेघा उभं आयुष्य आनंदात जगली.पंकजने एका खऱ्या प्रेमाची रीत निभावली.

 

अचानक एके दिवशी मेघा जास्त आजारी पडली. पंकज,"आता माझा शेवट जवळ आला. तुझ्यासारखा जोडीदार मिळाला हे माझं भाग्यचं! मला मरताना कसलंही दु:खं वाटतं नाही रे!या दोन वर्षांत तु मला भरभरुन सुख दिलंस! माझी एक शेवटची ईच्छा! या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तु एक लायब्ररी सुरू कर.आणि माझा शेवटचा कविता संग्रह प्रकाशित कर!" काही तासांतच तीची प्राणज्योत मावळली.डॉक्टरांच्या मदतीने पंकजने मेघाच्या नावाने लायब्ररी सुरू केली.आणि तीचा शेवटचा कविता संग्रह प्रकाशित केला....."तो चंद्र माझा!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy