Sudha Patil

Others

3  

Sudha Patil

Others

छू मंतर

छू मंतर

3 mins
220


  अमितचं आॅनलाइन काम रात्री साडेबाराच्या सुमारास संपलं.कामाचा थकवा जाणवत होता म्हणून तो लगेचच जाऊन झोपला.त्यांच्या छोट्या दोन मुली शांत झोपल्या होत्या.त्याला वाटलं मयुरीही झोपली असेल.म्हणून त्याने उठून लाईट बंद केला.पण मयुरी जागी होती.काय हे अमित!अरे किती वेळ जागतोस.तुझी आॅनलाइन कामं दिवसा संपवत जा ना!अशाने अॅसिडीटी वाढले तुझी!तु अजून जागीच आहेस का?मला वाटलं झोपलीस.बर उद्यापासून जास्त वेळ जागणार नाही.मग तर झालं!मी झोपतो.जाम दमलोय!तुही झोप आता!हो!

  

अमितला झोप लागते न लागते तोवर त्याचा फोन वाजला.डोळ्यात झोप असल्यामुळे त्याने फोन कट केला.असं पाच ते सहा वेळा झालं.पण सारखा अखंडीतपणे फोन वाजतोय म्हंटल्यावर रागाने अमितने फोन उचलला.हॅलो!कोण बोलतंय! अरे अमित मी सागर बोलतोय!काय?सागर!अरे पण हा नंबर...!हो हो...हा माझा दुसरा नंबर आहे.तु माझ्या फोनवरून फोन उचलेनास म्हणून..! बरं ठीक आहे.पण रात्रीचा दिड वाजतोय!तु आता का फोन केला आहेस.आणि काय रे सागऱ्या दमून आता झोपलोय यार! सॉरी पण...! अरे पण काय?बोल आता.अरे अमित कालपासून सर्दी,खोकला ताप आहे.माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.घरीच क्वारंटाइन झालोय.अरे पण आता मला श्वास घ्यायला त्रास होतोय.खूप घाम आलाय.अरे माझी बायको खूप घाबरली आहे.मलाही भीती वाटते आहे.प्लीज माझ्यासाठी बेडची सोय लगेच कर.नाहीतर माझं काही खरं नाही.सागर प्लीज लवकर ये.येशील ना?अमितला क्षणभर काहीच सुचेना.पण लगेच तो मित्राला म्हणाला, अरे ए,सागऱ्या एवढा कशाला घाबरतोस रे!मी येतोय लगेच.तुला काही होणार नाही.

  

अमितने कपडे घातले.आणि आवाज न करता तो रुमबाहेर पडला.मागून मयुरीही आली.अमित,जा मित्राकडे.पण काळजी घे.मास्क, सॅनिटायझर...घरात दोन लहान मुली आहेत.don't worry! I will take care! सोबत आॅक्सिमीटर घेऊन पंधरा मिनिटांत अमित सागरच्या घरी पोहोचला.अमितला पाहून सागर जोरात ओरडला...अमित मला दवाखान्यात घेऊन चल.मला खूप कसतरी होतंय.हा कोरोना मला संपवेल! शांत हो सागर! तुच असा घाबरलास तर वहिणी आणि मुलांनी काय करायचं रे?ताप आहे का आता? नाही! बोट पुढे कर.तुझा आॅक्सिजन चेक करुया.हे बघ,तुझा आॅक्सिजन 94 आहे.तुला काही झालेलं नाही.आणि साल्या तुला काहीही होणार नाही.मग मला श्र्वास घ्यायला त्रास का होत आहे.अरे ,तु टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून उगाचंच भीती घेतली आहेस.भीतीपोटी तुझ्या मनाचा तसा भ्रम झालाय.आधी मनातली भीती काढून टाक बघू! अरे कोरोनाची उगाचंच लोकांनी भीती जास्त घेतली आहे.टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून लगेच कोणी मरत नाही.दहा दिवस मस्त घरात विश्रांती घे.सकस आहार घे.व्यायाम कर.गाणी ऐक.तुझा चित्रकलेचा छंद जोपास.ठणठणीत बरा होशील.

  

अरे अमित, काय जादू केलीस रे?मला काही वेळापूर्वी सतत वाटत होतं की,मला श्वास घ्यायला त्रास होतोय.पण आता मला मस्त वाटतंय.हे बघ, मला मस्त श्र्वास घ्यायला येतोय.छूमंतर! त्या कोरोनाला मी छूमंतर केलं रे! त्याला म्हंटल,या सागऱ्याकडून प्रमोशनची पार्टी घ्यायची आहे.याला काही करु नकोस.बघ, माझं लगेच ऐकलं त्यानं! दोघेही खळखळून हसले.पण साल्या मघाशी घाबरला होतास म्हणून तसं झालं तुला.अरे पण, घरातून येताना माझा श्वास बंद व्हायची वेळ आली होती.तुझे खूप खूप आभार!फोन केल्यावर कसलाही विचार न करता लगेच आलास! ये आभार वगैरे मानू नकोस.मला असं झालं तर तुलाही मी असा त्रास देणार आहे.मैत्रीत एवढं असायलाचं हवं.बर शीतल वैनी,मी निघतो.याला काहीही झालेलं नाही.फक्त तो घाबरला म्हणून तसं झालं.तरीही दोन तीनदा आॅक्सिजन चेक करा.आणि तसं काही वाटलं तर फोन करा.ए,सोट्या, उगाचंच घाबरू नकोस.बरेच लोक त्या कोरोनाच्या भीतीनेच वर गेलेत.समजलं का? म्हणूनच न घाबरता शांत झोप. 

 

 अमित निघून गेला. आणि सागरला खूप हायस वाटलं.सकाळी, सकाळी अमितला सागरचा फोन आला.अमितने तो उचलला,कसा आहेस रे! ठणठणीत आहे.आज मला खूप छान वाटतंय.तु रात्री छू मंतरचा मंत्र म्हंटलास ना!


Rate this content
Log in