STORYMIRROR

Usha Khandagale

Inspirational

3  

Usha Khandagale

Inspirational

कसा घडवाल आजचा शिवबा

कसा घडवाल आजचा शिवबा

3 mins
231

माझ्या भारत मातेच्या कुशीत बाळ शिवबा जन्मले. आणि खूप मोठे झाले .आजही अशाच एका शिवबाचा जन्म व्हावा असाच पराक्रमी ,धुरंधर आणि अष्टावधानी ,अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला वीर पुत्र जन्मावा असे स्वप्न कोणी बघणार नाही तर नवलच आणि ते बघावे देखील. परंतु शिवबा जन्मावा तो शेजारच्या घरात ही भावना मोठ्या संकुचित मनाचे दर्शन घडवते. शिवाजी सारखं खडतर आयुष्य माझ्या मुलाच्या वाट्याला नको तर त्यानं लाडाकोडात मोठं व्हावं. दुःखाचा वाराही त्याला लागू नये. यासाठी त्याचे जन्मदाते अहोरात्र झटत असतात. आपल्या सतत च्या अति लाडाने आपल्या कुटुंबाचा कणा ज्याला आपण समजतो तोच निखळू लागला आहे हे आजच्या आधुनिक आई आणि बाबांना केव्हा समजेल. यासाठी आई-बाबांनी आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. आधुनिकतेच्या फोलपटा मध्ये ते एवढे गुरफटून गेलेत की त्या पोकळ फोलपाटांनाच ते आपल्या मुलाचं भावविश्व समजू लागले आहेत .आयुष्य म्हणजे काटेरी गुलाब आहे हे आपल्या मुलाला सांगण्यात कमी पडू लागले आहेत. संतांची भूमी असलेला आपला महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री आणि अहिल्या यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. प्रत्येक मूल हे राष्ट्राचे भूषण आहे .आपला अनमोल ठेवा आहे. हिऱ्या प्रमाणे अनमोल रत्न आहे. मग या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम करणं हे केवढं मोठं कसब! आई मुलाचा पहिला गुरु असतो तीच त्याचा आदर्श आणि संपूर्ण भावविश्व असते. आईनं त्याला पैलू पाडावेत , संस्कार द्यावेत. भारतीय संस्कृतीत स्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाळाची पापी घेतल्याशिवाय घराचा उंबरठा न ओलांडणारी भारतीय स्री आणि ओठांची लिपस्टिक पुसेल म्हणून बाळाला जवळ ही न घेणारी पाश्चिमात्त्य स्री .हाच फरक आहे आपल्या भारतीय मातीतल्या मातेत आणि पाश्चिमात्य मातेत. हीच आहे आपल्या शिवबाची जिजाऊ .जी त्यांचे प्रेरणास्थान आहे .आज आपल्या पवित्र पावन भूमीतल्या घराघरात अशी जिजाऊ आहेच फक्त गरज आहे तीने शिवबा घडवण्याची. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार , रूढी परंपरेनुसार आपल्या मुलाला घडवावे मातेने. त्याच्यावर योग्य ते संस्कार करावेत. भल्याबुऱ्यांची ओळख त्याला शिकवावी .संगतीचा परिणाम तर त्याच्या मनावर पक्का बिंबवावा. समाजातील सर्व घटकांचे तू देणे लागतोस हे त्याला शिकवावं त्या मातेनं .तुझं अस्तित्व सर्वांना हवं आहे.तू समाजातील प्रत्येकाचा आधारस्तंभ आहेस .हे त्याला समजवावं. समाजातील खूप घटकांना तुझी गरज आहे ही भावना त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम करेल आणि त्याला प्रेरणा मिळेल .

आजच्या तुमच्या शिवबाला रामायण-महाभारतातल्या गोष्टी फारशा रुचणार नाहीत .वीर अभिमन्यू देखील त्याला समजणार नाही. पण वाईट मार्गाने गेलेल्या इतरांची उदाहरणे त्याला अवश्य सांगा .त्याचा परिणाम कसा झाला हे त्याच्याशी मोकळेपणाने बोला. आजच्या आईला सर्व माता-भगिनींना सांगावसं वाटतं की तू असा माणूस घडवला 'जो माशाप्रमाणे समुद्राच्या तळाशी जायला शिकला, पक्षाप्रमाणे आकाशात भरारी घ्यायला शिकला पण तो माणूस म्हणून जगायला शिकला का ?तुझ्याच भारतमातेच्या भूमीत तो माणूस म्हणून जगण्यास समर्थ आहे का? तूच तुझ्या सद्सद्विवेकबुद्धीला विचारून पहा .तू त्याला जे संस्कार दिलेस तसा तो समाजात वावरतो का? तळागाळातल्या, गरजवंतांच्या कधी कामी आला का पहा.

' विचार जाब तूच तुझ्या मनाला खरंच का तू हिरा घडवला

का तूच त्याला बिघडवला 

विचार जाब तूच तुझ्या मनाला शिवबा खरंच तुझ्या पोटी आला '


असं घडवा तुमच्या मुलाला की

 शिवबाचं अस्तित्व त्याला सदैव जाणवत राहावं .सर्व जाती धर्मांना स्थान देणारं शिवबाचं व्यवस्थापन त्याला शिकवा. आपल्या मुलाला घडवताना जिजाऊने कधीही त्याच्या अवास्तव अपेक्षांना थारा दिला नाही. सतत प्रेरणा आणि खंबीर साथ दिली .

तशीच आपणही देऊ या.आणि उज्वल भविष्यासाठी खंबीर होऊया.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational