shubham machave

Romance

5.0  

shubham machave

Romance

कॉफ़ी आणि बरंच काही ...

कॉफ़ी आणि बरंच काही ...

2 mins
501


   नेहमी प्रमाणे ती घराकडे निघाली. पण जरा वेग जास्तच होता. हो! कारण ही तसच होत ना. कोणाला तरी भेटायचं म्हटल्यावर आतुरता ही तशीच असते. घरात पळतच आली आणि गरबडीत आवरायला लागली.

    "अग, निता अशी काय करत आहे. काय झालय तुला?" मागून आईने अलगद विचारले. पण नीताच्या मनात तर वेगळच धांदल उडाली होती. एक वेगळाच आवाज चालू होता, त्यात आईचा ही आवाज कसा येईल.

  हातावरच्या घड्याळात बघत तिने केस आवरायला सुरुवात केली. आईने तिच्या अंगातला पिवळा ड्रेस बघत लगेच तिला खाली बसवत म्हणाली,"शुभम ला भेटायला निघाली काय?" आणि नीताच्या स्मितहास्याने आईला सगळं काही सांगून गेली.

   होय तोच तो शुभम. नीताच्या

 बालपणीतला शाळेतला मित्र. त्याच्याशी रंगलेली ते हास्य खेळ, आठवणी. खरं म्हटलं तर ते मित्र होते. पण नीताच्या मनात तर वेगळेच काहीतरी होते. ती त्याला कधी काही सांगू शकले नाही. का कुणास ठाऊक?

काही कारणास्तव किंवा शिक्षणामुळे शुभमला काही दूर जावे लागले. पण म्हणतात ना मनातल प्रेम कधीच दूर जाऊ देत नाही. नीताला सोशल मीडिया ने त्याच्याशी गाठ धरून ठेवली होती. तसे ते रोजच चॅटिंग करत असत. पण आज ते भेटणार होते. शुभम ला आवडणारा तो पिवळा ड्रेस घालून नीता त्याला भेटायला निघाली.

  चक्क पाच वर्षांनी त्याला आलेला तो दुपारचा मेसेज होता. की, भेटशील का मला आज सायंकाळी आपल्या त्याच जागी. नीताने ही एक smile ची emoji पाठवून होकार दिला. ती चालतच निघाली, आणि चालता चालता तिच्या मनात त्या जुन्या आठवणी आठवायला लागल्या. त्याच्या सोबत घालवलेला तो वेळ. त्याच्या सोबत रोजच त्या जागी जावून रोजची दोघांना आवडणारी कॉफी . हे सर्व विचार करत ती कधी त्या रेसटॉरंट्स मध्ये पोहचली तिला ही कळाल नाही. पण जावून बघते तर काय, तिथे तर कोणीच नाही. ना एक वेटर, ना कोणी दुसरं कस्टमर. सर्व लाईट सुद्धा बंद होती.

    तेवढ्यात एक आवाज येतो आणि काही बोल तिच्या कानावर पडतात, 


"त्या ओठावरच्या हास्याला आवर ग जरा

त्या पसरणाऱ्या केसांना आवर ग जरा

माझ्या या वेड्या प्रेमाला तू एकदा सावर ग जरा"


   आणि तेवढ्यात सर्व लाईट सुरू होतात. दरवेळेस बसलेल्या टेबलावर नीताला आवडणारी गुलाबाची फुले ठेवली होती आणि दोन कप नीताला आवडणारी कॉफी ठेवलेली असते. तिला ही कळून चुकते की हे सर्व शुभम नी केलंय. पण तो आहे तरी कुठे, ज्याच्यासोबत मला कॉफी पेयायची आहे तो दिसतच नाहीये. आणि तेवढ्यात नीताच्या डोळ्यावर अलगद पणे कोणीतरी हात ठेवतात. नीताला ही कळते तो शुभम च आहे. आणि ती मागे वळून त्याला घट्ट पने मिठी मारते.

    नंतर, दोघेही बसत कॉफी पिण्यास सुरुवात करतात आणि आपल्या लहानपणच्या आठवणी मध्ये रमून जातात. कॉफी तर केव्हाचीच संपलेली असते पण प्रेमाचा गोडवा मात्र अजून वाढत होता. नीमत्त तर फक्त कॉफी च होत पण त्यांना मात्र एकत्र बोलायचं होत. कॉफी आणि बरंच काही च्या नादात ते आज मात्र एकत्र आले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance