R R Pathan

Inspirational

3  

R R Pathan

Inspirational

कमाई

कमाई

5 mins
375


रब्बीचा हंगाम सुरू झाल्याने रानात चोहीकडे थोडी थोडी थंडी पसरायला सुरुवात झाली होती. हरभरा, गहू या पिकांना आपली डोकी अशीच वर काढली होती. गावखरच्या गव्हाच्या शेताला पाणी देण्यासाठी शेषरावान तसं रोशनच्या कानावर टाकलं होतं.रोशन हा पंचविशी ओलांडलेला मुस्लिम तरुण. दोन वर्षापूर्वी च त्याच लग्न झालेलं. घरात लहान मूल.छोटे बहन भाई कुटुंबाची जबाबदारी याच्या खांद्या वर येऊन पडली. शेषरावच्या वावरात ईमानी-ऐतबारी काम करणारी मुस्लिम कुटुंबाची ही दुसरी पिढी होती.

"मालक म्हणे अन मजूर सुने "या उक्तीप्रमाणे रोशन शेषराव च्या वावरात गव्हाच्या पिकाला पाणी देत होता.

रात्रीचा चार-पाच चा सुमार झाला असावा. चन्द्राचा पांढराशुभ्र प्रकाश पडल्याने दांडा तून खळखळ वाहणारे पाणी काचा वाणी चमकत होत. रोशन ने थंडी वाजू नये म्हणून गळ्यातली मफलर कानाले घट्ट बांधली. दोन्ही पायजम्याचे पायचे गुडघ्यापर्यंत खोचले. खांद्याला लटकवलेल्या रेडिओचा बोटं हळूच घुमवलं तोच मोहम्मद रफी चे" मैं जिंदगी का साथ निभाता चला गया.. गाणं लागत असताना आवाज मोठा केला गाणं थोडंसंच वाजलं. थोड्याच वेळात सर...सर.... करत रेडिओचा आवाज कमी होत बंद झाला.

" हट साला अपनी तो किस्मत ही खराब है.!"असं म्हणत सेलची चार्जिंग उतरल्याने रोशन ने रेडिओ चे बटन बंद केलं.

"साला ये ड्रायव्हर लोगो की जिंदगी मस्त रहती. इनको शहर- शहर घूमने को मिलता, अच्छा खाने को मिलता, अच्छे पैसे भी मिलते... अपनी जिंदगी तो साली बेकार है..!

असा स्वतःशीच तो बडबडत होता. तेवढ्यात मोटारीचा आवाज बंद झाला. रोशनने विहिरीच्या काठावरील लाकडी खांबावर लटकलेल्या लाईट कडे पाहिलं. लाईट ईझला होता. त्यांना खिशात ठेवलेल्या आपल्या दहेज मध्ये आलेल्या भल्यामोठ्या चाबी च्या घड्याळीत पाहिलं. आता सहा वाजता वाजत आले होते. लोडशेडिंगचा वेळ झाल्याने लाईट गेली होती. रोशन तसाच चिखल तुडवत विहिरीजवळ आला. प्लग मधून स्टार्टर च्या पिना उपसल्या. कानाले बांधलेली मफलर सोडली. तोवर बरच

उजेडलं होतं विहिरीत खाली डोकावून पाहिलं. विहिरीत अजुन भरपूर पाणी शिल्लक असल्याचं त्याला जाणवलं.

त्यानं सगळं सामान आवरलं पायजाम्याचे पायचे खाली करत घराकडे निघून आला.

दारातच रोशनचा अब्बा खोकलत तोंड दूध बसला होता.

"क्यू आज जल्दी आ गया"?

"लाईन चली गई बा.. अब खेत में रुक के क्या करू..!

रोशन जीवावर आल्यागत म्हातार्‍याशी बोलत दरवाजातून खाली मान करत घरात शिरला.एका भल्यामोठ्या भगुण्यात चुलीवर पाणी तापत होतं. बाजूलाच रोशन ची बायको फरिदा एका छोट्या घमेल्यात गुळाचा चहा उकळत बसली होती. फरीदा कप बशी त चहा ओतत तिच्या मीयाले सांगत होती

"कल भाऊराव घर को आया बोलते.. उसने बच्चो को कपडे लाये ..बिवी कु साडी भी.. अपनी सारी जिंदगी तो गरीबी में ही जारी...!"

रोशन चहा पीत पीत किस्मत दोष देत बीवी च्या बाता चुपचाप ऐकत होता. भाऊराव आणि रोशन हे दोघे लहानपणी शाळकरी मित्र होते. रोशन घरच्या लाहातीमुळे आठवीच्या वर तो शिकू शकला नाही. भाऊराव मात्र मॅट्रिक पर्यंत शिकला.प्रयत्न करूनही एसटी ड्रायव्हर पद पदरी न पडल्याने ट्रक ड्रायव्हर झाला. गावात त्याची खूप इज्जत होती. लोक कमवता व्यक्ती म्हणून त्याच्याकडे आदराने बघत होते. एकदा बोलता बोलता भाऊराव "अकोलेकु चल तेरे कू गाडी सिखाता" म्हणून बोलला होता.ईकडं रोशन बेचारा किस्मत ला दोष देत गरिबीमुळे परिवारात, खेती बाडी च्या कामात गुंतून गेला होता.पण त्याचं मन काही आता कामात लागत नव्हतं ना संसारात. अडीच रुपये रोजंदारीवर काम करणारा रोशन अडीशे रुपये महिना असलेल्या ट्रक ड्रायव्हरच स्वप्न दिवसाढवळ्या उघड्या डोळ्यांनी बघत होता. शेवटी एक दिवस त्यांन आपल्या मनासारखं केलं. गुपचूप आपले समदे कपडे एका थैलीत भरले. घरातून बिवि-बच्चा सोडून जाण्यासाठी चौकटीतून बाहेर त्याचे पैर उचलत नव्हते पण घराचं अठरा विश्व दारिद्र त्याला सतावत होतं रोजच्या किरकिरी मूळ तो कंटाळला होता. शेतात जातो असे म्हणून तो घराबाहेर पडला आणि थेट तालुक्याच्या ठिकाणी मेन रोडवर जाऊन पोहोचला. येथून त्याला अकोला गाठायचं होतं. जे दिसेल त्या वाहनाला तो हात देत होता. थोड्यावेळानं त्यांना हात दिल्याने एक ट्रक समोर थांबला. रॉक सरदारजी चालवत होता. त्यानं रोशनला पाहिलं आणि मोठ्या आवाजात बोलला,

आरे किथे जाना है पुत्तर.."?

अकोला जाना है जी..!

ठीक है आजा उप्पर..

असं म्हणत रोशनला सरदारजीने ट्रकमध्ये घेतलं. तो मस्त मौजी होऊन पंजाबी गान म्हणत ट्रक चालवत होता. रोशन त्याच्याच्याकडे बार बार कुतूहलाने पाहत होता.ते पाहून सरदारजीने स्वतः च बातचीत ला सुरुवात केली.

"कहा के रहनेवाले हो..?"

यही पास के गाव का हु जी..!

की नाम है पुत्तर तेरा..

जी रोशन पठाण..!

सरदारजीने रोशनला निरखून बघितलं.

"लगते तो नही हो... कोई गल नही..! किस लिये जा रहे हो ?"

रोशन ट्रक च्या स्टेरिंग कडे पहात बोलला,

ट्रक सीखने जा रा रहा हुं..!

"अच्छा.. इससे पहले कोई गड्डी चला ई है तुने?

"हाजी गाव मे बैलगाडी चलाई हैं..!"

आबे हू त्तेरी ... सरदारजी खदकन हसला.

" देख पूतर.. मै आदमी कडक हू पर दिल का नरम हु..

रुक जा मेरे साथ ही... मैं सीखाऊंगा तुझे गड्डी चलाना...उस्ताद बोला कर.. थोडे बहुत पैसे भी दिया करुंगा...बस छोटे मोटे काम किया कर...!

रोशन हळूच डोकं खाजवत सोच करत होता. भाऊराव जर भेटला नाही तर घरवापसी त्याला शक्य नव्हती. गाडी तर शिकायची होती. त्याने ""ठीक है.."मनत मान हालवली.

एकेक दिवस जात होता. दोन महिने उलटून गेले होते. गावाकडे समदे रोशन अचानक निघून गेल्यामुळे परेशान झाले होते. एकेदिवशी त्यां ने गावाकडे शेजारच्या सावकाराच्या घरी फोन लावून सर्व कहाणी सांगितली व लवकरच घरी येईल म्हणून निरोप द्यायला सांगितला.

शेतात चिखल तूडवणारा रोशन आता शेहरोश हरी फिरू लागला. कलकत्ता, हैदराबाद गुजरात सारखी ठिकाण तुझ्या डोळ्यात फिरू लागली. उस्ताद चे चड्डी-बनियान पासून लुंगी पर्यंत कपडेही तो धुवू लागला. ट्रकचे काचही स्वच्छ पुसू लागला. हरएक काम करून त्याने उस्ताद चा भरोसा जितला होता. ट्रक सुरु करणे बंद करणे थोडा समोर घेणे याचं गणित त्याला जमलं होतं. ट्रकच्या ड्रायव्हर सीटवर बसला वर त्याला जुनून येत असे. आता ड्रायव्हर म्हणून महिनाभरात तो तरबेज झाला होता. ट्रान्सपोर्ट वर देखील त्याच्या कामाची तारीफ व्हायला लागली. ट्रान्सपोर्ट मालकांने नवीन ट्रक घेतल्याने आणि सरदारजीने शिफारस केल्याने रोशनला तिथेच ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली. तीनशे रुपये पगार सोबत पन्नास रुपये भत्ता वर तो ड्रायव्हरकी करायला लागला. तीन महिने उलटून गेल्यान आता त्याला घर डोळ्यासमोर दिसत होतं.

जालना वरून गोडाउन मध्ये माल करून तो आता परत येत होता. त्याचा पहिला पगार झाला होता.तेथूनच त्याने बीवी साठी साडी व मुलासाठी कपडे पण खरेदी केले होते.

एखाद्या आफिसर गत खुर्चीत बसावं तसं तो ट्रक च्या सीटवरील खुर्चीवर ऐटीत बसून ट्रक चालवत होता. गरिबी, मुफ्लीसी च्या दुनियेतून त्याने बाहेर कदम टाकला होता. मेहनत मजुरी वरून त्याची आता दरमहा तीनशे रुपये कमाई सुरू झाली होती. आता त्याच्यासमोर "बच्चो की पढाई लिखाई "ची स्वप्न डोळ्यासमोर झळकत होते.आता हीच त्याची खरी कमाई असणार असल्याचं त्याला जाणवत होत.त्यांन डाव्या हातांने ट्रक मधील टेपरेकॉर्डर मधे कॅसेट टाकली तोच " मैं जिंदगी की का साथ निभाता चला गया...एक फिक्र को धुवे मे उडाता चला गया"... गाणं सुरू होताच त्यांन आवाज मोठा केला..आपला सूर वाढवत तो गाणं गात ट्रक चालवत होता. रोशनच्या जिंदगीचा सफर आता हाय वे च्या रस्त्याने भरधाव घेत होता...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational